Nojoto: Largest Storytelling Platform

New शाळेला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शाळेला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शाळेला.

Stories related to शाळेला

    LatestPopularVideo

Swati Mahendra Jadhav

आई मला शाळेला जायचयं #poem #nojotophoto

read more
 आई मला शाळेला जायचयं

amol

शाळेला आज सुट्टी हवं #nojotophoto

read more
 शाळेला आज सुट्टी हवं

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आज 5 सप्टेंबर आहे. आजचा विषय आहे #गुरुशिष्य1 दरवर्षी 5 सप्टेंबर या दिवशी शिक्षक दिन साजरा केला जातो #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
युअर कोट माझे गुरू,शिष्य मी त्यांचा,
येता सहवासात त्यांच्या,नवीन शोध माझ्या आयुष्याचा.
लिहिण्याला अर्थ असावे,असे त्यांनी शिक्षण दिले मला.
वंदन ह्या ऑनलाईन डिजिटल युअर कोट शाळेला.
अभिमान मला माझ्या ह्या शाळेला,
एक वेगळीच ओळख करून दिली गुरू-शिष्य ह्या नात्याला. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आज 5 सप्टेंबर आहे.
आजचा विषय आहे
#गुरुशिष्य1
दरवर्षी 5 सप्टेंबर या दिवशी शिक्षक दिन साजरा केला जातो

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे शाळेचा पहिला दिवस.. #शाळेचापहिलादिवस१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. # #YourQuoteAndMine

read more
शाळेचा पहिला दिवस,
सकाळीच आईची लगबग लई.
मी पण तयार केव्हाच,
शाळेत जाण्याची माझी ही घाई.
नवे गाव नवा रस्ता,
नवी आता माझी शाळा.
केव्हा एकदा बघतोय शाळेला,
उत्सुकता ही लागलीय मनाला.
नवे मित्र,नवे पुस्तकं,
नवे असणार शिक्षक सारे.
कसे असतील कसे वागतील,
मनात वाहे प्रश्नांचे वारे.
शाळा ही मोठी,मैदान ही मोठे,
वर्ग ही मोठा,फळा ही मोठा,
शाळेचा पहिला दिवस,
जमीन नाही बेंच पाहून मनी आनंद मोठा. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
शाळेचा पहिला दिवस..
#शाळेचापहिलादिवस१

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे दुरावलेली शाळा #दुरावलेलीशाळा हा विषय Shruti Katrat यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
आज खूप आठवली मला,माझी शाळा.
युअर कोट वर जेव्हा दुरावलेली शाळा विषय आला.
तेव्हाही आवडायची आजही आवडते मला माझी शाळा,
माझ्या वर्गातल्या भिंतीवर होता खूप मोठ्ठा फळा.
आवारात शाळेच्या आमच्या होती मोठी बाग,
गुरुजी नेहमीच म्हणायचे हुशार मुलांप्रमाणे वाग.
सुंदर असा होता आमच्या शाळेचा परिसर सारा,
खिडकीतून येत होता मस्त गार गार वारा.
शाळेत आमच्या खेळायला होता मैदान मोठ्ठा फार,
मुकायचो आम्ही शाळेला जेव्हा असायचा सुट्टीचा रविवार.
खेळायचो आम्ही एकत्र जेव्हा व्हायची मधळी सुट्टी,
खेळता खेळता भांडायचो नि पुन्हा मग कट्टी-बट्टी. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
दुरावलेली शाळा
#दुरावलेलीशाळा

हा विषय 
Shruti Katrat यांचा आहे.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे विचारांची शाळा... #विचारांचीशाळा चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #yqtaai You #YourQuoteAndMine

read more
मनाच्या अंतरी भरते विचारांची शाळा,
ना तिथे लिहिण्या खडू ना कुठला फळा.
ना कुणी तिथे शिक्षक ना कुणी शिष्य,
स्वतःशीस करावे लागते स्वतःला भाष्य.
केव्हाही भरते ही शाळा हिला नसते कुठली वेळ,
ना कुठली सुट्टी ना कुठला शिक्षणाचा मेळ.
विचारांच्या ह्या शाळेला ना रविवार असतो ना शनिवार असतो,
ना मधली सुट्टी असते ना पूर्ण सुट्टीसाठी कुठला सण असतो.
कितीही नाकारले तरी ह्या शाळेत जावेच लागते,
मनस्ताप,पश्चात्ताप रुपी फी देखील भरावी लागते.
विचाराच्या ह्या शाळेत लहान मोठे सर्वच शिकत असतात,
मूर्ख,ढ, म्हणवणारे ही इथे अतिहुशार असतात.
विचारांची ही शाळा माझ्याही मनी दिवसरात्र भरत असते,
अभ्यासरूपी गृहपाठ माझे Your Quote वर दिसत असते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
विचारांची शाळा...
#विचारांचीशाळा
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
#collab #yqtaai  #You

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे एक दिवस शाळेसाठी.... #एकदिवसशाळेसाठी हा विषय Manswi Goyal यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
एक दिवस शाळेसाठी आपण ही द्यावे
वर्षातून एकदा तरी शाळेस भेट देऊन यावे.
स्वातंत्र्यदिन असो वा असो प्रजासत्ताक दिन
शाळेसाठी राखून ठेवावा निदान एक तरी दिन.
जावे शाळेत पुन्हा एकदा,पुन्हा एकदा तिच्या आठवणीत रमावे,
काय काय दिले शाळेने आपल्याला,कधी ते ही आठवून पाहावे.
एक दिवस शाळेसाठी आपणही काही करावे,
जमावे माजी विद्यार्थ्यांनी एकत्र,पुन्हा शाळेला भेट देऊन यावे.
नेहमीच जगतो आपण सर्वांसाठी एक दिवस शाळेसाठी ही जगून पाहावे.
बघावे अजूनही शाळा तशीच आहे की काय फरक घडलेय
शिक्षण दिले जीने आपल्याला,साक्षर केले,तिच्यात काय बदल घडलेय.
नेहमीच जगतो आपण सर्वांसाठी एक दिवस शाळेसाठी ही जगून पाहावे.
जीर्ण वाटली कुठे शाळा,कुठे जर मोडकळीस आल्या सारखी दिसली,
उपकाराची जाण ठेवावी तिच्या,तिच्या पाठीशी उभे राहावे. शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे

एक दिवस शाळेसाठी....
#एकदिवसशाळेसाठी
हा विषय
Manswi Goyal यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

Guruprasad

शिक्षक म्हणजे विशाल वृक्षच असतो ज्याच्य फांदी फांदीतून सळसळत असतात बेदरकारपणे ज्ञानाची पानं त्याच्याच छायेखाली सौख्य लाभते अज्ञानाच्या उन्हा

read more
शिक्षक म्हणजे? 





read captured शिक्षक म्हणजे विशाल वृक्षच असतो
ज्याच्य फांदी फांदीतून सळसळत असतात बेदरकारपणे
ज्ञानाची पानं
त्याच्याच छायेखाली सौख्य लाभते
अज्ञानाच्या उन्हा

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे प्रिय शाळा... #प्रियशाळा मला तर शाळेची खुप आठवण येते,तुम्हाला ही येत असे #letters #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आज खूप आठवली मला,माझी प्रिय शाळा.
युअर कोट वर जेव्हा प्रिय शाळा हा विषय आला.
तेव्हाही आवडायची आजही आवडते मला माझी शाळा,
माझ्या वर्गातल्या भिंतीवर होता खूप मोठ्ठा फळा.
आवारात शाळेच्या आमच्या होती मोठी बाग,
गुरुजी नेहमीच म्हणायचे हुशार मुलांप्रमाणे वाग.
सुंदर असा होता आमच्या शाळेचा परिसर सारा,
खिडकीतून येत होता मस्त गार गार वारा.
शाळेत आमच्या खेळायला होता मैदान मोठ्ठा फार,
खूप कंटाळा यायचा तेव्हा शाळेला जेव्हा असायचा सुट्टीचा रविवार.
खेळायचो आम्ही एकत्र जेव्हा व्हायची मधळी सुट्टी,
खेळता खेळता भांडायचो नि पुन्हा मग कट्टी-बट्टी.
गुरुजी खूपच कडक वागायचे गृहपाठ पूर्ण नसता पोटाला चिमटा काढायचे,
कधी कधी खूपच लाड करायचे अभ्यासाचा तास सोडून गाण्याच्या भेंड्या घ्यायचे. सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
प्रिय शाळा...
#प्रियशाळा
मला तर शाळेची खुप आठवण येते,तुम्हाला ही येत असे

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा दिवस म्हणजे 26 जुन. या दिवशी माझ्या शाळेचा पहिला दिवस असायचा. चला तर मग आजच्या या विषयावर लिहा. आणि तुमच #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #शाळेचापहिलादिवस

read more
मला आज ही आठवतो तो शाळेचा पहिला दिवस,
१ली इयत्तेपासून १० वि इयत्तेपर्यंत मला नेहमी सकाळचीच शाळा असायची,
घरापासून साधारण १५/२० मिनिटाच्याआत मी शाळेत पोहोचायचो,तसा शाळेत मी एकटा कधी गेलोच नाही,नेहमी दादा (वडील) सोडायला यायचे,
त्या वेळेस इतक्या प्रमाणत गाड्या नव्हत्या जितक्यायाआज आहेत,मस्त रस्त्यांनी चालत मजा करत जायचो.
आमची शाळा म्हणजे एक चाळ होती,एक ऑफिस आणि तीन वर्ग,शाळेची चावी शाळेला लागून असलेल्या चाळीत एका काकांकडे राहायची.
मला सर्वात अगोदर शाळेत पोहोचायचे सवय होती त्यामुळे शाळेत पोहोचल्यावर त्या काकांकडून चावी घेऊन वर्ग मीच उघडायचो.
शाळेच्या पहिल्या दिवशी तर खूप वेगळाच आनंद यायचा नवीन मित्र क्वचितच असायचे, सर्व जुने मित्रच पास होऊन नवीन वर्गात यायचे,
वर्ग उघडल्यावर सर्व फळ्यावर स्वागत किंवा सुविचार लिहायची जबाबदारी माझी असायची,वर्ग उघडून झाल्यावर ऑफिस साफ करायचा बहाणा करून मी ऑफिस मध्ये सकाळ पेपर यायचा तो वाचायचो आणि शब्द कोडे सोडावयचो कारण गुरुजी येण्यास २० मिनिटे तरी लागायची.
खूप लिहायला आहे पण पाहिजे तितके आठवत नाही.
राहून फक्त एकच गोष्ट सांगता येते,
माझी शाळा मला खूप आवडायची आज ही आवडते
आज ही १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी ला मी न चुकता माझ्या शाळेत जातो.
शाळा सोडून आज २६/२७ वर्षे झाली पण त्या वेळेस चे काही वर्गमित्र आज ही सोबत आहेत
अधून-मधून आम्ही भेटतो सुध्दा,
खूप आनंद होतो. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा दिवस म्हणजे 26 जुन.
या दिवशी माझ्या शाळेचा पहिला दिवस असायचा.
चला तर मग आजच्या या विषयावर लिहा.
आणि तुमच
loader
Home
Explore
Events
Notification
Profile