Find the Latest Status about असे करते from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, असे करते.
Mahesh Lokhande
#OpenPoetry असे वाटे आकाशाच्या सागरी पाहता मेघलाटा होडी घेऊन जावे वाटे शोधाया वाटा पृथ्वीपासून चंद्रापर्यंत बांधूया पूल सूर्यावर रंगीबेरंगी पांघरूया शाल वाटे लावू शर्यत या भव्य सागरात तार्यांचे मोती घेऊन येतील हात असे वाटे तारे वेचून काढावी नक्षी वाटे बनावा ब्रह्मांडात फिरणारा पक्षी असे वाटे ध्रुवासोबत खेळाया जावे तारकांसोबत फेर धरूनी गावे नाचावे वाजेचा चाबूक घेऊनी सूर्यरथी बसावे ग्रहतार्यांच्या भेटी घेत दशदिशांत हिंडावे असे वाटे
nitin pawar
असे का? फुलावरी प्रेम तुझे, नि काटे तुझ्या वाट्याला, वाटे हसावे जरी तुला, रडणे तुझ्या ओटाला..... नाही सुखाचा क्षण, परी डोंगर दुःखाचा, इच्छा जगण्याची पण, उरी कोपरा मरणाचा...... काळ्या मातीला ऊन, सागरा पाऊस का? पाणी अथांग जरी, तुझी तहान तशीच का?..... वागली जरी सत्याने, घाव दुःखाचे तुजवरी, वागतात असत्याने जे, सत्य मात्र त्यांच्या पदरी..... नितिन पवार नागुरकर..... ✍️ 9921429995 असे का?