Find the Latest Status about असे जगावे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, असे जगावे.
Sujata Darekar
असे जगावे जगण्याचे जणू सोने व्हावे तव जीवनाचे खणखणीत रे नाणे व्हावे असो ऋतु कोणताही वसंतापरी फुलावे ओल्या-सुक्या फांदीचे तू पान गर्द व्हावे आलास तू एकदाचा, येशील ना परतुनी हृदयानी जगून घे सारी नाती जीवे भावे दूरवरी जेथे जेथे, तू बघशील तेथे तेथे तुझेच नाम सर्वमुखी सन्मानाने असावे तू असा घडवून जा इतिहास जीवनाचा चराचरात, सकल जनात जे नीत्य वसावे नमस्कार मित्रानों आजचा विषय आहे असे जगावे... #असे #जगावे #yqtaai #collab Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAnd
yogesh atmaram ambawale
पाहिले मी,स्वप्न असे जगा वेगळे, मानवता हा एकच धर्म,जात पात विसरले सगळे. कुणीच न दगलबाज,ना कुणी ढोंगी बगळे, भेदभाव न कुणाच्या मनी,एकच आपण सगळे. पाहिले मी स्वप्न असे जगा वेगळे, हिंसा न कुठे ना कुठे द्वेष,मत्सर पाहिले, प्रेमच प्रेम सर्वत्र एकमेकांसाठी सर्वच जिवलग होऊन वागले. स्वप्न असे जगावेगळे पडले जागलो सारी रात्र, असावे खरंच जगात हेच चित्र सर्वत्र वैरी न कुणी कुणाचे सर्वच एकमेकांचे मित्र. सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे स्वप्न असे जगा वेगळे.. #स्वप्नअसे हा विषय
Akki
जगावे असे की मरणे अवघड होईल, हसावे असे की रडणे अवघड होईल, कुणाशीही प्रेम करणे सोप्पे आहे, पण प्रेम टिकवावे असे की तोडणे अवघड होईल. ©Akki जगावे असे की मरणे अवघड होईल,
nisha Kharatshinde
जगावेतर सर्वांना लागते सुंदर या आयुष्याला सुखदुखातून फुलवावे लागते जबाबदारीच्या ओझ्याखाली स्वत:लाही शोधावे लागते विस्कटलेल्या आयुष्याची घडी एका बाजूनेच दुमडावी लागते समाधानाची ईस्त्री त्या सुरकुतलेल्यावर फिरवावी लागते प्रगतीच्या मार्गतील काट्यांवर कधी अणवाणीही चालावे लागते संपत नसलेली पायवाट... उगाचच हसून चालावी लागते आयुष्याचा अर्थ ज्याला कळला त्याला क्षणालाही थांबवावे लागते कुणा वेळाने कळेल न कळेल जगावे तर सगळ्यांना लागते ✍️काव्यनिश ©nisha Kharatshinde जगावे तर सर्वांना लागते
Shree mobile
माणसं न माणूस म्हणून जगावे हाच मानवता धर्म आहे माणसं ने माणूस म्हणून जगावे..
Mahesh Lokhande
#OpenPoetry असे वाटे आकाशाच्या सागरी पाहता मेघलाटा होडी घेऊन जावे वाटे शोधाया वाटा पृथ्वीपासून चंद्रापर्यंत बांधूया पूल सूर्यावर रंगीबेरंगी पांघरूया शाल वाटे लावू शर्यत या भव्य सागरात तार्यांचे मोती घेऊन येतील हात असे वाटे तारे वेचून काढावी नक्षी वाटे बनावा ब्रह्मांडात फिरणारा पक्षी असे वाटे ध्रुवासोबत खेळाया जावे तारकांसोबत फेर धरूनी गावे नाचावे वाजेचा चाबूक घेऊनी सूर्यरथी बसावे ग्रहतार्यांच्या भेटी घेत दशदिशांत हिंडावे असे वाटे