Nojoto: Largest Storytelling Platform

New आई माझी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आई माझी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आई माझी.

    LatestPopularVideo

mauli pawade

Siddhesh Bendre

आई ( माझी कविता ) #raindrops

read more
आई जणू आभाळातील शुक्र तारा, 
सुंदर मोरावरचा रंगीत पिसारा ! 

आई म्हणजे चहातील गोड साखर, 
आई म्हणजेच प्रेमाचं सर्वोच्च शिखर ! 

 आई म्हणजे सुवर्ण सुखाचे क्षण, 
 आई म्हणजे मायेचं हळवं  मन ! 

 किनारा नसलेला प्रेमाचा सागर म्हणजे आई, 
 अष्‍टपैलू कलांचा जागर म्हणजे आई ! 

 मिठाईतला पाक म्हणजे आई, 
 प्रेमा सोबत डोळ्याचा धाक म्हणजे आई  ! 

 अंधारातील प्रकाश म्हणजे आई, 
 नेहमी सोबत असणाऱ आकाश म्हणजे आई ! 

 चांगल्या कर्माचं फळ म्हणजे आई, 
 दहा हत्तींचे बळ म्हणजे आई !

 आई म्हणजे त्या ईश्वराचा चमत्कार, 
 अशा या आईला माझा साष्टांग नमस्कार ! 

 अशा या आईची राहो  सर्वांवरती माया,
हात जोडुनी विनवणी करतो तुला विठुराया !! 
              -- सिद्धेश बेंद्रे 💞 आई ( माझी कविता )

#raindrops

pournima sadavarte

# माझी आई ,माझी माऊली,💖 कविता☺️ #MothersDay2021

read more
"आ" म्हणजे "आत्मा"....
"ई" म्हणजे "ईश्वर'......
त्यातुन निर्माण झाली आई।।
देवाची ही साऊली....
तुच माझी माऊली......
तुच माझी प्रेरणा ...
तुच माझी श्रद्धा .....
विश्वास रूप तुच अनंत....
किती ग सोसल्यास तु यातना ....
बसले हातास चटके.....
घेतले तरी स्वतः वर संकटे....
तुच माझी माऊली ...
तुच माझी साऊली....
भीती नसते ,जगाची तु
चालती जेव्हा सोबती.....
माझी आई माझीच प्रेमळ माऊली"....।।

©pournima sadavarte # माझी आई ,माझी माऊली,💖
कविता☺️

#MothersDay2021

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो कसे आहात? आज मातृदिन आहे त्यामुळे तुमचा आमचा सर्वांचा आवडता विषय देत आहे माझी आई... #माझीआई #Collab #yqtaai Best YQ Ma #YourQuoteAndMine

read more
माझी आई फक्त तीच नाही
जिने मला जन्म दिला,
तर माझी आई ती प्रत्येक स्त्री जिच्यात मला ताई माईचा चेहरा दिसला.
हे मी लिहिले खरे पण
हे लिहिण्याची प्रेरणा म्हणजेच माझी आई,
प्रत्येक स्त्री त शोधावी आपली आई
हीच शिकवण जिने दिली
ती माझी आई.
देवभक्ती पेक्षा ही श्रेष्ठ भक्ती ती,
देवाच्या आधी जो पूजितो आई. शुभ संध्या मित्रहो
कसे आहात?
आज मातृदिन आहे त्यामुळे 
तुमचा आमचा सर्वांचा आवडता विषय देत आहे
माझी आई...
#माझीआई 
#collab #yqtaai 
Best YQ Ma

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माझी आई. #माझीआई1 चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #

read more
जगात सर्वात प्रिय मला,माझी आई,
जिच्याशिवाय एक ही दिवस मला करमत नाही.
आजपर्यंत तिच्यापासून मी कधीच दुरावलो नाही,
आणि तिने ही मला कधीच कुठलेच काम करू दिले नाही.
सतत तिचे एकच म्हणणे तू थांब मी सर्व करते आहे,
इतकं सर्व करताना ती हे ही विसरत आहे.
आता ती फक्त आई नाही तर सासू आणि आजी ही आहे,
माझी आई आज ही सर्वप्रथम माझी आई म्हणूनच वावरत आहे.
नातवंड घरात असताना ही आई मलाच जास्त जीव लावत आहे,
मुली ही माझ्या मग आईला चिडवत आहे,
तुझा मुलगा नंतर पहिले आमचा पप्पा आहे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
माझी आई.
#माझीआई1
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai
#

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो कसे आहात? आताचा विषय आहे माझे विश्व... #माझेविश्व चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा आणि लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
माझे कुटुंब हेच माझे विश्व आहे,
विश्वात माझ्या आई,मी,सौभाग्यवती आणि दोन मुलींचे वास्तव आहे.
आई माझी सांभाळते घरा,अजूनही तिच्याच हातात व्यवहाराची धुरा.
सौभाग्यवती आमच्या मुलींची घेतात काळजी,नि त्यांच्याच अंगावर अभ्यासाची जबाबदारी.
मुली ही दोघी खूपच हुशार,छोटी खूप अतरंगी,मस्ती करणार 
आणि मोठी मात्र नेहमीच शांत राहणार.
मी कुटुंब प्रमुख नेहमीच तटस्थ राहतो,
कुटुंबातील प्रत्येकाची बाजू व्यवस्थित धरून ठेवतो
माझे कुटुंब हेच माझे विश्व इथे नेहमीच आनंद असतो,
कितीही दुःख आले जीवनात तरी चेहऱ्यावर काही दाखवत नसतो. शुभ संध्या मित्रहो
कसे आहात?
आताचा विषय आहे
माझे विश्व...
#माझेविश्व
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा आणि लिहीत राहा.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे कुटुंब प्रेम.. #कुटुंबप्रेम चला तर मग लिहुया. हा विषय wonder thoughts यांचा आहे. #YourQuoteAndMine #yqtaai

read more
माझे कुटुंब हेच माझे विश्व आहे,
विश्वात माझ्या आई,मी,सौभाग्यवती आणि दोन मुलींचे वास्तव आहे.
आई माझी सांभाळते घरा,अजूनही तिच्याच हातात व्यवहाराची धुरा.
सौभाग्यवती माझी मुलींची घेते काळजी,
नि तिच्याच अंगावर अभ्यासाची जबाबदारी.
मुली ही दोघी खूपच हुशार,छोटी खूप अतरंगी,मस्ती करणार 
आणि मोठी मात्र नेहमीच शांत राहणार.
मी कुटुंब प्रमुख नेहमीच तटस्थ राहतो,
कुटुंबातील प्रत्येकाची बाजू व्यवस्थित धरून ठेवतो
माझे कुटुंब हेच माझे विश्व इथे नेहमीच आनंद असतो,
कुटुंब प्रेम हे असंच असतं कुणाच्याही मनात राग रुसवा नसतो.
राहतो सर्व आम्ही एकत्र प्रत्येकास सांभाळून घेत असतो,
कितीही दुःख आले जीवनात तरी चेहऱ्यावर काही दाखवत नसतो. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
कुटुंब प्रेम..
#कुटुंबप्रेम
चला तर मग लिहुया.
हा विषय
wonder thoughts यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों काल जागतिक कुटूंब दिन आपण साजरा केला पण विषय आज देत आहे आजचा विषय आहे माझे कुटूंब.. माझेकु #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #माझेकुटूंब

read more
माझे कुटुंब,आई,मी,सौभाग्यवती आणि दोन मुली,
आई माझी सांभाळते घरा,अजूनही तिच्याच हातात व्यवहाराची धुरा.
सौभाग्यवती आमच्या मुलींची घेतात काळजी,
नि त्यांच्याच अंगावर अभ्यासाची जबाबदारी.
मुली ही दोघी खूपच हुशार,छोटी खूप अतरंगी,मस्ती करणार 
आणि मोठी मात्र नेहमीच शांत राहणार.
मी कुटुंब प्रमुख नेहमीच तटस्थ राहतो,
कुटुंबातील प्रत्येकाची बाजू व्यवस्थित धरून ठेवतो
माझे कुटुंब हे असे नेहमीच आनंदी असे,
कितीही दुःख आले तरी चेहऱ्यावर जास्त काळ न दिसे.
मुली माझ्या भांडतात,मस्ती करतात,
काही वेळ आखडून पुन्हा गोड बोलतात.
रागावतात,रुसतात पण 
कुटुंबातील प्रत्येकाची काळजी ही करतात. सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
काल जागतिक कुटूंब दिन आपण साजरा केला पण विषय आज देत आहे
आजचा विषय आहे
माझे कुटूंब..
#माझेकु

yogesh atmaram ambawale

नमस्कार मित्रहो आज जागतिक कुटुंब दिन आहे तुम्हा सर्वांना माझ्याकडुन कुटुंब दिनाच्या खूप शुभेच्छा. तुम्ही सुद्धा माझ्या कुटुंबाचा एक भाग आहात #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #माझेकुटुंब

read more
मी,माझी आई,सौभाग्यवती,दोन मुली.इतकेच माझे कुटुंब प्रेमाचे प्रतिबिंब
आई माझी घर सांभाळते,अजूनही तिच्याच हातात व्यवहाराची धुरा असते.
सौभाग्यवती मुलींची घेते काळजी,नि तिच्याच अंगावर अभ्यासाची जबाबदारी.
दोन मुली दोन्ही खूपच हुशार,छोटी खूप अतरंगी, सतत मस्ती करणार 
आणि मोठी मात्र नेहमीच शांत राहणार.
वडील गेल्यानंतर मीच कुटुंब प्रमुख नेहमीच तटस्थ राहतो,
कुटुंबातील प्रत्येकाची बाजू व्यवस्थित धरून ठेवतो
माझे विश्व म्हणजे माझे कुटुंब इथे नेहमीच आनंद असतो,
कधीच कुणाच्याही मनात राग रुसवा नसतो.
कितीही दुःख आले जीवनात तरी चेहऱ्यावर नेहमी आनंद असतो.
राहतो आम्ही सर्व एकत्र प्रत्येकास सांभाळून घेत असतो,
माझे कुटुंब प्रेमाचे प्रतिबिंब इतकेच आम्ही जाणतो. नमस्कार मित्रहो
आज जागतिक कुटुंब दिन आहे
तुम्हा सर्वांना माझ्याकडुन कुटुंब दिनाच्या खूप शुभेच्छा.
तुम्ही सुद्धा माझ्या कुटुंबाचा एक भाग आहात

Sujata Darekar

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आज मातृदिन आहे. सर्वांना मातृदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मला माहिती आहे तुम्ही आज भरपूर #MothersDay #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #cinemagraph #मायेचीसावली

read more
विश्वामधे कशाला येईल का तिची सर
आईविना भिकारी साक्षात देवही जर

देऊ कशी उपाधी कारुण्य, प्रेम, छाया 
आईमुळे प्रसवले, हे शब्दही खरेतर

देऊन झुंज जाते माघार घेत वादळ
वावर तिचा असा की हसते उन्हातले घर

ठिगळांमधून बघते ती चांदणे नभाचे
करते पिलांकरीता डोळ्यांत एक जागर

कादंबरी लिहू की कविता, गझल, रुबाई
ओतू कसे कळे ना शब्दात 'माय' सागर सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आज मातृदिन आहे.
सर्वांना मातृदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
मला माहिती आहे तुम्ही आज भरपूर
loader
Home
Explore
Events
Notification
Profile