Find the Latest Status about 'गुढी पाडवा मराठी कविता' from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, 'गुढी पाडवा मराठी कविता'.
Devanand Jadhav
°गुढी पाडवा° वसंतागमनी, पहाट ती झाली ll चैतन्याची लाली, पसरली ll काठीवरी लोटा, ठेऊनी उपडा ll आणिक कपडा, बांधूनिया ll कडुनिंब डाळी, फुलहार गाठी शृंगारली काठी, उर्ध्व दिशी ll हळदी नि कुंकू, गंधाक्षदा लेप पूजन संकल्प, मनोभावे ll बंधू भाव प्रेम, समता नि एकी नांदो भुवलोकी, समाधाने ll सुख नि समृद्धी, यश आणि कीर्ती अशी ही आरती, गातो आज ll चैत्र प्रतिपदा, आला हा पाडवा ll घेऊनी गोडवा, घरोघरी ll पूर्ण होवो सारी, आपुली ती इच्छा प्रार्थतो सदिच्छा, आज दिनी ll ✍🏻© •देवानंद जाधव• धामणी, पुणे. dhamanikarsahityik.art.blog jdevad@gmail.com 9892800137 ©Devanand Jadhav गुढी पाडवा शुभेच्छा
Siddhesh mestry
तू तिथे मी इथे दिवसातून खूप आठवण तुझी येत आहे....♥️ तुझ्या आठणीत रमताना खूप मस्त वाटत कारण तुझे आणि माझे आयुष्यभराचे नाते जुळले आहे .....♥️ - तुझाच सिद्धू मराठी कविता #मराठी #कविता #मराठीकविता #peace
अमोल पाटील
मी माझ्याच मुलखात नांदतो ऐश्वर्याचा राजा , इथे फुलवल्या ऐश्वर्याच्या बागा इथले रानोमाळ सगणगंन पसरत हिरवी द्वाही आणि "मी" पण म्हणत कितीक बुडाले इथल्याच जमिनीत ही #मराठी कविता #मराठी साहित्य #वाचन #मराठी संस्कृती #मराठी कवी #मी मराठी #कविता #पल्लवी
सौ.अलका माईणकर
आयुष्य कस असाव तर उगवत्या सुर्यासारख असाव.जस सुर्याला अभिवादन करण्यासाठी अंगणात रांगोळ्या घातलेल्या असतात.उषेच दार उघडलेल असत.गोठ्यामधे धेनू आपल्या पाडसाला भेटण्यासाठी हंबरत असते.सुगंधीत वारा हा सर्व वृक्षवेलींना स्पर्श करत जाग करत असतो.दवबिंदू हे वेलीवर मोत्याप्रमाणे सजलेले असतात. भाट बनून विहंग कुंजारव करतात.आयुष्याची सकाळ ही अशी नवचैतन्याने भरलेली असावी.ना राग ना लोभ.सगळ कस सुंदर,सात्विक, निष्पाप आणि मुख्य म्हणजे आपल आचरण,आपल मन हे शुध्द असाव..अगदी निरागस बालकासारख..... #मराठी कविता
अमोल राजेंद्र उबाळे
हौस आहे ना तुला मोकळं राहण्याची मला ही आनंद होईल तुला स्वतंत्र पाहण्याची पण जेव्हा ह्या आकाशात तू मनसोक्त उडण्यासाठी पंख पांघरशील तेव्हा लोक तुझ्या कडे वाईट नजरेने पाहतील ✍️ अमोल उबाळे मराठी कविता
अमोल राजेंद्र उबाळे
ओल्या कागदा सारख केलंस ग माझं आयुष्य धड काही लिहिता ही येईना आणि जाळता ही येईना ✍️ अमोल उबाळे मराठी कविता