Find the Latest Status about चिऊताई माझ्या अंगणात ये from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चिऊताई माझ्या अंगणात ये.
Priyanka Jaiswal
चिऊताई बसुनी गॅलरीमध्ये काल,मी बघत होते आकाशाकडे... नजरेस पडली एक चिऊताई,जात होती ती,तिच्या घरट्याकडे.. चोचीमध्ये घेऊन दाना,ती घाई घाईत उडत होती... तिच्या पिल्लांना बघण्याची जणू,तिला आतुरता लागली होती... तेव्हढ्यात आकाशातून पडली ,तिच्या अंगावर पावसाची धार... तरी उडत होती ती,मानली नाही तिने हार... झाली होती ओली पूर्ण,पंखपण भिजले होते... तरी तिचे उडणे ,बंद झाले नव्हते..... तेवढयात जोराचा ,वारापण सुरू झाला.... चिऊताई चा वाऱ्यामुळे ,तोल होता गेला.... परत उठली ती,आणून पंखामध्ये जीव... त्या क्षणी येत होती,मला तिची कीव... उघडूनी पंख पुन्हा एकदा,झेप घेतली तिने घरट्याकडे... पोहचूनी घरी तिने,धाव घेतली पिल्लांकडे.... चारूनी त्यांना दाना पाणी,पिल्लांना कुशीत तिने घेतले... आनंदाने मग तिने ,स्वतःचे डोळे मिटले... सकाळी पुन्हा एकदा ती,मला आकाशात उडतांना दिसली. तिची जिद्द पाहून मी,तिच्यापुढे झुकली.. ऐका छोट्याश्या जीवने कल मला,खूप काही शिकवले... हार न मानता अडचणींना,जिद्दीने कस लढायच ते दाखविले.. ©Priyanka Jaiswal #चिऊताई
कवी - के. गणेश
चिऊताई.. अगं अगं चिऊताई ये आमच्या घरी.. बाळ वाट पाहतंय तुझी दारावरी.. चिऊताई तू घे बाळाचा ग घास.. माझ्या तान्हूल्याला तुझी लागली आस.. बाळ माझं इवलं वाट तुझी पाही.. कानी येता किलबिल कसं बावरून जाई.. तुझं दारावर येणं जशी सुखाची झुळूक.. पान हलेना झाडाचं वारा रुसला आपसूक.. चिऊताई आमच्या घरी कर ना ग खोपा.. माझं तान्हं घेईन तुझ्या बाळाचा पापा.. चिऊताई कशी गेली copyright @kganesh भुर्रकन उडून.. 902811059 माझं बाळ दमलय रडून रडून...! चिऊताई..
चिऊताई..
read moreAvinash lad
चिऊताई... ------------------------------- चिऊताई चिऊताई ये माझ्या घरी, देईनतुला दाणे पाणी मग जा ग माघारी..........!!१!! अंगणात आल्यावर वाटतं छान मला, तू उड्या मारल्यावर देईन खाऊ ग तुला...........!!२!! इवल्या तुझ्या पायांची गम्मत आहे भारी, दाणे टिपून झाल्यावर भुर्रर्र मारतेस भरारी..........!!३!! चोच छोटुली ग तुझी पंख दोन छान, खेळतांना साऱ्यांचे तू हरवतेस भान...........!!४!! चिऊताई चिऊताई बांध घराजवळ घरट, रोज तुझी सकाळी पाहीन अंगणात वाट.........!!५!! ------------------------------------- @अविनाश लाड,राजापूर-हसोळ चिऊताई..
चिऊताई..
read morePratik Patil Patu
चिऊताई.. देवाने पाठवलं चिऊला जगाचा उद्धार करायला चिऊ होती पोटात तेव्हाच झाला घात! चिऊ देवाचा अवतार करायला जगाचा उद्धार पृथ्वी वर ती आली, आणि जन्मापूर्वीच मारली गेली! येणार नाही देव येणार फक्त चिऊ कसे कळेना कोणास चिऊ देवाचाच जीव! चिऊ-ताई तुझ्यावीना देश मोडका कना माझी एक विनंती जन्म घेऊ द्या ना तिला! जरी घेतला जन्म तरी, जगू द्या ना तिला! गोड जगता-जगता छान शिकू द्या ना तिला! चिऊताई... #savegirlchild #मुलगी #स्त्रीभ्रूणहत्याथांबवा
चिऊताई... #SaveGirlChild #मुलगी #स्त्रीभ्रूणहत्याथांबवा
read moreशुभम महादेव काप
चिऊताई कित्येक वर्ष गायब होतीस गं चिऊताई तू गावातूनी, माणसांनीच केली होती घोडचूक शिवारांवर औषधे फवारुनी. इकडून-तिकडून फिरायचीस तू उपाशीपोटी अन्नाविना, ओसाड होती रानोमाळं तुझ्या त्या घरट्याविना. गेली होतीस तू गाव सोडूनी प्रदूषणाच्या त्या शहराला, हाल-अपेष्टा सोसल्यास गं तू पण गाव मात्र पोरका झाला. खुप दिवसांनी पहायला मिळालं तुझं हे गोजिरवाणं रुप तुझं हे सुंदर रुप पाहण्यासाठी मनाला ओढ लागली होती खुप. सकाळच्या त्या सुंदर प्रहरी तुझा तो किलबिलाट ऐकायला येतो, चिवचिव करणारा तुझा तो मंजूळ आवाज सर्वांनाच आता हवाहवासा वाटतो. नको जाऊस गं पुन्हा अशी कधी गाव-रानोमाळ सोडूनी, गजबजलेलं राहूदे हे परिसर तुझ्या त्या सहवासानी. -(शुभम महादेव काप) कविता :- चिऊताई कवी :- शुभम म. काप
कविता :- चिऊताई कवी :- शुभम म. काप #poem
read moreVinod Umratkar
पडलाच नाही आमच्याकडे,काल रात्रीचा तो पाऊस कोरडेच आम्ही, अन भिजण्याची ती कोरडी हौस माझ्या अंगणात काल रात्री पाऊस पडला likes नी comments चा #yqbaba #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with Smita Kadlakh
माझ्या अंगणात काल रात्री पाऊस पडला likes नी comments चा #yqbaba #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with Smita Kadlakh
read moreyogesh atmaram ambawale
अंगणात माझ्या मनाच्या ती सतत वावरत असते, नजरेसमोर नसतानाही सतत समोर दिसत असते. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे अंगणात माझ्या.. #अंगणातमाझ्या चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMin
शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे अंगणात माझ्या.. #अंगणातमाझ्या चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. YourQuoteAndMin #YourQuoteAndMine
read moreAtul Waghade
शब्दांचा पाऊस बरसावा असा काव्याचा सडा पडावा असा गुंतावे प्रेमात सांगावे तसा नात्यातला गोडवा पसरावा तसा अंगणात माझ्या पडावा काव्याचा सडा... शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे अंगणात माझ्या.. #अंगणातमाझ्या चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMin
शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे अंगणात माझ्या.. #अंगणातमाझ्या चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. YourQuoteAndMin #YourQuoteAndMine
read morePrerana Jalgaonkar
आभाळाने पुकारले चिऊताई चिऊताई परत ये... रुसूबाई रुसूबाई रुसलीस का... चिव चिव करायला परत ये... --प्रेरणा शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज जागतिक चिमणी दिन... वाढलेले तापमान, शहरातली मोठे उद्योग, कारखाने, वायू प्रदूषण, मोबाईल टॉवर मधून नि
शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज जागतिक चिमणी दिन... वाढलेले तापमान, शहरातली मोठे उद्योग, कारखाने, वायू प्रदूषण, मोबाईल टॉवर मधून नि
read more