Nojoto: Largest Storytelling Platform

Best Swapys_Diaries Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best Swapys_Diaries Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 34 Stories

Swapnil Shantaram Jadhav

White नुसताच भिजविणारा पाऊस बहुत झाला
एक सर हळूच यावी मन शांत शांत करणारी

अज्ञात त्या जगाच्या टोकास काय आहे
एक वाट ती मिळावी मज तेथे पोहोचविणारी

स्वप्नात रोज माझ्या चेहरे हे ओळखीचे 
एक मस्त झोप यावी स्वप्नात झोपवणारी 

रानात कोकीळ गातो हळवाच सुर त्याचा
शोधतो मी माणसे ती फक्त सत्य बोलणारी

उगाच राग येतो, अश्रू उगाच येती
एक आई द्या मला हो मला ओळखणारी

©Swapnil Shantaram Jadhav #Swapys_Diaries 
#Pennings 
#Random

Swapnil Shantaram Jadhav

Swapnil Shantaram Jadhav

किनाऱ्यावरच्या वाळू अन् लाटांचे 
जन्मांतराचे वैर आहे
तरीही ह्या वादात 
वाऱ्याचे बोलणे गैर आहे...

©Swapnil Shantaram Jadhav #OceanBeach 
#love 
#Swapys_Diaries 
#Pennings

Swapnil Shantaram Jadhav

हे हुंदके ही आता रुसूनी अबोल झाले
डोळे भरून येताच अश्रूंचे शब्द झाले

आसवे जरी माझ्या डोळ्यांतुनी निघाली
होती तुझीच सारी लपवून ठेवलेली

मी बघण्या तुलाच आलो जेव्हा तुझ्याच दारी
कळलेच नाही केव्हा सोडून गाव आलो

मग एकटेपणाची सोबत कमाल झाली
मी एकट्यात रमलो माझाच मित्र झालो

तरीही नाव ओठी आले तुझेच जेव्हा
मी त्यास तुळस समजून अखेरचा निघालो

स्वप्नील शांताराम जाधव
२६-०७-२०२३

©Swapnil Shantaram Jadhav #Swapys_Diaries 
#Pennings 
#eternal_love 
#feels_lonely

Swapnil Shantaram Jadhav

तू, मी, तुझे,माझे
तुझ्या,माझ्या आपले वगैरे....
हे इतकेच तर जग असते दोघांचे
बाकी सारे व्यर्थ वगैरे वगैरे....

©Swapnil Shantaram Jadhav #Swapys_Diaries 
#love
#eternal_bond

Swapnil Shantaram Jadhav

एवढा मी दूर आलो की न स्वतःचा राहिलो
मी स्वतःला आरशात ही बघणे टाळू लागलो

का कसे न ठावे जडले व्यसन हे हासण्याचे
मी स्वतःचे ओठ फक्त पसरवाया लागलो

अन् कधी का उमलताना वाटलो कोणास मी
कोमेजण्या आधी फक्त स्वतःला ऊन द्याया लागलो...

©Swapnil Shantaram Jadhav #Swapys_Diaries 
#Pennings 
#distance_from_me_to_me
#realisation_Of_Loneliness

Swapnil Shantaram Jadhav

हम अक्सर यह सोचते हैं 
की पहल करेगा कौन ?
लेकिन यह भी तो सोचिए 
अगर यूं ही सोचते रहे 
तो पहल करने के लिए बचेगा कौन?

©Swapnil Shantaram Jadhav #Swapys_Diaries 
#Pennings 
#lets_talk
#break_the_मौन

Swapnil Shantaram Jadhav

शेवटास माझ्यासवे कोण आहे
टाहो फोडणारे माझेच मौन आहे
हे असावेच साली मला फितूर झाली 
मी गेल्यावर दुजांचे रडणेही गौण झाले....

©Swapnil Shantaram Jadhav #Pennings 
#Swapys_Diaries 
#lone_time_poem
#poetry

Swapnil Shantaram Jadhav

अज्ञाताचा अंधारात अडकलेल्या मला
अनोळखी झाले आता सारे ओळखीचे
चाचपणाऱ्या हातातून निसटून जातो क्षण
अन् उरतं मागे काळेकुट्ट आयुष्य 
सारी सारी रात्र... 
सर्वत्र साम्राज्य पसरवलेली...
मला गुलाम बनवु पाहत्ये...सामावु पाहत्ये तिच्यात...
मला बघवत नाहीये हा काळोख
मिटून घेतलेत डोळे.... इथे सुद्धा आहे काळोख! 
बंद डोळ्यांना जरतारी नक्षी सुद्धा दिसू नये 
इतका तीव्र आहे हा काळोख
उघडायचे का डोळे? मग होईल का उजेड?
की ओढावून घेऊ कायमचा 
हा आताशा परिचीत झालेला काळोख????

©Swapnil Shantaram Jadhav #Swapys_Diaries 
#Pennings 
#Night_Love
#Poetry_Expressions

Swapnil Shantaram Jadhav

कधीतरी पान मोकळं ही ठेवायला हवं
अंधरातल्या काळ्या शब्दांना कुणीतरी वाचायला हवं

©Swapnil Shantaram Jadhav #Pennings 

#Swapys_Diaries
loader
Home
Explore
Events
Notification
Profile