Nojoto: Largest Storytelling Platform

New जबाबदारी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जबाबदारी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जबाबदारी.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे जबाबदारीचं ओझ.. #जबाबदारीचंओझ चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine #bestofyqmarathiquotes

read more
जबाबदारीचे ओझं हे असे ओझं आहे
जे वाढत्या वयानुसार वाढत जातं.
लहानपणी जबाबदारीचे ओझे होते ते अभ्यासाचे,
गुरुजनांनी चांगले शिकविले हे दाखविण्यासाठी उत्तीर्ण होण्याची जबाबदारी.
मोठे होताच कर्ता झालास असे ऐकावे लागल्यामुळे घराची जबाबदारी.
कर्ता, कमविता झालो म्हणून कामाची जबाबदारी.
वयात आलो म्हणून घरच्यांनी लग्न लावले दिली संसाराची जबाबदारी.
सुखी संसारात मुलांचे आगमन झाले,
त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी.
आई वडील वृद्ध झाले म्हणून त्यांना योग्य प्रकारे सांभाळण्याची जबाबदारी.
मुले मोठे होत जाता त्यांच्या शिक्षणाची,भविष्याची जबाबदारी.
असे एक ना अनेक जबाबदारीचे ओझे
खांद्यावर घेऊन मी जगत आहे,
जबाबदारीचे गांभीर्य ओळखून
आयुष्याच्या संघर्षाशी मी चांगलाच लढत आहे. शुभ संध्या मित्रहो 
आताचा विषय आहे
जबाबदारीचं ओझ..
#जबाबदारीचंओझ
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? मित्रानों आजचा विषय आहे जबाबदारीच्या ओझ्याखाली.. #जबाबदारीच्याओझ्याखाली हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
प्रत्येक कर्तव्य मी निभावत गेलो,
जबाबदारीच्या ओझ्याखाली पूर्णता दबून गेलो| शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
लिहीताय ना?
मित्रानों आजचा विषय आहे

जबाबदारीच्या ओझ्याखाली..
#जबाबदारीच्याओझ्याखाली
हा विषय

SUMEET

आपल्याला हवं हवसं वाटणारं आयुष्य 
कधी कधी 
नकोसं वाटायला लागतं ना तेव्हा खूप त्रास होतो.

SUMEET #जबाबदारी

आशिष गंगाधरजी चोले

जबाबदारी

read more
ज्यावर येते ना जबाबदारी
           त्यालाच समजते दुनियादारी
हे असंच असते वाऱ्यावरी
         कळत नकळत तुझ्या माझ्या सर्वांवरी
भूक नाही तहान नाही फिरतो दारो दारी
         जेव्हा येते ना जबाबदारी
एकांतात वाऱ्याला सांगतो मंजुळ गाणी
     नसतांना सोबती कुणी असते डोळ्यांत पाणी
खोटा हसरा चेहरा चिंता मात्र अंतरी
     पाहुनी वेदना माझ्या ढग ही रडले अंबरी 
हरणार नाही मी किती ही येऊ दे अडचणी
      चालतील पाऊले फक्त यशाच्या च दिशेनी
रोज ची च ही कटकट काय करावे सुचेना
    नशिबाची थट्टा की कुचेष्टा मज कळेना 
ज्यावर येते ना जबाबदारी
           त्यालाच समजते दुनियादारी
                           लेखन:-आशिष गंगाधरजी चोले जबाबदारी

ChetaN Gangurde

कर्तव्य त्याचे बजावून, त्याच्या जागेवर तो बसला...

एवढं सगळं करूनही बिचारा एकटाच झोपी गेला...

                                                                                                                 .....ChetaN #जबाबदारी

Suyash Ananda Gulig

साऱ्यांच्याच हातात पाठीवर, खांद्यावर 
ओझी असतात काहींची दिसतात 
तर काहींची दिसत नाहीत. 
काहींना ती जाणवतात दिसतात 
पण काहींना ती बघायचीच नसतात 
आता कोणी बघितलं नाही किंवा 
दिसलं नाही म्हणुन त्यापासून मुक्तता 
होते असं नाही. 
आपली ओझी, आपली  जबाबदारी 
आपल्यालाच उचलावी लागते.-सुयश;

©Suyash Ananda Gulig #ओझी #जबाबदारी

kavi sagar chavan

जबाबदारी #Nature #विचार

read more
जबाबदारी खांद्यावर अली कि आपण केव्हां मोठं झालो ..हे निश्चितपणे सांगता येत नाही!"

©kavi sagar chavan जबाबदारी

#Nature

Sushant Otavkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे जबाबदारी... #जबाबदारी१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with #brokenfriendship #मैत्रीच्या_आठवणी

read more
हि अशी गोष्ट आहे..
जी खांद्यावर पडली की माणूस आपली स्वप्न, 
हौस- मौज , मजा - मस्ती, इच्छा - आकांशा 
सर्व काही विसरतो.... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
जबाबदारी...
#जबाबदारी१
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with

Dhananjay(dhanuj) Sankpal

_#कवी'धनूज
रोजचा एक बलात्कार, रोजची तीच बातमी..
जीवंतपणी मेलेत शरीर कित्येक, निर्दयी, गलिच्छ नाती..
रक्ताचे पाणी झाले, झाली दिखाव्याची ख्याती..
वासनेचे पुजारी जमलेत, मेंदूच्या भोवती..
कुठली मैत्री, कुठली नाती,
लहान, थोर, ना तमा कोणत्या वयाची..
वासनाधीन नजरा लेऊनी, ओरबाडे शरीराचे काढती..
बलात्कार, बलात्कार, बलात्कार,
शब्द आमच्या अंगवळणी..
आज इथली बातमी, उद्या तिथली बातमी
चालायचं बोलूनी_ वेळ काढूनी नेती..
पायदळी तूडवूनी संस्कार,
मोठ्या दिमाखात वाचतो, ऐकतो आम्ही बलात्काराची बातमी..
कुठे पडतोय कमी, कुठे चुकतोय कोणी,
जबाबदारी नक्की कोणाची..
कोण थांबवणार, कोण बदलणार,
ही क्रूर कर्माची नाती..
जबाबदारी नक्की कोणाची.. जबाबदारी नक्की कोणाची..

©Dhananjay(dhanuj) Sankpal #जबाबदारी
#धनूज
#शायरी

Kunal Salve

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे जबाबदारीचं ओझ.. #जबाबदारीचंओझ चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

read more
घडवतं माणसाला इथं कणखर
जबाबदारीचं ओझं 
सुख दुःखात रंगवून  माणूस 
चालतो रंगेरी वाट आयुष्याची  आज 
 शुभ संध्या मित्रहो 
आताचा विषय आहे
जबाबदारीचं ओझ..
#जबाबदारीचंओझ
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile