Find the Latest Status about कोडे सोडावा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कोडे सोडावा.
Dharmendra Gopatwar
Sangeeta Kalbhor
जगलेल्या क्षणांनी जागवून ठेवणे बरे नव्हे नाव प्रीतीचे गाव प्रीतीचे उमजून रडवणे खरे नव्हे कशाला हवा मार्ग परतीचा श्वास अनावर होताना लागावा की ठसका उगा ओरखडा मनावर करताना मुजून जातात खुणा व्रणाच्या घाव परी ठरलेला का म्हणून सोडावा हात हातात एकदा धरलेला सोडावा की स्वाभिमान नात्याला ह्रदयी कोरताना पाझरतील नयन आपसूकच प्रीत उरी स्मरताना जगलेल्या क्षणांनी व्हावे समजूतदार नको हट्ट उगा वाईट काळातही जगलेला क्षणच वाटतो की हो सगा काळ येवो कितीही सरसावून क्षणच होतात ढाल मनोदशा बदलायला क्षणांचीच तर ओढावी लागते शाल जगलेल्या क्षणांचा व्हावा जागर नाद मनी घुमवावा पडत्या क्षणांत असता आपण जगलेला क्षण आठवावा..... मी माझी..... ©Sangeeta Kalbhor #boatclub जगलेल्या क्षणांनी जागवून ठेवणे बरे नव्हे नाव प्रीतीचे गाव प्रीतीचे उमजून रडवणे खरे नव्हे कशाला हवा मार्ग परतीचा श्वास अनावर होतान
Vrishali G
गुलाब माझ्या हृदयी फुलला रंग तुझ्या गालावर खुलला काटा माझ्या पायी रुतला शुल तुझ्या उरी कोमल का मद्याचा मी प्याला प्यालो प्रिये तयाचा मद तुज आला जखडीले कुणी दोन जीवांना मंत्र बंधनी केवळ का कुणी कोडे माझे उकलील का? कोडे
somnath gawade
चर्चेअंती कोडे सुटले होते; मला जे कळले ते तुला कळले होते. तुझ्या मनीचे शब्द माझ्या ओठी रुजले होते; सरतेशेवटी आपले सर्व गुण जुळले होते. #कोडे
somnath gawade
तुझं असं रूप पालटणं कधी अदृश्य होणं मला कोड्यात टाकतं हे बरोबर नाही #कोडे
Dharmendra Gopatwar
जीवनाचे कोडे सुटता सुटत नाही..... By Dharmendra Gopatwar जीवनाचे कोडे सुटता सुटत नाही माणसांच्या गर्दीत आपला कुणी भासत नाही ..., आतून पोखरलेली मने त्यांची , चेहऱ्यावर मुखवटे घालून फिरतात दिसेल कुणी आपले की चेहरा मागे फेरतात .... स्वार्थाचा बाजार आहे सगळा नात्याला पैशाने तोलतात .... हृदय शून्य झाला आहे मनुष्य इथे.... नुसता शरीर घेऊन फिरतोय ..... ईश्वराला मानत नाही माणसाला जाणत नाही , राक्षसी वृत्ती काही केल्या मिटत नाही .... दुखावलेल्या माणसाला इथे दिलासा कुणी देत नाही.... तड-फडत्या माणसाला बघून कुणाच्या अश्रू डोळ्यांत येत नाही...., पाय कुणाच्या मदतीला धावत नाही तुटलेल्या माणसाच्या पाठीवर हात कुणी फेरत नाही.... डोळे वाईट बघण्यास अतुरलेले असतात , चुकी नाही माणसांची , काळ बदलला आहे , कोण कुठे कधी बदलतो याचा काही नेम नाही काही लोक बोलून दाखवितात..... , तर काही मुकाट्याने खूप काही शिकवून जातात माणसातला माणूस मेलाय याची जाणीव करून देतात.... अक्षरशः माणसातला माणूस मेलाय याची जाणीव करून देतात... माणसांच्या गर्दीत आपला कुणी भासत नाही ....... कोडे जीवनाचे सुटता सुटत नाही....... YT/कवी_मन (मनातलं ओझं पानावर) Author ©Dharmendra Gopatwar #जीवनाचे कोडे
Nisha Dange
जातीपातीचे कोडे सुटेल का? एकच असे विश्वविधाता निर्मिली त्याने एक मानवजात एकाच ईश्वराची आपण लेकरे तरीही हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई कधी विभागलो कळलेच नाही..... सर्वांच्या अंगी सळसळतो फक्त लाल रंग तरीही फडकतो वाऱ्यावर जातरंग कुठे गेली ती भारतीय संस्कृती? विविधतेत एकता जपण्याची स्मरावा गौरवशाली इतिहास क्रांतिकारांच्या गळ्यातील फास जातीय दंगलीसाठीच का त्यांनी.... दिले आपले बलिदान? जागवा स्वमनाला नि विचारा प्रश्न........ खरा तो एकचि मानवधर्म मनामनात दरवळेल का? आतातरी जातीपातीचे कोडे सुटेल का? चला माणुसकीची ज्योत पेटवू मनांनात मानवसेवा रुजवू असू देत कितीही...... वेगवेगळे रंग, वेश, भाषा, तरीही नांदावी मनी नित्य देशभक्तीची अभिलाषा निशा डांगे पुसद जातीपातीचे कोडे सुटेल काय?
Vilas Bhoir
*तुझ्यामाझ्या प्रेमाचे कोडे !* तुझ्यामाझ्या प्रेमाचे गणित मलाही ठाऊक नव्हते , विखुरलेल्या नात्याचे कोडे सुटता सुटत नव्हते मनातले तुझ्या द्वेष निराळे मलाही नेहमी छळते , बावरे प्रेम होते वेडे भांडण कधी झालेच नव्हते भेटणे तुझ्यामाझ्यातले रंगात मलाही रंगवित जाते , सोनकेशरी रंगसोहळे तरी प्रेम रंगात रंगले नव्हते तुच तुझ्या डोळ्यात जीवापाड मलाही जपले होते , म्हणून कदाचित हे प्रेम भाबडे तुलाच शोधत नव्हते अल्लड तुझ्या वळणावरती शोधून मलाही सोबत नेते , अवतीभवती फिरून सारे क्षण प्रेमाचे आठवत नव्हते पैंजण तुझ्या पायातले हलकेच मलाही साद घालते , गुणगुणतांना प्रेमगीत मी तुझेच अंतरास अंतर नव्हते *~विलास भोईर ~* ❤ तुझ्यामाझ्या प्रेमाचे कोडे! ❤
काव्यात्मक अंकुर
कोडे कोडे हे विचारांचे भावनांना गुंतवत राही नकळतपणे निर्मित झालेल प्रेम स्वस्थ बसवत नाही ©अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #कोडे #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #twoliner #complicated #wordporn #writeaway #lovequotes #Love #thought