Nojoto: Largest Storytelling Platform

Best विरहातल्याआठवणी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best विरहातल्याआठवणी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 5 Followers
  • 5 Stories

Shankar Kamble

दूर ओसाड माळाला भार टेकतं आभाळ
शाप एकलेपणाचा भोगी काटेरी बाभळं

ताप जाळतो विखारी होरपळ सोसवेना
मंद उसासे सोबती धग कोणां जाणवेना

घेतं कानोसा सावल्या आडोशाला पहुडल्या
काटे बोचता एकाकी सख्या त्याही पांगियेल्या

टच्च दाटलं डोळ्यांत उगां हिरवं सपानं
घाली रिंगण भोवती ठेच लागलं दमानं

काळ ढळतो, पळतो पायी बांधून भोवरा 
दिसं–मासं उलटले जीव व्याकूळ बावरा 

भरभरणारा वारा देई सांगावा कसला?
कुजबूज पानोपानी रानी वळीव हसला

©Shankar Kamble #parent #बाभूळ #काटेरी #एकटी #एकाकी #विरहातल्याआठवणी #विरह_वेदना #विरह #भास #सोबत

Shankar Kamble

किती सहजपणाने
              डाव उधळून जातो
भोगी मरण यातना
              दाह विरहाचा देतो

नको पानांची सलगी
            भाव विरक्त रंगला
पाचोळ्याचा जीव भोळा
            भास तेथेच गुंगला

थेंब थेंब सावलीत
             ठिबकत क्षण ओला
घेई टिपून हळूच
            सांज कातर वेळेला

नको लावूस उशीर
           वेल आशेची सुकली
डोळे न्याहाळती तुला
            वाट कशी रे चुकली?

उर हापापतो आज
            नावं येता ओठांवर
तुला तेंव्हाच गोंदले
            भाव मनः पटावर

पिऊ टिपूर चांदणे
           झुलू स्वप्नांचाच झुला
खूप बरसणे आहे
           फक्त ओंजळ दे मला

©Shankar Kamble #Colors #प्रेम #प्रीत #विरह #विरह_वेदना #विरहातल्याआठवणी #विरही_जीवन… #विरहकविता #तू #तू_आणि_मी

Manasi Ghatge

नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे विरहातल्या आठवणी... #विरहातल्याआठवणी चला तर मग लिहूया. हा विषय Bhushan Jagtap यांचा आहे.

read more
विरहातल्या आठवणी 
दूर राहुनी छळतात तूझ्या  
विरहतल्या त्या आठवणी 
डोळ्यातून दाटूनी अस्व बनुनी कायम वाहत राहतात
विरहतल्या त्या आठवणी 
क्षणोक्षणी तुला भेटण्यासाठी तरसवतात
विरहतल्या त्या आठवणी 
दिवसां मागुनी दिवस जात राहतात
सरते शेवटी सोबत कायम राहतात
विरहतल्या त्या आठवणी 
 नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
विरहातल्या आठवणी...
#विरहातल्याआठवणी

चला तर मग लिहूया.
हा विषय Bhushan Jagtap यांचा आहे.

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile