Find the Latest Status about मिळालेली मते from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मिळालेली मते.
Sangeeta Kalbhor
बाकी असणारचं आहे.. वाटतात गाडून टाकाव्यात मनातल्या भावना अगदी खोल खोल...त्या कोणाच्याही नजरेस येऊच नयेत...किंबहुना मीही कधी त्या उकरायच्या म्हंटल्या तरी त्याचे माणिकमोती बनावेत आणि यावे त्या विचारांनी आपल्या दुसऱ्या रुपात... हे असे म्हणण्या पाठीमागचे कारण असे आहे ना की काही भावना उगाचंच आपले मानसिक स्वास्थ्य खराब करतात... काही काही देणेघेणे नसताना... येते मरगळ मनाला आणि नंतर शरीराला आणि मग एकूणच जगण्याला..तेव्हा मग नको नको जीव होतो... शांत व्हायला आणि त्यातून बाहेर पडायला मनाची आणि विचारांची कोण मशागत करावी लागते काय सांगू... आणि मला तर या विचारांचा आणि भावनांचा जाम त्रास होतो...अगदी नको नकोसा करणारा.. एक ठराविक वेळ आणि काळ जाईपर्यंत हे विचारांचे गारुड नाही हटत ध्यान पटलावरुन... सारखे आपले तेचं तेचं आठवून आणि साठवून होतो त्रागा जो कधीकधी मलाही कळत नाही का आणि कशासाठी... तसं पाहिले तर या जीवसृष्टीमध्ये कोण कोणाला समजून घेते हो...अगदी जीवातला जीव जरी काढून ठेवला तरी एखाद्या दगडाला तो काय समजणार? निर्दयी त्या जीवाला मारेल ठोकर आणि म्हणेल... " बसं...की अजून काही' ' अशा वेळेस हा आपला मुर्खपणा असतो तो कळतो आपणास पण जेव्हा जीव हेका धरतो ना तेव्हा सगळ्या जाणीवा आणि विचारांना तिलांजली मिळालेली असते.. शहाण्यातला शहाणा आणि लहाणातला लहाणही या मनाच्या आणि जीवाच्या पुढे गुडघे टेकवतो.. स्वतःला अपराधी मानतो...हताश होतो... हे थोडे अधिक प्रत्येकाच्या बाबतीत झालेले असते...असावे... मग यावर उपाय काय तर मनावर लगाम घालायचा ...हासूड मारायचा आणि तरीही विचार नाहीत थांबले तर सरळ वेसन घालायची... जरा जरी इकडे तिकडे विचार किंवा भावना झाली की लगेचच इकडून दोर कसायचा...जाम...म्हणजे लागेल ओढ आणि थांबेल विचार रुपी जनावर..तिथल्या तिथे आणि राहील शांत जिथे आपल्याला हवे असेल... मला तरी असे वाटते की आपण आपले असतोच कुठे जेणेकरून आपण झोकून द्यावे एखाद्या भावनेत आपल्याला... अनेक नात्यांची गुंफण बनली की एक अख्खं आयुष्य आपल्याला मिळते...महत्प्रयासाने.. काय अधिकार असतो आपला आपल्यावर... नक्कीच नाही... जेव्हा केव्हा येतील भावनांचे ढग एकवटून तेव्हा आवश्यक असेल तर त्या ढगांना होऊ द्यावे रिक्त मनसोक्तपणे... कुठलाही आणि कोणाचाही विचार न करता जावे आपण आपल्या अंतःकरणाच्या प्रांगणात...प्यावे वारे आणि व्हावे टपोरे थेंब...सर्वांगावरुन अलगद ओघळणारे आणि तनामनाच्या संपूर्ण जाणीवांना नखशिखांत मुग्ध करणारे... व्हावा आपणच आपला सखा आणि लावावे पळवून दुःखा..... जमेल का हे मला तरी जे मी माझ्या लेखणीतून स्त्रवू दिलेय.... कदाचित...नव्हे ...नक्कीच होईल... आताच पहा ना माझी भावनांची उतरंड बरीच वरपर्यंत रचत चालली होती पण जसजसा मी उतरंडीच्या पहिल्या गाडग्याचा विचार केला आणि पाहिले आत तर खरंच काही नाही सापडले हो...तिथे केवळ रिक्त पोकळी होती जिच्यात मला हवे ते भरता येईल अशी....असेच वरच्या प्रत्येक गाडग्यात आढळले... मग मी प्रत्येक गाडग्याचा विचार केल आणि भरुन टाकले मला घडविणाऱ्या विचारांनी... आता ना कुठला विचार ना कुठली भावना... आता आहे फक्त नव्याने आपल्याशा केलेल्या भावना आणि त्यांना जगविण्यासाठी स्वतःला जगविण्याचा अट्टाहास..... बाकी असणारच आहे लेखणीत नेहमी मी माझी..... गढलेली...दडलेली आणि वेढलेली..... मी माझी..... ©Sangeeta Kalbhor #Hope बाकी असणारचं आहे.. वाटतात गाडून टाकाव्यात मनातल्या भावना अगदी खोल खोल...त्या कोणाच्याही नजरेस येऊच नयेत...किंबहुना मीही कधी त्या उकरा
Prerana Jalgaonkar
नको मला काही... गुलाबी थंडीतली तुझ्या स्पर्शाची गुलाबी ऊब मला हवी... --प्रेरणा प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों शुभ प्रभात... डिसेंबर आला कि चाहुल लागते ती नाताळ ची आणि नवीन वर्षाची. ह्या नाताळच्या सणाला भेटवस्तु देण्याची प्
Prerana Jalgaonkar
मी लिहिलेलं एक पत्र प्रिय बाई, ( पूर्ण पत्र 👇) प्रिय बाई, नुकताच शिक्षक दिन होऊन गेला.तुम्ही शिकवलेलं सर्व आठवत अजून. तसं एरव्ही काही लिहिताना, वाचताना, वाचलेलं समजून घेताना तुमची आठवण आल
Prerana Jalgaonkar
नको मला काही... गुलाबी थंडीतली तुझ्या स्पर्शाची गुलाबी ऊब मला हवी... --प्रेरणा प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों शुभ प्रभात... डिसेंबर आला कि चाहुल लागते ती नाताळ ची आणि नवीन वर्षाची. ह्या नाताळच्या सणाला भेटवस्तु देण्याची प्
Prerana Jalgaonkar
मी लिहिलेलं एक पत्र प्रिय बाई, ( पूर्ण पत्र 👇) प्रिय बाई, नुकताच शिक्षक दिन होऊन गेला.तुम्ही शिकवलेलं सर्व आठवत अजून. तसं एरव्ही काही लिहिताना, वाचताना, वाचलेलं समजून घेताना तुमची आठवण आल
Anekanth B
मराठी भाषा सुंदर आहे कारण हे फक्त महाराष्ट्राची भाषा नसून, एक महान राष्ट्राची भाषा आहे। प्रिय लेखक आणि लेखिकांना माझा सस्नेह नमस्कार.🙏 सुप्रभात. आजच्या दिवसांची सुरुवात भाषा या विषयावरुन होईल. भाषा नसती तर आपण आपलं मत,भावना,विच
Vikrant Gosavi
योगायोगाने आज योगा करण्याचा योग आला, शवासन हे उत्तम आसन असा निर्धार करून मी ही तो आनंदाने केला. नमस्कार माझ्या लेखक मित्रानों आज आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. त्यानिमित्य आजचा विषय आहे योग... शारीरिक व मानसिक अनारोग्याचे निवारण व्हावे यासा
Anekanth Bahubali
मराठी भाषा सुंदर आहे कारण हे फक्त महाराष्ट्राची भाषा नसून, एक महान राष्ट्राची भाषा आहे। प्रिय लेखक आणि लेखिकांना माझा सस्नेह नमस्कार.🙏 सुप्रभात. आजच्या दिवसांची सुरुवात भाषा या विषयावरुन होईल. भाषा नसती तर आपण आपलं मत,भावना,विच
Sujata Darekar
मध माधुर्याची खाण मराठी संस्कृतीचा गोड वाण मराठी नसा नसातील प्राण मराठी महाराष्ट्राचा अभिमान मराठी ओठावरील मधुर गीत मराठी कणा कणात संगीत मराठी हृदयी वाहते ती प्रीत मराठी प्रत्येक माणसाचा मीत मराठी भाषेचं अलौकीक साज मराठी वीरगाथेचं अप्रतिम बाज मराठी नभात गडगडता गाज मराठी रक्तात सळसळता माज मराठी संत परंपरेचं लावण्य मराठी मायबोलीचं कारुण्य मराठी हळव्या मनाचं दातृत्व मराठी मराठमोळ्याचं अस्तित्व मराठी प्रिय लेखक आणि लेखिकांना माझा सस्नेह नमस्कार.🙏 सुप्रभात. आजच्या दिवसांची सुरुवात भाषा या विषयावरुन होईल. भाषा नसती तर आपण आपलं मत,भावना,विच
Rashmi Hule
सहज जाता जाता झाडावरचे आंबे चिंचा पाडाव्यात असे वाटे शेजारी बसलेल्या मित्राला अलगद चिमटा काढावासा वाटे बाजुने चाललेल्या बहिणी वा भावाचे हळुच केस ओढावेसे वाटे दिसले आईस्क्रीम तरी तोंडाला पाणी सुटे कुठे गेले हो बालपण? अजून अपुल्या आत भेटे फक्त जपावे त्या बालमनाला,फार होऊ नये मोठे.. माझ्या सर्व मित्र मैत्रिणींना बालदिनाच्या शुभेच्छा 💐🍡🍧🍬🍭🍫🍮🍩🍰🍥🍦🍚 प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आज 14नोव्हेंबर म्हणजेचं माननीय पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती,म्हणजेच बालक दिन. मुलांचे हक्क आणि मुलांच्या शिक