Nojoto: Largest Storytelling Platform

New दुरंगी बाभूळ Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about दुरंगी बाभूळ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दुरंगी बाभूळ.

Related Stories

    PopularLatestVideo

Jayshree Hatagale

"बाभूळ"

आजही ती..... 
भाळते उन्हावर
माळून फुले पिवळी
गंधाळते बांधावर...... 

एकटीच असते उभी ती
प्रतीक्षेत वसंताच्या
तिच्यावरही करतात जादू
चांदण्या आसमंताच्या

उजळून निघते ती ही
शुभ्र,धवल प्रकाशात
मन तिचंही रेंगाळत रहातं
त्या निरभ्र आकाशात

माहित असते तिला
फुलांची साथ असते कमी
मग, काटेच तिला देतात
कायम सोबतीची हमी

काट्यांवरच प्रेम करत
जगते सारे जीवन
फुलांचा बहर सरल्यावर
मात्र, व्याकुळ होते मन #बाभूळ

Shankar Kamble

दूर ओसाड माळाला भार टेकतं आभाळ
शाप एकलेपणाचा भोगी काटेरी बाभळं

ताप जाळतो विखारी होरपळ सोसवेना
मंद उसासे सोबती धग कोणां जाणवेना

घेतं कानोसा सावल्या आडोशाला पहुडल्या
काटे बोचता एकाकी सख्या त्याही पांगियेल्या

टच्च दाटलं डोळ्यांत उगां हिरवं सपानं
घाली रिंगण भोवती ठेच लागलं दमानं

काळ ढळतो, पळतो पायी बांधून भोवरा 
दिसं–मासं उलटले जीव व्याकूळ बावरा 

भरभरणारा वारा देई सांगावा कसला?
कुजबूज पानोपानी रानी वळीव हसला

©Shankar Kamble #parent #बाभूळ #काटेरी #एकटी #एकाकी #विरहातल्याआठवणी #विरह_वेदना #विरह #भास #सोबत
loader
Home
Explore
Events
Notification
Profile