Nojoto: Largest Storytelling Platform

New कातरवेळ Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कातरवेळ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कातरवेळ.

    LatestPopularVideo

शब्दवेडा किशोर

#आयुष्याची कातरवेळ....
आगमनासरशीच अनाहुतपणे कधीकधी
अस्तित्वही नकोसं
होतं
मग ती माणसं असो
किंवा अवघड अशी कातरवेळ
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #कातरवेळ_ही_आयुष्याची

कवी - के. गणेश

कातरवेळ....

read more
दिवस माझा असाच सरतो
बसत नाही कशाचाच मेळ..
तुझ्याच आठवणीत पुन्हा,
हळूच येते कातरवेळ...! कातरवेळ....

रिया रूपेश पवार महाळुंगेकर

कातरवेळ.... #nojotophoto

read more
 कातरवेळ....

Shubhada

कातरवेळ #thought

read more
अशा किती 'कातरवेळांचे' 
आपण दोघेच साक्षीदार. 
काल तू माझ्या सोबत होतास. 
आज मी तुझ्या 'शोधात' आहे. 

©शुभदा कातरवेळ

Kailas Tidke

gauri kulkarni

#कातरवेळ 
कातरवेळ मनाचा तळ ढवळून टाकणारी. कितीही इच्छा नसली तरी नको त्या आठवणींना फेर धरून सभोवताली नाचवणारी. 
अशा वेळी हमखास निसटलेल्या माणसांची अन् त्यांच्यासोबत घालवलेल्या क्षणांची आठवण येते. कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात असलेल्या दुःखाला अचानक जाग येते. अशावेळी लादलेला एकांत खरंच खूप जीव घेतो. कितीही प्रयत्न केला तरी कधीतरी ही कातरवेळ वेळ साधून गाठतेच. नको नको म्हणताना हात पडकून नेतेच आठवणींच्या राज्यात. या राज्यातून परतण्यासाठी मार्ग एकच भविष्यासाठी आठवणीच अशा बनवा ज्यांना आठवून चेहऱ्यावर हलकेच हसू येईल अन् डोळ्यात जरी पाणी असले तरी ते सुखाच्या क्षणांची साठवण असेल. त्यासाठी खूप काही नाही मनाची पाटी कोरी करता यायला हवी. दुःखाचा बॅलन्स कमी ठेवत सुखाने प्रत्येकाची ओंजळ भरत जावी. मग आपोआपच कातरवेळ लक्ष्मीच्या पावलाने सुख आणेल अन् समाधानी मन आयुष्यात रंग भरेल हवेहवेसे. 
#गौरीहर्षल
 #कातरवेळ#firstquote

Sachin Sutar

"कातरवेळ" #RecallMemory

read more

Vilas Bhoir

श्वेतकिनारी कातरवेळी #DawnSun

read more
श्वेतकिनारी कातरवेळी 
 नकळत येते सांजसावली
  पाहुन उन्हाचे चांदणे केशरी 
    जवळची नवका दूर राहीली

नवी नवखी वाट उमटली 
 पाऊलखुण वाळूत रोवली 
  अपरिचित झाले होते नव्हते 
   लाटांवर लाट उसळून आली

काठावर फेसाळ मखमली
 भासते सारखी सडारांगोळी
  तारुण्य फुलवीत सदा जीवनी
   अंतःकरणी हृदयी प्रीत जागली

तिच पाऊलवाट पुसलेली 
 दाही दिशांत रस्ता हरवलेली
  असे गुंतून राहिलो पैलतीरी मी
   अंधारी राञ आसपास विरलेली

मिटले डोळे नीज लागली
 चंद्र लपला खुल्या आभाळी
  हे दिसले होते स्वप्नात मलाही
   होताच जागे कळले कातरवेळी
   
                     ( श्वेतकिनारी कातरवेळी )
                          ~ विलास भोईर श्वेतकिनारी कातरवेळी 

#DawnSun

Shankar Kamble

दिस ढळतीला आला
          सांज पेंगुळ्या सावल्या
ओढ्याकाठी बनांमध्ये
           हरिणी त्या थबकल्या

रंग शेंदरी, केसरी
           पखरण रानोमाळ
मनां कसलं गारुड?
            घाली रिंगण भोवळ 

रानपाखरांचा थवा
             दूर ढगांत पांगला
वाट चुकूनी एकला
             राघू एकाकी थांबला

उगां लावी जीवां घोर
             वेळ कातर कसली?
खूर उधळीत धूळ
             जशी काजळी बसली 

नाच नाचणाऱ्या लाटा
            जणू भानावर आल्या
पायी सोडून घुंगरू
            कुठे विरहिणी गेल्या?

मूख मलीन कळ्यांचे
            गंध कसा हरवला?
आस लागे भ्रमराची
            मधु संग दुरावला

©Shankar Kamble #citylight #सांजवेळ #सांज #सांजहीवेडलावी #सांजवेळी #सांजवेडी #कातरवेळ #ओढ #तू

RJ कैलास नाईक

#दुःख माझे आहे जगासाठी विरंगुळा शब्दांत बरसतात सरींच्या दाहक झळा कश्या थोपवू मी कोंडलेल्या भावना तिच्या आठवणींचा नकोच आता लळा रात्र आता हो

read more
दुःख माझे आहे जगासाठी विरंगुळा
शब्दांत बरसतात सरींच्या दाहक झळा

कश्या थोपवू मी कोंडलेल्या भावना
तिच्या आठवणींचा नकोच आता लळा

रात्र आता होणार नाही सुगंधी कधी
वाट पाहणार नाहीत तिची कातरवेळा

थकल्यात खिन्न होऊनी तारका कधीच्या
पांगळ्या वेदनेने उशाला जपल्यात कळा

मनात रचले होते सुखाचे किती मनोरे 
का दाटला पापणीवर दुःखाचा हिंदोळा..
               *RJ कैलास* #दुःख माझे आहे जगासाठी विरंगुळा
शब्दांत बरसतात सरींच्या दाहक झळा

कश्या थोपवू मी कोंडलेल्या भावना
तिच्या आठवणींचा नकोच आता लळा

रात्र आता हो
loader
Home
Explore
Events
Notification
Profile