Nojoto: Largest Storytelling Platform
rajeshwarighume4616
  • 115Stories
  • 9Followers
  • 947Love
    380Views

Rajeshwari Ghume

  • Popular
  • Latest
  • Video
5f6922e5c66ef1997cc9d1bb82e40386

Rajeshwari Ghume

धुमसत राहतोय राग 
सतत तुझ्या मनात, 
फुंकर नको घालू त्याला 
फुलवू नकोस अंगार..
घे दीर्घ श्वास,  
हो थोडी निवांत, 
कर अस काही तरी 
जे करेल तुझं मन शांत..
मार एक चक्कर, 
घे ना एक गिरकी,
नाकावरच्या रागाला 
हळूच मार टिचकी..
वाच एक पुस्तक, 
लिही चार ओळी, 
रेखाट एक चित्र
नाहीतर  सुबक रांगोळी..
आज चार पावलं 
जास्त चाल, 
अन पुरव थोडे 
जिभेचे लाड..
एकटीनेच घालव 
तू दिवस आजचा,
तुझ्याच हातात 
आहे मार्ग सुखाचा..
- राजेश्वरी

©Rajeshwari Ghume #relaxation
5f6922e5c66ef1997cc9d1bb82e40386

Rajeshwari Ghume

शत्रूला ही गुरू माना,
कारण ' आपण काय करायचं नाही '
 हे तोच आपल्याला शिकवतो.
- वीणा

©Rajeshwari Ghume
  #वीणा #Teacherday #शत्रु
5f6922e5c66ef1997cc9d1bb82e40386

Rajeshwari Ghume

एखादी व्यक्ती जर तुम्हाला सतत सुधारण्याची संधी देत असेल तर त्या व्यक्तीसाठी "तुम्ही आणि तुमचं नातं" किती महत्त्वाचं आहे हे समजून घ्या. तिला गृहीत धरून तिचा अपमान करू नका.
- वीणा

©Rajeshwari Ghume
  #TereHaathMein #वीणा #नातं

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile