Nojoto: Largest Storytelling Platform

New महात्मा फुले Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about महात्मा फुले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, महात्मा फुले.

    LatestPopularVideo

Amar Hajare patil

क्रांती सूर्य महात्मा फुले #WritersSpecial

read more

Anisha Dodke

महात्मा फुले #WritersSpecial #मराठीकविता

read more
कविता:महात्मा जोतिबा फुले


समाजात माळी म्हणून जन्मा 
येणाऱ्या महात्मा फुलेने फुलविला समतेचा मळा....!

शेतकऱ्यांच्या पोशाखात संबोधलं
शिवरास उलवाढी भूषण
जाणलं दुःख व लिहल शेतकड्याचा आसूड....!

चिखल गोटे अंगावर झेलले 
केले तुम्हा आम्हा मुलींना
दार मोकळे ....

चूल मूळ न राहता 
स्त्री जाते उद्धाराला
हा संदेश दिला साऱ्या जगाला ....!

अनर्थ सर्व अविधेने केले
म्हणून शिक्षित केले पत्नीस
व समाज शिक्षित करण्यास संगीतले तीस.....!

विधवेचा मुलगा घेतला वारस 
म्हणुनी दत्तक केला
समाज जागा व सेवा ही केली
दिन दुबळ्यांची व ठरला खरा महात्मा हा जनकल्यानी......!

कवयित्री:कु अनिषा दिलीप दोडके
जिल्हा :नांदेड

©Anisha Dodke महात्मा फुले

#WritersSpecial

Harish Damodhar Naitam

क्रांतीसुर्य महात्मा फुले #poem

read more
क्रांतीसुर्य महात्मा फुले

मुलींची पहिली शाळा काढून दिले मुलींना शिक्षण
अंगावर दगळ, शेनाचे घाव सोसून रचला स्री शिक्षणाचा पाया
मुलींना शिक्षण देऊन तुम्ही केला या समाजाचा उद्धार
म्हणूनच स्री आहे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ||

बाल विवाहाला विरोध करून विधवा विवाहाचा समर्थन केला
अनिष्ट रूढी परंपरा नष्ट करून बहुजनांचा तुम्ही उद्दार केला
ब्राम्णांचे कसब, गुलामगिरी या सारखे ग्रंथ लिहिलून
जातीव्यवस्थे आणि वर्णव्यवस्थे विरुद्ध बंड पुकारला ||

शेतकऱ्यांचे आसुड ग्रंथ लिहिलून त्यातुन मांडली शेतकऱ्यांची वेथा
त्यातुन अन्यायाविरुद्ध आवाज उठण्याचा मंत्र दिला
जातीपातीत विभागलेल्या बहुजन समाजाला एकत्र केला
अंधश्रद्धेच्या या कचाट्यातून बाहेर काढण्यात मोलाची भूमिका बजावलात ||

रयतेचे राजे लोककल्याणकारी छत्रपती शिवाजी महाराज यांची 
समाधी शोधून पहिल्यांदाशिवजयंती साजरी केलात
पहिल्यांदा शिवाजी महाराजांवर पोवाडा लिहून
शिवाजी महाराजांचा ईतिहास उजेडात आणलात ||

      कवी : हरिष नैताम क्रांतीसुर्य महात्मा फुले

HANAMANT YADAV (कवीराज)

महात्मा फुले जयंती Dr. Divyapriya Deshmukh सतीश देशपाडे Ritika suryavanshi chandrakant @KGanesh #Talk

read more
तिमीरांनो पळत सुटा,
तुमचा काळ उठला आहे.
ज्ञानाची मशाल घेवून,
हा क्रांतीसुर्य पेटला आहे...

कवीराज महात्मा फुले जयंती Dr. Divyapriya Deshmukh सतीश देशपाडे Ritika suryavanshi chandrakant @KGanesh

Shrikant Pawde

महात्मा फुले

read more
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले 
यांच्या जयंती निमित्य 
संपूर्ण भारतीय जनतेस कोटी कोटी शुभेच्छा महापुरुषांच्या जयंत्या जरूर साजऱ्या करा
परंतु 
त्यांचे जीवन चरित्र ही समजने 
तितकेच महत्वाचे आहे.
यातून 
मनुष्य,परिवार
मोहल्ला,समाज
गांव,शहर
राज्य,देश
आणि विश्व
यात सामाजिक परिवर्तन 
घळवन्याची ताकत आहे.
म्हणुन त्यांच्या पाऊलांवर
पाऊल ठेऊन 
चालने आज खुप गरजेचे आहे.

                 - श्रीकांत एफ. पावडे, कोनसरी महात्मा फुले

sandy

#छत्रपतींची गादीचे वारस आणि रयतेचे_स्वराज्यच्या #विचार, #कृतीचे खरे वारसदार महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे हेच आ #story #nojotophoto #खासदाराचा #मावळा #शिवराय #तत्वमसी

read more
 #छत्रपतींची गादीचे वारस आणि रयतेचे_स्वराज्यच्या #विचार, #कृतीचे खरे वारसदार महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे हेच आ

sandy

'महात्मा फुले आणि बळीराजा' बळी राजाची कथा सर्वांना ठाऊक आहे. कारण बालपणापासून आपण ती ऐकत आलो आहेत. तथापि वाढत्या वयाप्रमाणे या #story #nojotophoto

read more
 'महात्मा फुले आणि बळीराजा'

             बळी राजाची कथा सर्वांना ठाऊक आहे. कारण बालपणापासून आपण ती ऐकत आलो आहेत. तथापि वाढत्या वयाप्रमाणे या

राजीव भारती

महात्मा ज्योतिराव फुले

read more

पूर्वार्थ

#महात्मा ज्योतिबा फुले #Poetry

read more
अवतरण दिवस पर मैं जिनको करता हूँ प्रणाम,
वो हैं ज्योतिबा फुले, पिता जिनके गोविंद राम।
धन्य हैं वो माता ,जिनकी देवी..... चिमना बाईं,
पत्नी जिनकी सावित्री बाई, जिन्होंने बेटियां पढ़ाई।

जागरूकता से जिनकी शिक्षा द्वार खुले,
महान शख्स थे वो महात्मा ज्योतिबा फुले।
बहुजन समाज के लिए जलाया शिक्षा दीपक,
साक्षरता के रूप में दलितों में भी गुल खिले।

थे वे एक महान समाज सुधारक,
छुआछूत के थे वे महान उद्धारक।
शिक्षा से ही जिन्होंने अलख जगाई,
विधवा पुनर्विवाह के लिए लड़ी लड़ाई।

फुले ने शिक्षा का एक ऐसा अभियान चलाया,
शूद्रों के लिए नया विद्यालय खुलवाया।
ऊँच-नीच के भेदभाव का कराया खात्मा,
बम्बई में सम्मान मिला कहलाये फिर महात्मा।

बने जो सामाजिक क्रांति के जनक,
देश प्रेमी के साथ वे थे महान जन नायक।
स्वतंत्रता सेनानी रूप में किया बढ़के सहयोग,
जंग जीती आजादी की दूर किया दलित का रोग।
#महात्मा ज्योतिबा फुले

©पूर्वार्थ #महात्मा ज्योतिबा फुले

komal borkar

महात्मा ज्योतीबा फुले जयंती #wishes

read more
महान क्रांतिकारक, समाजसुधारक, स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे 
महान विद्वान पंडित महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन. 🙏🙏🙏

एक क्रांतीची मशाल, स्त्री कर्तुत्वाची प्रेरणा, 
बहुजनांचे कैवारी, दिन दुबळ्यांचा महान सुर्य, समाजसुधारक म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुले .
ज्या महान सुर्याने स्वत:च संपूर्ण जीवन इथल्या बहुजन समाजासाठी खर्ची केल, बहुजनासाठीच नाही तर इथल्या ब्राह्मण वर्गातील स्त्रियांना लढण्याचे सामर्थ्य दिलं.स्त्रि ही जरी ब्राह्मण वर्गातील असली तरी तीलाही बंधने होती,  पुरुषप्रधान संस्कृती  असल्याने तीलाही हिन दर्जाची वागणूक मिळत होती
म्हणून समाजातील सगळ्या स्त्रियांना सन्मानाने जगता यावं यासाठी त्यांनी अथक परिश्रम केले. 
1940ला जेव्हा महात्मा ज्योतीबा फुलेंच लग्न माता सावित्रीआई सोबत झाले तेव्हा  ज्योतीबा 12वर्षाचे आणि सावित्रीआई अवघ्या 9 वर्षाच्या होत्या, सावित्री आई शिकल्या नव्हत्या,परंतु सावित्रीला शिकण्याच धाडस होतं,
त्या लहानपणापासूच कर्तुत्वान होत्या,परंतु त्या काळामध्ये  स्त्रिया शिक्षण घेण म्हणजे महापाप समजल्या जात होतं. स्त्रियांना अबला समजल्या जात होत, स्त्री शिकली म्हणजे त्या अक्षरांच्या अळ्या पडतील आणि त्या मग नवऱ्याच्या ताटात पडतील  अशा पद्धतीच्या जुलमी नियमांना त्यांना सामोरे जावे लागत होते , त्यांना घराबाहेर पडु देत नव्हते ,
अशा परिस्थितीत  महात्मा ज्योतीबांना समजलं होत की शिक्षणाशिवाय दुसरा कोणताही  पर्याय नाही,स्त्रि शिकली तर स्वतंत्र होणार, तीचे स्वतंत्र मत असणार,घरातील मुलां-मुलींना शिकवणार, स्त्रि प्रगत होणार. 
म्हणून त्यांनी शिक्षणाची सुरूवात स्वत:च्याच  घरापासुन  केली आणि सावित्रीला शिकवलं. 
समाजासाठी त्यांनी स्वत:च्या घराचा त्याग केला, वडीलांनी विरोध केला, तरीही न डगमगता फुले दाम्पत्य लढण्यासाठी तत्पर झाले. 
हे फुले दाम्पत्य म्हणजे  चंदनासारख सुंगध देणार होतं, 
ज्या मनुवादी संस्कृतीमुळे स्त्रिवर अत्याचार केला ,स्त्रिला सती जाव लागे, नवरा मेल्यावर तीच मुंडण केल्या जात होत,तीला दुसर लग्न करण्याचा अधिकार नव्हता , अशा  गुलामीत जीवन जगणाऱ्या  स्त्रियांना सक्षम करणारे विचार अठराव्या शतकात एखाद्या पुरुषांमध्ये असणे म्हणजे एक महान थोर विचारवंतच होय. 
स्त्री ही शिकली पाहिजे ,प्रगत झाली पाहिजे म्हणून
1 जानेवारी 1848ला  पुण्यात बुधवार पेठेत भिडे यांच्या वाड्यात  मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली , आणि त्या शाळेच्या मुख्याध्यापिका सावित्रीआई ह्या होत्या .शाळा ही 6 मुलींनी सुरु झाली,हळुहळु मुलींची संख्या वाढु लागली फुले दाम्पत्यांना खुप आनंद झाला,आणि त्यांची प्रेरणा वाढत गेली आणि त्यानंतर एकापाठोपाठ एक शाळा सुरू केल्या. परंतु यामुळे मनुवादी लोकांच्या पोटात दुखायला लागलं ,धर्म बुडाला धर्म बुडाला म्हणून ओरडु लागले याकडे दुर्लक्ष करत आपले कार्य सुरळीतपणे चालू ठेवले. 
इ.स 1849 ला  उस्मान शेख यांच्या वाड्यात प्रौढांसाठी शाळा सुरू केली.आणि तेव्हापासून  खरी शिक्षणाची सुरुवात झाली, हि शिक्षणाची सुरुवात करत असतांना ज्योतीबांच्या अनेक मित्रपरिवारांचा सहभाग होता.
केशवपन प्रथा बंद करण्यासाठी नाह्वाचा संप घडवून आणला, 1853मध्ये बालहत्या प्रतिबंधक ग्रहाची स्थापना केली,भृणहत्त्या टाळावी म्हणुन 1864 ला अनाथ बालकांसाठी अनाथाश्रम चालू केलं
ज्योतीबांच हे कार्य अविरतपणे चालू होते. 
1865 ला एका काशीबाई नावाच्या बालविधवेच्या मुलाला दत्तक घेतात आणि त्याच नाव यशवंत अस ठेवण्यात येते ,त्याला डॉ बनवतात,यशवंतही समाजासाठी योगदान देत असतो
पाणी हि निसर्गाची देणगी आहे, सर्वांना पाणी पिता याव साठी 1868 ला स्वत:च्याच घरी अस्पृश्यांसाठी पाण्याचा हौद चालू केला. 
इ.स 1876-77 मध्ये खुप दुष्काळ पडला होता, एक वेळच्या जेवणासाठी लोकं वनवन फिरु लागली होती, भुकेने लोकांची जीव जात होते तेव्हा फुले दाम्पत्याने 52अन्नछत्रे चालु केली. 
महात्मा ज्योतीबा फुलेंना स्वत:च मुल नव्हतं म्हणून त्यांच्या  वडिलांनी म्हणजे गोविंदरावांनी दुसर लग्न करण्याचा सल्ला दिला आणि यासाठी सावित्रीआईचा सुध्दा होकार होता तेव्हा ज्योतीबा रागानेच सावित्रीला म्हणाले, "तुही असं म्हणते साऊ " तेव्हा  सावित्री हो म्हणतात,आपला 'वारसा ' समोर नेण्यासाठी, तेव्हा ज्योतीबा म्हणतात-
 की जो माझे कार्य समोर नेणार तो फुल्यांचे नाव चालवील, त्या साठी दुसरं लग्न करण्याची गरज नाही,यावरून महात्मा ज्योतिबांचे किती महान विचार होते हे समजून येते. 
स्वता 40वर्ष चंदनासारखे झिजले ,सर्वांना स्वतंत्र जगण्याची संधी दिली अशा महान व्यक्तीला  1888 ला महात्मा ही पदवी मिळाली. 
त्यांच्या या कार्याची दखल घेत कोल्हापूरचे राजरत्न सयाजीराव गायकवाड त्यांच्या कार्याची महान चर्चा बघुन फुले दाम्पत्याला   भेटायला आले, त्यांचे कार्य बघुन त्यांना गहिवरून आलं, 
अशा महान सुर्याच महापरिनिर्वाण 28 नोव्हेंबर 1890 झालं, या महान क्रांतिकारकांचे विचार मात्र संपणार नाही, यासाठी आजच्या तरुण पिढीला सक्षम होण्याची गरज आहे. 
असे महान क्रांतिकारक या जगात पुन्हा  होणे शक्य नाही,परंतु त्यांचे कार्य समोर घेऊन जाण्याच निर्धार करूया आणि त्यांच्या महान विचारांना वदंन करूया. 

जय ज्योती जय क्रांती

©komal borkar महात्मा ज्योतीबा फुले जयंती
loader
Home
Explore
Events
Notification
Profile