Find the Latest Status about उगवला चंद्र पुनवेचा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, उगवला चंद्र पुनवेचा.
Mahesh Lokhande
स्वातंत्र्याचा सूर्य उगवला स्वातंत्र्याचा सूर्य उगवला तेज चहूकडे फाकले स्वातंत्र्याच्या या तेजाने विश्व सारे दिपले॥धृ॥ फळाफुलांनी नटली अवनी कृतार्थ झाली इथली जननी शेतकरी हा समर्थ झाला हरितक्रांतीने हे केले॥1॥ दुधातूपाची अवतरली गंगा कृतार्थ केले भारतीयांना गुरे वासरे नाचू लागली धवलक्रांतीने हे केले॥2॥ साक्षर झाली इथली जनता कृतार्थ झाली भारतमाता सिलीकाॅन व्हॅलीमध्ये जाऊनी संशोधन यांनी केले॥3॥ अमेरिकेने तंत्र न दिले हिंदपुत्राने स्वतःच मग महासंगणक बनवले माहिती तंत्रज्ञानाने हे केले॥4॥ कवी=महेश लोखंडे स्वातंत्र्याचा सूर्य उगवला
स्वातंत्र्याचा सूर्य उगवला #poem
read morenisha Kharatshinde
रवी उगवला नाही पाहण्यास आज रवीस सजूनी पहाट आली शृंगार वाट पाहे अन् रवी उगवला नाही चमकूनी दवबिंदू ते थबकले पानांवरी भ्रमरही गुंजारव मग करु लागले सुमनांवरी दाट धुक्यात त्या पहाटही सज्ज होती नेसुन शालू हिरवा प्रतिक्षेत उभी होती प्रसन्नतेचा शुभ्र पिसारा अतुरता ही वाढलेली क्रूर मेघ दाटून गडद वाट रवीची रोखलेली ✍️निशा खरात/शिंदे (काव्यनिश) ©nisha Kharatshinde रवी उगवला नाही
रवी उगवला नाही #मराठीकविता
read moreVishal Chavan
पौर्णिमा... डोळे भरुन बघून घेतो, सजलेलं चंद्रबिंब.. मन भरून जगतो, होतो आनंदात चिंब... पूनवेच्या चंद्रासम, सजू दे उपेक्षितांच आयुष्य.. अस्तित्वावर तलवार ज्याच्या, मिळो त्याला भविष्य... चंद्र शिंपण करत फिरतो, चांदणं वत्सल चंदेरी... चंद्र आहे हा विश्वास असुदे, आली रात्र जरी अंधारी.. अमावस्येला असतो तो, तुला तो विसरत नाही.. एक दिवस विश्रांती घेतो, विश्रांती घेतो; मरत नाही... 17-12-2021 Vishaal/Aadinaath ©Vishal Chavan चंद्र
चंद्र #मराठीशायरी
read moreकवी - के. गणेश
सुगंध तुझ्या सहवासाचा अंगणी माझ्या दरवळत राहतो.. पूनवेच्या चंद्राची शीतलता मी तुझ्या रुपात पाहतो..! चंद्र..
चंद्र..
read moreSuraj Agade
काय बरे झाले असावे चंद्राला, का रडतोय तो घेऊन ढगांचा सहारा...?? त्यालाही असावे का कसले दुःख, की त्यालाही मग आठवणींचा सहारा.?? #चंद्र
pratiksha's poem
रात्रीच फक्त दिसतोस तु.. मनातल्या मनात जणु हसतोस तु.. दु:खाच्या अंधाऱ्या रात्रीत तुझ्या सुखाचा प्रकाश असाचं राहु दे.. चमचमत्या चांदण्यात तुझं अस्तित्व आम्हाला नेहमी दिसु दे.. आणि आमचा लाडका चांदोबा म्हणुऩ तुझं स्थान आमच्या ह्रदयात असचं वसु दे.. #gif चंद्र...
चंद्र... #Gif
read morenisha Kharatshinde
कोजागिरीचा चंद्र माझा तोच चॉंद तूझ्या ईदचा सर्वधर्म ठेव एकभाव वाहूदेत झरा भावनांचा ✍️काव्यनिश ©nisha Kharatshinde चंद्र
चंद्र #मराठीकविता
read moreउमा जोशी
मावळतीला जातोस तू उगवतीचा घेऊन निरोप चंद्र खेळतो मग आभाळी अंधाराचा त्यावर आरोप @गुज ©उमा जोशी #चंद्र