Find the Latest Status about दसरा 2020 from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दसरा 2020.
Mohan Somalkar
रागद्वेष सारं विसरा चेहरा ठेवा आपला हसरा असेल आला राग जरी मनाचा बुध्दीनेच ओढा कासरा ! आणि हसुन म्हणा मग HAPPY DASARA 🌷🌷🌷🌷मोहन सोमलकर नागपुर 🌷🌷 🌿🌿🌿🌿🌿🌿 ©Mohan Somalkar #दसरा
suresh pawar
रावण मिरवून अहंकार मी गिरावतो मी पण ना रामाचे गुण अंगी तरी शोधतो रावण भेटला मला रावण ज्यासी न्हवते दहा डोकी सारेच समान त्याला काय आया बहिणी सुना लेकी मुकी असते जनता होते सर्रास सीतेचे हरण ना रामाचे गुण अंगी तरी शोधतो रावण भेटला मला रावण राजकारण ज्याचे कुळ बाण शब्दाचे फेकी असे जशी उडते हवेत धूळ जाई फासावरी शेतकरी ओले अश्रूंनी आंगण ना रामाचे गुण अंगी तरी शोधतो रावण भेटला मला रावण ज्यांचे नात्यात महाभारत वाढत जातात वाद उगा आवाज उंच स्वरात लक्ष्मण रेखा नात्याची तोडतात सारे कुंपण ना रामाचे गुण अंगी तरी शोधतो रावण भेटला मला रावण झाकता माझ्या मनात वाढले ओझे अन झाली गिनती दुबळ्या दिनात धूळ धुवून जशी घेऊन जाते श्रावण खरंच येतो का जाळता लपलेला अंतरीचा रावण? रचनाकार, सुरेश पवार, #दसरा
Priyanka Jaiswal
दसरा झाली आज सकाळ सोनेरी,चेहरा आहे सर्वांचा हसरा... आनंद उधळत चोहीकडे,आला आजचा सण दसरा.. दारावर लावण्यात आली आज, तोरणे आंब्याच्या पानांची.. वर्षभर वाट पाहातात सर्व, दसरा या सणाची ........... सडा टाकुणी अंगणात, काढण्यात आली रांगोळी सुंदर.. नवे कपडे घालुनी आज,सर्व नटले मनभर....,....... आजच्याच दिवशी श्री रामाने, रावणाचा वध केला होता ... अहंकारी रावणाला त्याच्या, पापांचा दंड दिला होता..... करू आपण पण एक प्रन आज,आपल्यातल्या अहंकाराला मारण्याचा.. तेव्हाच पूर्ण होईल महत्व ,दसरा या सणाचा... आपट्याची पाने देऊन एकमेकांना, साजरा करू दसरा आशीर्वाद घेऊन मोठ्यांचा,बोलू सर्वांना हॅपी दसरा... ©Priyanka Jaiswal #दसरा
somnath gawade
दसऱ्याच्या या मंगलसमयी आपल्या सर्व ईच्छा-आकांक्षा तसेच सर्व संकल्पित मनोरथ पूर्ण होवोत ही मंगलमयी शुभेच्छा! -सोमनाथ गावडे, कृषि अधिकारी,पुणे -सौ.डॉ. कांचन गावडे दसरा
somnath gawade
'दसऱ्याच्या' मंगलसमयी आपल्या सर्व ईच्छा-आकांक्षा पूर्ण होवोत तसेच आपले संकल्पित मनोरथ पूर्ण होवोत ही मंगलमयी आणि चैतन्यदायी शुभेच्छा! -सोमनाथ गावडे -सौ.डॉ. कांचन गावडे दसरा
Vinod Umratkar
बघता चेहरा। तुझा तो हसरा। तोची हा दसरा। माझ्यासाठी।। रोजची तू अशी। दिसत राहावी। दिवाळी ती व्हावी। माझी सदा।। तूच सण माझे। दसरा दिवाळी । तुलाच ओवाळी। मन माझे।। #cinemagraph #yqtaai #दसरा #दिवाळी #yqmarathi #अभंगप्रेमvu2
Vinod Umratkar
कितीही असलो। गरीब जरी मी। वाटतो सोने मी। आज दिसी। दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा☘️☘️ #गरीब #दसरा #दसरा_शुभेच्छा #सोने #yqtaai #yqmarathi