Find the Latest Status about दुधाचा महापूर योजना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दुधाचा महापूर योजना.
Pratiksha Sanap
पावसाचा पत्ता चुकला असा कसा रे तु पत्ता चुकला संपूर्ण मराठवाडा पावसाला मुकला कोणता दिला होतास पत्ता मी तुजला पण तु तर कोल्हापुर ला सजला ...... आलास तु सांगली मध्ये धो -धो मग आमच्याशी च का खेळतोय असा खो -खो तुज्या एक -एक थेंब साठी प्राण तळमळतो उद्भवलेल्या या रोगराई ने जीव आता मळमळतो महापूर
महापूर
read moreKailas Tidke
महापुरात बुडताना गावाला कळल आपला दुष्काळच होता बरा जीवघेण्या ओलेपणापेक्षा जाळणारा उन्हाळाच खरा.. ®कैलास #महापूर
Roshan Sagar
मानावेसे तुजला हे कृष्णा अन् पंचगंगा दाखविलीसी माणसाला त्याची जागा.... लयं मातला हा सारा माणूस जाती-जातीत वाटला.. केली असेल त्याने प्रगती नाही सोडलाविला त्याने जातीचा खटला.. देवाने माणसाला धर्मात वाटून द्यावे.. काय तुझी कमाल आज साऱ्या जाती धर्माला वाहून न्यावे.... देवाला न कधी जमले ते ना कधी त्याला जमणार.. तुझ्या पाण्याचा प्रवाहाने माणसाने देवाची नाही सैनिकाचे पाय पडावे.... तुला ह्या पावसाचे तांडव करणं गरजेचं होतं.. त्यामुळेच तर जाती-धर्म एकत्र तुला करणं होतं.... जेव्हा जेव्हा या भूतलावर माणसे जातीमध्ये वाटले जातील.. मला वाटते तेव्हा तेव्हा तू त्यांना त्यांची दया दाखवशील .... कृष्णा माये आज कोल्हापूर पाण्यात मात्र आहे.. बकरी ईद अन् गणपती पूजा पण दस्तावले आहे.... नको देऊ हे सणासुदीचे क्षणीकचं सुख;.. दे आम्हाला वाटून माणुसकीचे सुख असो की दुःख.... महापूर
महापूर
read moreMahesh Lokhande
माणुसकीचा महापूर आठव त्या सार्यांना जीव ज्यांनी वाहिला देशसेवेचा झरा ज्यांमध्ये राहिला माणुसकीचा महापूर मी येथे पाहिला देशप्रगतीसाठी घाम येथे वाहिला भाऊ बनून जो तो भावासाठी धावला बंधूप्रेमाचा पाझर फुटताना पाहिला भूकेल्यास घास तहानेल्यास पाणी देई अंथरूण कोणासही कोणी पूरग्रस्तांसाठी जो तो गेला धाऊनी शक्य जे ते जो तो आला करूनी स्वातंत्र्यदिनाला या सार्यांना सलामी भूकंप पूरग्रस्त ना कधी होवो कोणी कवी-महेश लोखंडे माणुसकीचा महापूर
माणुसकीचा महापूर #poem
read moreHarsh
निसर्गाचे रूप (10-8-,2019)-हर्षल चौधरी काय आहे ही निसर्गाची किमया, कधी येतॊ राग याला,तर कधी दया. कधी घेऊन येतॊ 'सोसाट्याचा वारा ' तर कधी आणतो हा 'पावसाच्या धारा. पावसाळी होतो हा हिरवागार, उन्हात देतो मात्र सूर्यकिरणांचा मार. कधी घेईन येतॊ सुंदर अशी पहाट, कधी आणतो सुमुद्राला उंच मोठी लाट. कधी डोकावतो हा माणसाच्या सुखात, येतॊ तेव्हा तो पावसाच्या रूपात. तेव्हा जातो तो माणसाला 'रडवून ' धो धो पडून टाकतो सगळं काही 'बुडवुन'. येतॊ कधी बनून हा 'महापूर', लावून जातो तेव्हा 'एकजुटीचा सुर '. घेऊन येतॊ कधी 'दुष्काळाची पीडा', जातो शिकवून माझ्या शेतकऱ्याला धडा. भूकंप आणून करतो,आपल्याला हा दुखी. राग आला की आणतो हा 'ज्वालामुखी'. हे सगळे आहेत निसर्गाचेच गुण, जातो आपल्याला हा, खुप काही शिकवून. माणसानेच बिघडवले त्याचे संतुलन, तो करतो मात्र सदैव आपलं रक्षण. निसर्गालाच बनवा आता, खरा आपला' मित्र ' प्रार्थना करा कमी होऊदे कृष्णा मायेचे पात्र... #कोल्हापूर चा महापूर
#कोल्हापूर चा महापूर
read moreSachin Zanje
महापुर २०१९ कोल्हापूर शहर सुसाटाच्या सुटलाय हा वारा थंडगार मारी अगांवरी शहारा पाण्यात बुडलाग हा माझा निवारा भटकंती जीवना सारखा झालाय बघ असा हा आमचा कोंडमारा... सोडूनिया सारे धाव जगण्यासाठी घेतीली. पाहुणीया आमची ही परिस्थिती साथ ह्या माणुसकीने दिली.. एकवटला हा सारा माझ्या कोल्हापूर चा भाग आता नाही फिकिर तु किती ही लाग.. आई जगदंबेची आहे सार्या कोल्हापूर जनतेवरी माया धाव घेईल लेकरासाठी संकट ती ताराया.. प्रत्येक मावळ्यांच्या हदयात आहे राजा माझा जाणता. म्हणूनच संकटावर मात केली आम्ही म्हणता म्हणता अशी ही माझी कोल्हापूर ची जनता. I love you Kolhapur कवी - सचिन झंजे २०१९माझ कोल्हापूर शहर महापूर
२०१९माझ कोल्हापूर शहर महापूर
read moreJayshree Hatagale
आता पाऊस..... असा ही आठवणीत राहतो बाराही महिने...... डोळ्यांतून वाहतो....... #कोल्हापूर - सांगली #महापूर #पुणे #ढगफुटी
#कोल्हापूर - सांगली #महापूर #पुणे #ढगफुटी
read moreSandesh Sogam
परवाच्या महापुरात खूप काही वाहून गेलं, तिच्या नावापुढे त्याचं आडनाव लावायचंच राहून गेलं!! -©संदेश चंद्रकांत सोगम #महापूर #चारोळी #charoli #marathi #kavita
Metro Agency Online Holsel Shop
सि.एन.जी योजना ©Bharat पटेल सि.एन.जी योजना
सि.एन.जी योजना #न्यूज़
read more