Nojoto: Largest Storytelling Platform

New ज्याचा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about ज्याचा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ज्याचा.

    LatestPopularVideo

gauri kulkarni

#ज्याचा त्याचा प्रश्न #गौरीहर्षल

read more
#ज्याचा त्याचा प्रश्न
चांगल्या माणसांचं सगळं चांगलच होतं, वाईट कधीच होत नाही. पण ते चांगलं होणं हे सामान्य व्याख्येत बसणारं नसतं. घर, बंगला, गाडी, मुलं, नोकरचाकर ही ती व्याख्या नसते. तर चांगलं होण्याची व्याख्या वेगळी असते "त्याच्या" दृष्टीने. ती म्हणजे अशा लोकांना कधी हात पसरावे लागत नाहीत ना पैश्यांसाठी, ना मदतीसाठी. वेळ पडली तर ह्या गोष्टी आपोआप मिळतात त्यांना. तसेच ह्या लोकांच्या चेहऱ्यावर न कितीही कठीण परिस्थिती आली तरी न मावळणारे हास्य आणि समाधान असते ज्याची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. भौतिक सुखाची आस सगळ्यांनाच असते पण भौतिक गोष्टी आत्मिक सुख, समाधान देतीलच असं नाही. पण म्हणून सगळं सोडून भणंग व्हावं का ? तर नाही सगळं असतानाही सगळ्यातून बाहेर पडायची वेळ आली तर दुःखी न होता परिस्थिती स्वीकारता आली पाहिजे. खूप कमी लोकांना जमतं हे पण ज्यांना जमतं त्यांचं जगणं सोनं झालेलं असतं. जगात सगळीच माणसं चांगली माणसं असतात पण चांगुलपणा म्हणजे नेमकं काय हे ज्याचं तो ठरवत असतो. अन् त्याचं फळही तसच प्रत्येकाला मिळतं हो की नाही?? शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न.
#गौरीहर्षल
७.६.२०१८ #ज्याचा त्याचा प्रश्न

gauri kulkarni

#ज्याचा त्याचा प्रश्न #गौरीहर्षल

read more
#ज्याचा त्याचा प्रश्न
फक्त वय वाढलं म्हणून माणुस मोठा होत नसतो, मोठं होण्यासाठी स्वतःच्या वागण्यात योग्य बदल घडवावे लागतात. स्वतः कडे काही नसताना आणि सगळं असताना तुम्ही इतरांशी कसे वागता यावर तुमचं मोठं असणं ठरतं. पैसा आणि वय ह्या गोष्टी कधीच मोठेपणा देत नाहीत, देतात तो फक्त एक भास असतो तुमच्या अहंकाराला कुरुवाळणारा. वेळ सतत दाखवून देत असते की माणूस म्हणून किती क्षुल्लक आहात तुम्ही. ते ज्याला योग्य वेळी कळतं तो वयाने लहान असूनही आयुष्याच्या शर्यतीत पुढे निघून जातो. बाकी कशातून काय शिकायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न. 
#गौरीहर्षल #ज्याचा त्याचा प्रश्न

Vasudev Dalvi

नाही तू त्याचा होतीस आणि नाही तू माझा आहेस नाही तू आत्ता ज्याचा आहे त्याचा आहेस #Shayari #nojotophoto

read more
 नाही तू त्याचा होतीस
        आणि 
नाही तू माझा आहेस
नाही तू आत्ता ज्याचा आहे 
त्याचा आहेस

अल्पेश सोलकर

इतकं का बोल्ड व्हावं ट्रोल होण्यासाठी इतकं का ट्रोल व्हावं फेमस होण्यासाठी काय परिधान करावं ज्याचा त्याचा प्रश्न आहे इतकं पहावे काय संदेश दे #मराठी #yqmarathi #yqtaai #marathiquotes #मराठीकविता #alpeshsolkar

read more
इतकं का ' बोल्ड ' व्हावं ' ट्रोल ' होण्यासाठी
इतकं का ' ट्रोल ' व्हावं ' फेमस ' होण्यासाठी
काय परिधान करावं ज्याचा त्याचा प्रश्न आहे
इतकं पहावे काय संदेश देतो आहोत पिढीसाठी.. इतकं का बोल्ड व्हावं ट्रोल होण्यासाठी
इतकं का ट्रोल व्हावं फेमस होण्यासाठी
काय परिधान करावं ज्याचा त्याचा प्रश्न आहे
इतकं पहावे काय संदेश दे

Guruprasad

सकाळी डोळे उघडण्यपूर्वी ज्याचा चेहरा पाहण्याची इच्छा होते ते प्रेम आहे… मंदिरा मध्ये दर्शन करताना जो जवळ असल्याचा भास होतो ते प्रेम आहे…

read more
प्रेमाचा अर्थ. ❤️ सकाळी डोळे उघडण्यपूर्वी
ज्याचा चेहरा पाहण्याची इच्छा होते
ते प्रेम आहे…

मंदिरा मध्ये दर्शन करताना
जो जवळ असल्याचा भास होतो
ते प्रेम आहे…

बी.सोनवणे

" मुलगी म्हणजे" "मुलगी' म्हणजे आमचा वारसा 'मुलगी' मायबापाचा अभिमान, ज्याचा पोटी जन्मली 'मुलगी" त्यांचा जीवनाचा तो स्वाभिमान...! आदर्शाची म

read more
" मुलगी म्हणजे"

"मुलगी' म्हणजे आमचा वारसा
'मुलगी' मायबापाचा अभिमान,
ज्याचा पोटी जन्मली 'मुलगी"
त्यांचा जीवनाचा तो स्वाभिमान...!

आदर्शाची मूर्ती असते 'मुलगी"
दिव्याची ध्येय प्रकाशित ज्योत,
संस्कृती,संस्कारी अशी ती "लेक"
मायबापाची अलौकिक प्रेरणा स्त्रोत...!

✒बी.सोनवणे
            मुंबई " मुलगी म्हणजे"

"मुलगी' म्हणजे आमचा वारसा
'मुलगी' मायबापाचा अभिमान,
ज्याचा पोटी जन्मली 'मुलगी"
त्यांचा जीवनाचा तो स्वाभिमान...!

आदर्शाची म

sandy

केल्याने होत नाही, पैशाने मिळत नाही तेच प्रेम होय.. त्यात जग दिसत नाही, जे कुणाला भीत नाही तेच प्रेम होय.. तोडल्याने तुटत नाही, जे कधी मरत न #poem

read more
केल्याने होत नाही,
पैशाने मिळत नाही
तेच प्रेम होय..
त्यात जग दिसत नाही,
जे कुणाला भीत नाही
तेच प्रेम होय..
तोडल्याने तुटत नाही,
जे कधी मरत नाही तेच प्रेम होय..
ज्याची श्रद्धा मनात आहे,
ज्याचा आनंद त्यात आहे
तेच प्रेम होय.. केल्याने होत नाही,
पैशाने मिळत नाही
तेच प्रेम होय..
त्यात जग दिसत नाही,
जे कुणाला भीत नाही
तेच प्रेम होय..
तोडल्याने तुटत नाही,
जे कधी मरत न

vaishali

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे लॉकडाऊन ची पहिली रात्र - एक गोष्ट ३ वाक्यात... आजपासून सुरुवात करूया लहान गोष्टी पासून एखा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #लॉकडाऊनचीपहिलीरात्र

read more
विचारांचे काहूर मनात माजले
हृदयाची धडधड भीतीने वाढली
साऱ्यांनी जगण्याची जणू आशाच सोडली

 सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
लॉकडाऊन ची पहिली रात्र - एक गोष्ट ३ वाक्यात...
आजपासून सुरुवात करूया लहान गोष्टी पासून
एखा

बी.सोनवणे

धन्य ती ललना किती रे सहनशील, त्याग करीत सुखाचा दुसऱ्यांना सुखावशील ।। कैक वेदना दडविल्यास हृदयांतरीच्या कप्प्यात, दु:खाच्याच पांघरूणान #SAD

read more
धन्य ती ललना 
किती रे सहनशील, 
त्याग करीत सुखाचा 
दुसऱ्यांना सुखावशील ।। 

कैक वेदना दडविल्यास
हृदयांतरीच्या कप्प्यात, 
दु:खाच्याच पांघरूणाने
अदृश्य खपल्या जपल्यात।। 

आधार हवायं रे ज्याचा 
तोची स्वत:च अविश्वासी, 
व्यसनाच्या लालसेपोटी
दुरावून  गेलायं परिवारासी ।। 

मायाजाळ ना आपुलकी 
प्रेमबंध ना रे जिव्हाळा, 
कदर कदापी नाही केली 
कश्यला तो असा गोतावळा।। 

गर्वाने अन् अभिमानाने 
आदर्शानेच करावे कौतुक, 
अशी ती थोर नारी तिची
महती अनमोल मौलिक।। 

बी सोनवणे 
       मुंबई

©बी.सोनवणे धन्य ती ललना 
किती रे सहनशील, 
त्याग करीत सुखाचा 
दुसऱ्यांना सुखावशील ।। 

कैक वेदना दडविल्यास
हृदयांतरीच्या कप्प्यात, 
दु:खाच्याच पांघरूणान

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आताचा विषय आहे लहान मोठा पसारा... #लहानमोठापसारा चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai#YourQuoteAndMine

read more
लहान मोठा पसारा
प्रत्येकाच्या संसाराचा.
कुणाचा वितभर सुखाचा
तर कुणाचा हातभर दुःखाचा.
लहान मोठा पसारा
प्रत्येकाच्या जीवनातला.
जगताना कुणी आवरून घेताना
तर कुणी अजून पसरवून ठेवताना.
लहान मोठा पसारा
प्रत्येकासमोर पसरलेला असतो.
तो कसा आवरायचा
हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आताचा विषय आहे
लहान मोठा पसारा...
#लहानमोठापसारा
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
त
loader
Home
Explore
Events
Notification
Profile