Nojoto: Largest Storytelling Platform

New येरे येरे पावसा lyrics Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about येरे येरे पावसा lyrics from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, येरे येरे पावसा lyrics.

Related Stories

    LatestPopularVideo

Mahesh Lokhande

येरे येरे पावसा #poem

read more
येरे येरे पावसा

येरे येरे पावसा
रात्री वा दिवसा
लपलास कसा
रूसू नको असा

वाढली महागाई
वाट पाहे धरणीमाई
झाली लाही लाही
रडे धाही धाही

नको करू उशीर
वेळ खूप झाला
तुझ्यासाठी मातीचा
जीव वेडा झाला

बघ बळीराजाचे 
राजेपण गेले
कर्जाचे गळ्याशी
फास  आले

सोनेरी जीवन
मातीमोल झाले
तुझ्या अमृताने
मिळू दे दिलासा येरे येरे पावसा

Prasanna

येरे पावसा... #marathi #SelfWritten #PoemIsLove

read more
येरे पावसा घेऊनि आनंद शहारा, 
थेंबातुनी दाखव अद्भुत कांचन नजारा...

आगमनवेळी  हवेतल्या  गंधात  सर्व  दंग 
छटा  आकाशी काळी  पण मनात सप्तरंग
निसर्ग जणू देतो समृद्धीचा जलइशारा 
येरे पावसा घेऊनि आनंद शहारा...

खिडकीत वाट पाहते प्रेयसी गारव्याची
नृत्य मयूरावस्था होते मग्न प्रेमपारव्याची 
वाढव प्रेमसागर मिलनास आतुरलाय किनारा 
येरे पावसा घेऊनि आनंद शहारा... 

वाहू दे कोरडपथावर खळखळून संगीतपाट 
फुटू दे सर्वत्र हिरवळीचे पाझरमाठ 
दे समद्यांना मनसमाधान अन डोईवर सुखभारा 
येरे पावसा  घेऊनि आनंद शहारा... येरे पावसा... 
#marathi #selfwritten #PoemIsLove

उ.सु

येरे येरे पावसा कसे म्हणु गीत.. nojoto #Marathipoem #MarathiKavita #paus #nojotovideo

read more

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे येरे येरे पावसा.. #येरेयेरेपावसा हा विषय Sanjay Shinde यांचा आहे. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes #YourQuoteAndMine

read more
खूप छान आठवण लहानपणची,
मनसोक्त पावसात भिजण्याची.
भिजता भिजता पावसात,
येरे येरे पावसा म्हणण्याची.
खूप छान आठवण लहानपणाची
ढगांच्या गडगडातीची नि विजेच्या चमकण्याची,
भीती वाटताच मनात पटकण घरात पळण्याची.
खूप छान आठवण लहानपणाची
बरसणारा पाऊस दारात बसून पाहण्याची
येरे येरे पावसा म्हणत जोरजोरात ओरडण्याची. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
येरे येरे पावसा..
#येरेयेरेपावसा
हा विषय
Sanjay Shinde यांचा आहे.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes

Dileep Bhope

kamble prashant

पावसा #rain

read more

Sunil Zarikar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे येरे येरे पावसा.. #येरेयेरेपावसा हा विषय Sanjay Shinde यांचा आहे. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes #YourQuoteAndMine

read more
आता फक्त तुझाच आहे भरवसा..
सुकली ही धरणी, आटले बळीराजाचेही अश्रू
त्यांची आर्त हाक ऐकुनी अजुन तुझ्या ह्रदयाला पाझर फुटला नाही कसा..
दिली खोटी बि-बियाने, दिली खोटी आश्वासने
या राज्यकर्त्यांनी त्रास देण्याचा जणु घेतलाय वसा..
बघुनी आत्महत्या लेकरांच्या गहीवरली धरणी माय अन
म्हणाली "माझ्यावर जीवापाड प्रेम करणार्‍या लेकरांना फासावर बघु कसा"..
येशील ना ऐकुनी आम्हा लेकरांची हाक, येतो विठ्ठल संकटात भक्तांसाठी जसा..
येरे येरे पावसा, आता फक्त तुझाच आहे भरवसा.. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
येरे येरे पावसा..
#येरेयेरेपावसा
हा विषय
Sanjay Shinde यांचा आहे.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes

Divya Kulkarni🐿️

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे येरे येरे पावसा.. #येरेयेरेपावसा हा विषय Sanjay Shinde यांचा आहे. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes #YourQuoteAndMine

read more
तुझी वाट पाहता,
जून सुध्धा गेला. 
गर्मी त्रास देता, 
खेळू नको मित्रा.
🙏 🙏 🙏 
लवकर पाऊस पड रे बाबा.  शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
येरे येरे पावसा..
#येरेयेरेपावसा
हा विषय
Sanjay Shinde यांचा आहे.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes

nitsmit penshanwar

आलास पावसा #raining #मराठीकविता

read more
आलास पावसा 

जरा थोडा थांबत ये
सरीत नको तर थोडा छोट्या मोठ्या थेंबात ये।।

येतांन जरा थांबत ये 
पानावर फुलांवर जरा मोत्यासारखे 
दवबिंदू सोडत ये।। 

उलाडग्या मारत नदी नाल्यांना भेट तरी दे 
कागदाची नाव सोडायसाठी जरा छोटासा
ओढा रस्त्यावर वाहु दे।। 

शेतातल्या रानातल्या प्राण्यांना फळा फुलांना 
जरा उमलु दे फुलु दे।। 

आलास पावासा जरा थोडा लवकर ये पण 
जिंब भिजवत ये।। 

नितस्मित पेंशनवार

©nitukolhe nitsmit penshanwar आलास पावसा 

#raining

Kunal Salve

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे येरे येरे पावसा.. #येरेयेरेपावसा हा विषय Sanjay Shinde यांचा आहे. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes #YourQuoteAndMine

read more
येरे येरे पाऊसा सामावून तिला तुझ्यात घे 
उपकार एक करशील बस तिला भिजवण्यासाठी
एक थेंब होऊन मला तिच्यातुन ओघळून दे ! शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
येरे येरे पावसा..
#येरेयेरेपावसा
हा विषय
Sanjay Shinde यांचा आहे.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes
loader
Home
Explore
Events
Notification
Profile