Find the Latest Status about आठवणींची शाळा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आठवणींची शाळा.
yogesh atmaram ambawale
बिनधास्त जगणे आठवते ते,तमा नव्हती कसेही वागण्याला, सुट्टी नसते कधीच,नियमित भरते ही आठवणींची शाळा, सुख दुःखाच्या अनुभवाचे धडे आठवते जेव्हा, आयुष्याच्या दप्तरात ठेवलेल्या पुस्तकांची आठवण येते तेव्हा. आपसूक डोळे पाणावतात मग,आठवणींची शाळा भरते जेव्हा, कधी कोण नजरेसमोर दिसेल,असे वाटले नव्हते तेव्हा. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे आठवणींची शाळा... #आठवणींचीशाळा चला तर मग लिहूया. #collab #yqtaai
chandani
एकांतात आठवणींची शाळा भरली... सुखदुःखाच्या चढ-उतारांनी मनात गर्दी केली... आयुष्यभर साथ देणाऱ्यांचे चेहरे समोर आले... आणि नकळत समाधानाचे हसू ओठांवर उमलले... शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे आठवणींची शाळा... #आठवणींचीशाळा चला तर मग लिहूया. #collab #yqtaai
Durga Deshmukh
सुमे चल माझ्या शाळेला जाऊ ज्ञानोपासक पाहुण येऊ शाळा माझं गाव ज्ञानोपासक त्याच नाव ज्ञानाची घागर भरुन घेऊ 1 ज्ञानोपासक माझी शाळा ज्ञानान भरलेला मळा नका रिकाम्या हातान जाऊ 2 पहा विज्ञानाचे रंग मुल रसायनात दंग थोडा जीवाचा रंग घेऊ (3 विद्वान विद्वत्तेची खाण गुरुजनाची प्रतिमा महान चला ज्ञानाची गाणी गाऊ 4 चित्रकला, रांगोळी, ध्यान दंगामस्ती, अनापान कला सा-या जगाला दावु 5 शाळा गुणवत्तेचा सागर अंधश्रध्देवर फिरवी नांगर उघड्या डोळ्यानं विज्ञान पाहु(6) दुर्गा देशमुख, परभणी ©Durga Deshmukh शाळा
somnath gawade
शाळेत रस नसणारी टवाळमंडळी इतरांची 'शाळा'घ्यायला मात्र पटाईत असतात. 🤣😂 #शाळा
somnath gawade
आयुष्याची शाळा झाली आहे. शाळेत असताना आम्ही घरून 'होम वर्क' करायचो आता नोकरीत असताना 'वर्क फ्रॉम होम' करतोय. 😂🤣 #शाळा
Philoshayar
काळाच्या ओघात बरच पाणी गेलं पुलाखालून वाहून आणि जुने सगळे आठवले शाळेतल्या मित्रांना पाहून #शाळा
गोरक्ष अशोक उंबरकर
शाळेत बसून जेवणाचा आनंद आज मिळत नाही... आठवताना क्षण सारे घास घशाखाली गिळत नाही.. चपाती सोबत गुळाचा खडा किती भारी लागायचा.. भाजी नसते म्हणून गूळ डब्यात नेहमी आणायचा.. एकमेकांना सोबत घेऊन घोळका गोल करायचा.. चटणी भाकर वाटत वाटत एक एक घास मिळायचा.. उच्च नीच लहान मोठा भेद मुळीच नसायचा.. शाळेतल्या प्रत्येक दिवसात खरा आनंद असायचा.. शाळेतल्या प्रत्येक दिवसात खरा आनंद असायचा.. ©गोरक्ष अशोक उंबरकर शाळा