Find the Best Pennings Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutpencil drawings with life quotes, simple pencil drawings of love, pen love quotes, how to lock pendrive with password, telangana pension status with aadhar card,
Swapnil Shantaram Jadhav
White नुसताच भिजविणारा पाऊस बहुत झाला एक सर हळूच यावी मन शांत शांत करणारी अज्ञात त्या जगाच्या टोकास काय आहे एक वाट ती मिळावी मज तेथे पोहोचविणारी स्वप्नात रोज माझ्या चेहरे हे ओळखीचे एक मस्त झोप यावी स्वप्नात झोपवणारी रानात कोकीळ गातो हळवाच सुर त्याचा शोधतो मी माणसे ती फक्त सत्य बोलणारी उगाच राग येतो, अश्रू उगाच येती एक आई द्या मला हो मला ओळखणारी ©Swapnil Shantaram Jadhav #Swapys_Diaries #Pennings #Random
#Swapys_Diaries #Pennings #Random
read moreSwapnil Shantaram Jadhav
White नुसताच भिजविणारा पाऊस बहुत झाला एक सर हळूच यावी मन शांत शांत करणारी अज्ञात त्या जगाच्या टोकास काय आहे एक वाट ती मिळावी मज तेथे पोहोचविणारी स्वप्नात रोज माझ्या चेहरे हे ओळखीचे एक मस्त झोप यावी स्वप्नात झोपवणारी रानात कोकीळ गातो हळवाच सुर त्याचा शोधतो मी माणसे ती फक्त सत्य बोलणारी उगाच राग येतो, अश्रू उगाच येती एक आई द्या मला हो मला ओळखणारी ©Swapnil Shantaram Jadhav #Swapys_Diaries #Pennings ##Its_about_......
#Swapys_Diaries #Pennings ##Its_about_......
read moreSwapnil Shantaram Jadhav
किनाऱ्यावरच्या वाळू अन् लाटांचे जन्मांतराचे वैर आहे तरीही ह्या वादात वाऱ्याचे बोलणे गैर आहे... ©Swapnil Shantaram Jadhav #OceanBeach #love #Swapys_Diaries #Pennings
#OceanBeach love #Swapys_Diaries #Pennings
read moreSwapnil Shantaram Jadhav
हे हुंदके ही आता रुसूनी अबोल झाले डोळे भरून येताच अश्रूंचे शब्द झाले आसवे जरी माझ्या डोळ्यांतुनी निघाली होती तुझीच सारी लपवून ठेवलेली मी बघण्या तुलाच आलो जेव्हा तुझ्याच दारी कळलेच नाही केव्हा सोडून गाव आलो मग एकटेपणाची सोबत कमाल झाली मी एकट्यात रमलो माझाच मित्र झालो तरीही नाव ओठी आले तुझेच जेव्हा मी त्यास तुळस समजून अखेरचा निघालो स्वप्नील शांताराम जाधव २६-०७-२०२३ ©Swapnil Shantaram Jadhav #Swapys_Diaries #Pennings #eternal_love #feels_lonely
Swapnil Shantaram Jadhav
एवढा मी दूर आलो की न स्वतःचा राहिलो मी स्वतःला आरशात ही बघणे टाळू लागलो का कसे न ठावे जडले व्यसन हे हासण्याचे मी स्वतःचे ओठ फक्त पसरवाया लागलो अन् कधी का उमलताना वाटलो कोणास मी कोमेजण्या आधी फक्त स्वतःला ऊन द्याया लागलो... ©Swapnil Shantaram Jadhav #Swapys_Diaries #Pennings #distance_from_me_to_me #realisation_Of_Loneliness
Swapnil Shantaram Jadhav
हम अक्सर यह सोचते हैं की पहल करेगा कौन ? लेकिन यह भी तो सोचिए अगर यूं ही सोचते रहे तो पहल करने के लिए बचेगा कौन? ©Swapnil Shantaram Jadhav #Swapys_Diaries #Pennings #lets_talk #break_the_मौन
#Swapys_Diaries #Pennings #lets_talk #break_the_मौन
read moreSwapnil Shantaram Jadhav
शेवटास माझ्यासवे कोण आहे टाहो फोडणारे माझेच मौन आहे हे असावेच साली मला फितूर झाली मी गेल्यावर दुजांचे रडणेही गौण झाले.... ©Swapnil Shantaram Jadhav #Pennings #Swapys_Diaries #lone_time_poem #poetry
#Pennings #Swapys_Diaries #lone_time_poem #Poetry
read moreSwapnil Shantaram Jadhav
अज्ञाताचा अंधारात अडकलेल्या मला अनोळखी झाले आता सारे ओळखीचे चाचपणाऱ्या हातातून निसटून जातो क्षण अन् उरतं मागे काळेकुट्ट आयुष्य सारी सारी रात्र... सर्वत्र साम्राज्य पसरवलेली... मला गुलाम बनवु पाहत्ये...सामावु पाहत्ये तिच्यात... मला बघवत नाहीये हा काळोख मिटून घेतलेत डोळे.... इथे सुद्धा आहे काळोख! बंद डोळ्यांना जरतारी नक्षी सुद्धा दिसू नये इतका तीव्र आहे हा काळोख उघडायचे का डोळे? मग होईल का उजेड? की ओढावून घेऊ कायमचा हा आताशा परिचीत झालेला काळोख???? ©Swapnil Shantaram Jadhav #Swapys_Diaries #Pennings #Night_Love #Poetry_Expressions
Swapnil Shantaram Jadhav
कधीतरी पान मोकळं ही ठेवायला हवं अंधरातल्या काळ्या शब्दांना कुणीतरी वाचायला हवं ©Swapnil Shantaram Jadhav #Pennings #Swapys_Diaries
Swapnil Shantaram Jadhav
दावू नकोस राणी तू स्पर्श माझे कुणाला पुसतिल तुला हे सारे चित्रकार कोण आहे? गंधाळून जीव जाता तू सांग मोगरा हा तू ठेव लपवूनी जी मनात बाग आहे... राधेस भुलवणारी तू धून बसुरीची तुज ओठास लावणारा तो घनश्याम आहे.... ©Swapnil Shantaram Jadhav #Swapys_Diaries #Pennings #Radhe_Krishna
#Swapys_Diaries #Pennings #Radhe_Krishna
read more