Find the Latest Status about ओंजळ कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ओंजळ कविता.
Raju Lokhande
ओंजळ रिकामी दिसली की,याचक आणि दाता या दोन्ही वृत्तींचा गैरसमज तयार होतो. -राजू लोखंडे ओंजळ..
उमा जोशी
ओंजळभर पाणी एक वेळची तहान भागवतं ओंजळभर स्वप्न पाहून मनही आयुष्य जगतं ओंजळीनेच अर्घ्य सूर्यालाही मिळतं ओंजळभरून सुख मन देवाजवळ मागतं ओंजळभर प्राजक्ताने मन सुगंधित होतं ओंजळ सैलावली की सुख निसटू लागतं भरल्या ओंजळीने मन कसं अगदी सुखवतं रीत्या ओंजळीत कोणाचं तरी दुःख सामावतं रित्या ओंजळीत जे भरली ओंजळ रिती करतं तेच मन भरल्या ओंजळीसारखं नेहमी सुखानं फुलतं.... भरल्या ओंजळीसारखं नेहमी सुखानं फुलतं.... © उमा जोशी ०७/१०/२०२० ©उमाच्या मनातलं #ओंजळ
sameer
ओंजळ ओंजळीत मावेनासा झालो मी तरी ही तुझी ओंजळ रिकामी कशिग आई. ©Hey Hii ओंजळ
Manish Kanade
अश्रूंच्या प्रत्येक थेंबात मला शोधण्याचा प्रयत्न करतेस अन बघता बघता तुझी ओंजळ माझ्या आठवणींनी भरते... - मनिष ज्ञानदेव कानडे ओंजळ
Archana Pol
शोधत फिरते आनंदाची ओंजळ इवली दु:ख पावलांसोबत माझ्या रांगत येते. मी आताशा पडते उठते सावरतेही.. मनात कातर भिती अनामिक दाटुन येते. जीवन म्हणजे अवघड कोडे असे वाटते, नजरेमध्ये स्वप्न कोवळे तरी भेटते. जुन्या स्मृतींच्या जखमा नाही कुरवाळत मी, रोज नव्याने नवीन वाटा शोधत जाते. कधी गवसतो आनंदाचा सूर अचानक, कधी आडवे दु:ख अचानक गाठुन येते. तरारलेली कळी कोवळी खुडली जाते जीवन म्हणजे खेळ घडीचा शिकवुन जाते. ©Archana Pol ओंजळ
Rajendrakumar Shelke
*विषय:-रिती ओंजळ* *मुक्तछंद काव्य* *दिनांक :-१८/०१/२०२१* ********************* संपत्तीच्या जोरावर खुप काही *मिळाल,* समोर असूनही मी सार काही *गमावलं.* माझीच माणसे होती नितांत प्रेम *करणारी,* धनदौलतिच्या नादात आपलेपण *विसरणारी.* प्रत्येक वेळी फक्त माझाच स्वार्थ *पाहिला,* रक्ताच्या नात्यामध्ये मी आरोष सारा *ओढावला.* माझ्या संकट काळात सतत सगळे पळत *होते,* पण माझ्या डोळ्यांवर अहंकाराचे मळभ *होते* सगे सोयरे प्रत्येकवेळी माझाच विचार *करी,* पण स्वभाव दोषापायी मन वेगळाच विचार *धरी,* आज साऱ्यातल सार आहे पण माझी माणसेच *नाही,* गतकाळातील चुकीमुळे रिती ओंजळ रिकामी *राही.* ------------------ *✍️ राजेंद्रकुमार शेळके.* -- नारायणगाव, पुणे. ©Rajendrakumar Shelke रिती माझी ओंजळ #Wish
yogesh atmaram ambawale
देणारा तो दाता,मी मात्र भिकारी, ओंजळ भरली सुखांनी माझ्या, दुःखाने भरली झोळी. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ओंजळ भरली सुखांनी... #ओंजळ चला तर मग लिहुया #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating
DRx. Shital Gujar✍️
ओंजळ भरली सुखांनी| उमलू लागली सुमने || सुखाचा वारा दाही | दिशांनी पसरून गेला || सुखाच्या क्षणांना जगले | दुःखांना तोंड दिले || सारे आयुष्य क्षणांनी | हे सारे सामावले || ओंजळ भर सुखात | स्नेह हा समावला || आईचा कुशीत सारे | सारे सुख मात्र सामावले || -✍️Shital K Gujar✍️ शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ओंजळ भरली सुखांनी... #ओंजळ चला तर मग लिहुया #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating
somnath gawade
ओंजळ भरली सुखांनी सुगंध दरवळतो चौफेर सुख दुःख येत राहतील तरी वाट चालत राहू एकमेकांना देऊन धीर... शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ओंजळ भरली सुखांनी... #ओंजळ चला तर मग लिहुया #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating