Find the Latest Status about मनासारखे गाणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मनासारखे गाणे.
कवी - के. गणेश
कर्तव्यापासून भावनांची कधीतरी फारकत असावी, अन् मनासारखं जगायला स्वतःचीही हरकत नसावी.! @kganesh जगणे मनासारखे..
Anaamik Kavya
जीवनाचे मूर्त गाणे गात आहे मी एकटा, तुझी सोबत असतानाही सूर माझा एकटा... जीवनातील तरंगांमधला मी तरंग; जो ना कुणा दिसला, तरंगाला या किनारा लाभण्या सांग काय मी करू आता? गाण्यातील सप्तसूरांतला मी सूर; जो दुर्लक्षिलेला, ओठांत तुझीया आवाज माझा येण्या सांग काय मी करू आता? या भरल्या आकाशातला मी पक्षी; जो आहे नेणता, घरट्याचं एक स्वप्न पहावया सांग काय मी करू आता? जीवनाचे मूर्त गाणे गात आहे मी एकटा, तुझी सोबत असतानाही सूर माझा एकटा... कृष्णा... ©Anaamik Kavya जीवनाचे मूर्त गाणे... #Travelstories
Prasaad Shendage
होता होता, राहूनी जाते, मनासारखे काही.... होईल कधीतरी मनासारखे, पण जगासारखे नाही....!! प्रसाद शेंडगे.✍️ ©Prasaad Shendage #मनासारखे#सुचलेल्याओळी.#प्रसाद शेंडगे..✍️#
प्रितफुल (प्रित)
मनासारखे..... मनासारखे तू अता वाग थोडे नको घाबरू तू पुन्हा माग थोडे धुळीला मिळाले सुखांचे मनोरे नशीबात आले पुन्हा डाग थोडे मनाला कुणाचा मिळेना सहारा वसंती फुलावे इथे बाग थोडे तिला भेटलेला खरा यार होता किती संधिसाधू महाभाग थोडे तुझ्या आठवांनी मला वेड लागे सुचावे तुलाही विरहराग थोडे अजूनी उभी आस लावून प्रीती दिली तूच वचने, सख्या जाग थोडे दिली आहुती आज माझीच मी रे करावेस तू ही कधी त्याग थोडे प्रितफुल (प्रित) ©प्रितफुल (प्रित) #मनासारखे अत्रंगी रे...!!! Kavita Pudale