Find the Best आवडलेलंकाही Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
sonali Kulkarni
हा ठोकरून गेला, तो वापरून गेला जो भेटला मला तो वांधा करून गेला वेशीवर मनाच्या आले सवाल सारे माझा सवाल माझ्या ओठी विरून गेला माझ्याविना फुलांची दिंडी निघून गेली काटाच प्यार आता जो मोहरून गेला चाहूल ही तुझी की , ही हूल चांदण्याची ? जो चंद्र पाहिला मी तोही दुरून गेला केव्हाच आसवांची गेली पुरून गावे स्वप्नामधेच माझा रस्ता सरून गेला बोलू कुणास देई आकांत हा सुखाचा ? मागेच दुःखितांचा टाहो मरून गेला कानात कोठडीच्या किंचाळला झरोका बाहेर एक कैदी तारा धरून गेला आजन्म ही तुझी मी केल्यावरी प्रतीक्षा माझाच भास माझ्या अंगावरून गेला सुरेश भट - #RaysOfHope #आवडलेलंकाही #सुरेशभट #गझल #gazal
#RaysOfHope #आवडलेलंकाही #सुरेशभट #गझल #gazal
read moresonali Kulkarni
का तुझ्यापाशीच मन हे येत जाते सारखे अन पुन्हा तुझ्याविना हे जिंकुनी ही हारते प्रेम हे पाखरू परतुनी की जसे सांजवेळी ये घरा साथ दे तू मला, साथ दे तू मला mpm2 #river #mpm2 #मराठी #आवडलेलंकाही
#river #mpm2 #मराठी #आवडलेलंकाही #poem
read moresonali Kulkarni
जसा व्याकूळ होतो ओंडका वाहून जाताना तसे काहीतरी होते तुला सोडून जाताना जरी ह्या रोजच्या भेटी तरीही मारवा ओठी बिचारी सांज येताना, बिचारे ऊन जाताना पुढे माझी अशी काही खरी ओळख उरत नाही मला भेटून घेतो मी तुला भेटून जाताना रित्या परडीसही येतो फुलांचा गंध नेमाने तसा मी घमघमत असतो तुला वेचून जाताना तुझ्या कादंबरीमधले खुणेचे पान होतो मी तुला वाचून जाताना, तुझ्यावाचून जाताना जसे की दूरचे गाणे मनाचे स्वास्थ्यही नेते तशी पडतेस तू कानी जगाआडून जाताना -वैभव जोशी #Art #गझल #वैभवजोशी #vaibhavjoshi #आवडलेलंकाही #प्रेम #Prem
#Art #गझल #वैभवजोशी #vaibhavjoshi #आवडलेलंकाही #प्रेम #Prem #poem
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited