Nojoto: Largest Storytelling Platform

New रेशीम Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about रेशीम from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, रेशीम.

Stories related to रेशीम

    LatestPopularVideo

Avinash lad

रेशीमधागा

read more
रेशीम धागा..
---------------------
तुझ्या माझ्या प्रीतीचे
हे बंध रेशमाचे
गाठी जुळून आल्या
हे नात आयुष्याचे

सजले घरदार
चांदणे पोर्णिमेचे
शालू भरजरी ग
स्वप्न नव्या प्रीतीचे

ते ठेंगणे आभाळ
वाटे डोळ्यात तुझ्या
बिलगून भावना
तूच हृदयी माझ्या

सुखदुःखात सखे
तू मज सावरावे
देऊन हात हाती
हे आयुष्य चालावे

काटेरी नव्या वाटा
चालता येतीजाती
संसाराचं तोरण
तू विनावे सोबती

इच्छा दोन जीवांच्या
जानुया सोबतीने
संसाराच्या गाड्यात
स्वप्न नवेतराने

सुखदुःख दोघांचे
ओंजळीत ठेऊया
बांधू रेशमी धागा
हे आयुष्य चालूया

----------------------
@अविनाश लाड,राजापूर-हसोळ रेशीमधागा

Priya Tambde

रेशीमगाठ

read more
जुळुनी येति बंध हे तेव्हा
नात्यांनाही मिळतो नवा श्वास ,
एकमेकांच्या सोबतीने सुरू होतो
आयुष्यभराचा अनमोल प्रवास ...!!!!

श्वासानांही अर्थ देते
दोन मनांची ही रेशीमगाठ ,
दोन जीवांच्या मनी रंगतो
नव्या जीवनाचा नवा थाट.......!!!

स्वर्ग ना पाहिला मी
ना पाहण्याची मला ओढ मोठी ,
तुझ्या मिठीतच स्वर्ग अन्
मिळाली स्वर्गाची अनुभूती .......!!

हात तुझा हाती असावा
पार करेन मी संसाराची प्रत्येक वादळवाट ,
श्वासानांही अर्थ देते
दोन मनांची ही रेशीमगाठ........!! रेशीमगाठ

अत्रंगी रे...!!!

"उसळतात" उगाचच 
मनातल्या "सागरलाटा" 
"प्रेमरंगी" नाचते "चित्त"
खुणावती "रेशीमवाटा" 
⚘⚘⚘⚘⚘⚘

छत्तीसगुणी गुणमेलनी काव्य
                          © गजानन तुपे #सागरलाटा  #रेशीमवाटा

somnath gawade

विसंवादाचे धागे-दोरे
शोधण्यापेक्षा
सुसंवादाच्या
रेशीम गाठी
बांधणे केंव्हाही
चांगले! #रेशीमगाठी

Datta Dhondiram Daware

रेशीम #wetogether #Comedy

read more
ज्ञात होते सखे सारे तुला... 
            नकळत प्रेमाचा खोटा खेळ खेळलीस तू.. ! 
   देऊ काय मी तुला कठोर सजा... 
           वरवरचे प्रेम तुझे, नाही मला कळलीस तू.. ! 
थोडीपार हवी होती साथ तुझी पण;
   रेशमाच्या बंधनात नाही जुळलीस तू..!

*सम्राट दत्ता डावरे*
९७३००३७०५३

©Datta Dhondiram Daware रेशीम

#wetogether

Rajendrakumar Shelke

रेशीमगाठी #Smile

read more
*विषय:-आशा जुळाव्या रेशीमगाठी*

*काव्यप्रकार:-पंचाक्षरी*

*******************************
अशा जुळाव्या
रेशीम *गाठी,*
तुम्हां सांगतो
या *प्रेमासाठी.*

काय करावे
काही *कळेना,*
भाव मनीचे
का *उमजेना?*

प्रेम असावे
नात्यात *खरे,*
गंध सुखाचा
मनात *भरे.*

मन मोकळे
करून *सांगे,*
प्रित फुलावी
तुमच्या *संगे.*

जुळुनी याव्या
रेशीम *गाठी,*
प्रेम मिळावे
आनंदा *साठी.*
-------------------------------------------
*✍️ राजेंद्रकुमार शेळके.*
  -- नारायणगाव, पुणे.

©Rajendrakumar Shelke रेशीमगाठी

#Smile

Shama patil sanghvi

#i"रेशीमगाठी " #poem

read more
गवसत होते नियती पाशी 
सुखे विखुरलेली जीवनाची
वाटे हा टप्पा माझ्या सुखाचा 
पार गवसता मृगजळ राहिला
 वीराण शांततेत एक स्वर
 चमकताना मी पाहिला 
माझाच हरवलेला अंश तो 
मजल मारता कातळ निघाला 
काय हरवलं काय गवसलं 
पार सुखाचा शोधताना 
बंद डोळ्यात आठवणींच्या 
उरल्या पोकळ रेशीमगाठी #I"रेशीमगाठी "

रसिका देशमुख (जाधव)

रेशीमगाठीरसिका #nojotophoto

read more
 रेशीमगाठी#रसिका

Abhiejeet Anant Tambe

रेशीम गाठी #Stars&Me

read more
❤️फक्त तुला आवडतं ना म्हणून❤️

आपण दोघांनीही गोळा केलेल्या गवतापासून तोडक मोडक का होईना, पण आपल्या दोघांचं छानसं घरटं बांधायचंय....

दोघांनी एकाच ताटात जेवायचंय अन् सोबत जेवताना एकमेकांना भरवायचय...

थोडा रुसवा थोडा फुगवा हा संसाराचा खेळच आहे, तो एकदा खेळायचाय...

आणि आयुष्यभराच्या आठवणी रेशीम गाठींनी घट्ट बांधायचाय


........अभिजीत तांबे....... रेशीम गाठी

#Stars&Me

Rashmi Hule

ना रक्ताची ना नात्याची
चालता मैत्रीची ही वाट.... 
अपसुकच जुळलेल्या धाग्यांनी
बसली आयुष्याची रेशीमगाठ... #मैत्री #रेशीमगाठ #yqtaai #yqbaba #yqdidi #yqtales #bestyqmarathiquotes
loader
Home
Explore
Events
Notification
Profile