Nojoto: Largest Storytelling Platform

New खेळताना रंग बाई होळी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about खेळताना रंग बाई होळी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, खेळताना रंग बाई होळी.

    LatestPopularVideo

Ashwini wankhade

तुम और मै हम नही हो सकते
इस होली हम एक दुजे मै
नहीं रंग सकते
दुरी को कायम ना रख
हम साथ नहीं रेह सकते
भांग पिकर हम खो नहीं सकते
बतावो ना हम तुम्हे
थोडा रंग नहीं लगा सकते

©Ashwini wankhade #होळी रंग 

#Colors

Ganesh Shinde

एक होळी आज तुझ्या माझ्या,
                             नात्यात ही करून टाकू,
आपले सगळे विकार गैरसमज
                             या होळीत जाळून टाकू,
प्रकाशता दुर्गुणाची होळी, 
                        अंधःकार मनातला दूर सारु,
उजडता उद्या पुन्हा नव्याने, 
                      प्रेमरंगाची मुक्त उधळण करू। #होळी #रंग #प्रेम #नाते #yq_gns

Kailas Tidke

लक्ष्मीकांत भावे

होळी रे होळी #Society

read more

लक्ष्मीकांत भावे

होळी रे होळी #Society

read more

Devanand Jadhav

होळी रे होळी #मराठीकविता

read more
°चला पेटवूया होळी° 

राग लोभ मत्सराची, आज करुया खांडोळी 
जात पात द्या आहुती, चला पेटवूया होळी 

ऋतू वसंत घेऊन, सण शिमग्याचा आला 
ज्वाला त्या धगधगती, पहा कशा गगनाला 

हेवे दावे विसरून, दूर सारू वैर भाव 
सर्व धर्म एक मानू, सोडू सारे भेदभाव 

भांग पिऊ प्रेमरूपी, नशा चढवू नेकीची 
बोबो बोबो बोंब मारू, मिठी मारुया एकीची 

नांदू गुण्या गोविंदाने, रंग रंगात मिसळू 
निळा भगवा हिरवा, चला आनंदाने खेळू

हाच असे क्षण खरा, चला खेळूया रे होळी 
गोड धोड भरू मुखी, आज पुरणाची पोळी 

--------------------------------------

©•देवानंद जाधव• धामणी, पुणे. 
dhamanikarsahityik.art.blog 
jdevad@gmail.com 9892800137

©Devanand Jadhav होळी रे होळी

Avinash lad

होळी..

read more
होळी...
-------------------

पेटवूया होळी
घालुनी गाऱ्हाणं
आनंदाचे दिन
यावे घरी

मारुनिया बोंब
गोमू येई दारी
कलाकार भारी
कोकणात

रंग नवा  नवा 
उधळूया सारे
आनंदाचे वारे
घेऊ सदा

पुरणाची पोळी
घरात जेवण
होळीचा हा सण
घरोघरी

गावाकडे माझ्या
पालखी देवाची
देवाच्या गाण्याची
मजा भारी

बालगोपाळाचा
आनंद गगनी
खेळती अंगणी
रंग रंग
-------------------
श्री.अविनाश लाड
राजापूर,हसोळ होळी..

Manish Kanade

तुला रंगवून टाकावे
की तुझ्या रंगात रंगावे
क्षणच्या आनंदाने 
की आयुष्यभर जगावे

माझ्या पांढऱ्या आकाशी
तुझ्या रंगांची उधळण
तुझ्या प्रेमाच्या रंगांनी
झाले मोरपिसी मन
 
          - मनिष ज्ञानदेव कानडे #होळी#रंगपंचमी

V G

Rutvik Nirmal

!! होळी!! #PoeticAntakshri

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile