Find the Latest Status about विश्वासाने गळ्यात माझ्या बांधा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, विश्वासाने गळ्यात माझ्या बांधा.
अनंत पाटील
काव्य लेखन उपक्रम विषय- नाही क्षणाचा भरवसा प्रत्येकाची लढाई येथे फक्त जगण्यासाठी जाण असूनही काही क्षणांचा भरवसा नाही पाप पुंण्याचें हिशोब सगळे व्यर्थ येथे धावपळीच्या चुरसी खेळात जराही उसासा नाही जीवनात सकर्मक माणसाची नियती दाखले देते प्रतिबिंब बदलेल असा जगात कोठे आरसा नाही कर्माचे भोग जरी देती दृष्टान्त वेळोवेळी मरणानंतर त्याचा कुठेही खुलासा नाही अपव्यय भावनांचा सदा नात्यात स्थिरावतो आप्तेष्टांना वर्तनी थोडासा ही दिलासा नाही परित्याग केला जरी या सुखाचा निःसंकोचपणे दुःखाला सामोरे जावे तिळमात्र भरोसा नाही श्री अनंत पांडुरंग पाटील उमरोळी पालघर 8446819452 ©अनंत पाटील माझ्या कविता
Sambhaji Gejage
कधीच कळला नाही तुला भाव माझ्या मनातला बहुतेक अर्थच कळला नसेल तुला माझ्या झुरण्यातला! - संभाजी प्रल्हाद गेजगे-वाटंबरकर ©Sambhaji Gejage भाव माझ्या मनातला
Sambhaji Gejage
आता पाखरंही माझ्या ओळखीची झालीत... गेलो की बागेत येतात राम-राम घालीत... - संभाजी प्रल्हाद गेजगे- वाटंबरकर ©Sambhaji Gejage आता पाखरंही माझ्या