Nojoto: Largest Storytelling Platform

Best तुला Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best तुला Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutम्हणतो तुला i love you, तुला राशि आज की, नपा तुला से वाक्य, तुला लग्न में सूर्य, तुला लग्न में राहु,

  • 176 Followers
  • 531 Stories

PS T

मित्रानों💕 आजचा विषय आहे तुला रोज जरी पाहिले... #तुला हे टँग करायला विसरु नका. लिहीत राहा😇 #Collab #marathiquotes #MarathiKavita #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #मराठी शिखत आहे #pra

read more
तरीही
वाटते असा
भेटत रहा 
लवकर
लव कर
आणि भेटत रहा...
 मित्रानों💕
आजचा विषय आहे तुला रोज जरी पाहिले...
#तुला हे टँग करायला विसरु नका.
लिहीत राहा😇
#collab #marathiquotes #marathikavita #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai #मराठी शिखत आहे #pra

Kumarchitra

#तुला छत्रीतला मी दिसलोच नव्हतो!!

read more
आपले पाहिले वर्ग नेहमी
पाऊसासोबतच भरायचे!
पहिल्यांदा तुला पाहिलं..
तेव्हा तू छत्री विसरली होतीस कदाचित 
कारण वर्गात आलीस तेव्हा
ओलेचिंब झाली होतीस..
मी मात्र तेव्हा तुझ्या त्या सोंदर्याने
अंगभर भिजून गेलो..
त्यानंतर तासन्तास तुझ्याकडे पाहत 
मग्न होऊन जायचो
वर्गाबाहेर कोसळणाऱ्या
त्या पावसासारखाच..!!
मात्र यावेळी तुलाही वीजेसारखं 
मधेमधे चमकताना पाहिलं होतं...

नेहमीप्रमाणे वर्ग भरले होते..
तुला उशीर झाला होता पाऊसामुळेच बहुतेक!
माझा जीव तू येण्याच्या वाटेवर अडकून छत्रीत होता..
तू घाईत वर्गाकडे जायला निघाली होतीस..
तुला छत्रीतला मी दिसलोच नव्हतो!

 पुढे तू अचानक थांबलीस
मी तुझ्याजवळ आलो..
मी तुझ्या डोळ्यांत पाहिलं
दुसऱ्या क्षणी गुडघ्यावर बसलो..
तुझ्या चप्पलचा निसटलेला बंध बसवू लागलो!
मी भिजतोय हे पाहून
तू तुझी छत्री माझ्या बाजूला तिरकी करत
मला तुझ्या छत्रीत घेतलंस..

आपण दोघेही तुझ्याच छत्रीत
वऱ्हांड्यात येऊन थांबलो!
तू तुझी छत्री मिटत वर्गात निघून गेलीस..
मी वऱ्हांड्यात उभा मला
छत्रीत येऊनही ओलेचिंब भासत होतो
आपण थांबलेल्या ठिकाणी
मागे वळून पाहिलं तर..
तिथेच माझी ती मिटलेली छत्री
दवबिंदूनी बहरली होती!!
                          ~  कुमार भोसले   ©️कुमारचित्र #तुला छत्रीतला मी दिसलोच नव्हतो!!

Samadhan Navale

#तुला पाहीले अन्..

read more

sandy

#सवय होती मला , #तुला ह्रदयात जपण्याची #सवय होती मला , #तुझे अबोल शब्द वेचण्याची , #सवय होती मला #तुझ्यासोबत रोज नवं स्वपनं सजवण्याचि , #सवय होती मला प्रत्येक वेळी तुला समजुन घेऊन #तुला माफ करण्याची ;-(

read more
 #सवय होती मला ,
#तुला ह्रदयात जपण्याची 
#सवय होती मला ,
#तुझे अबोल शब्द वेचण्याची ,
#सवय होती मला
#तुझ्यासोबत रोज नवं स्वपनं सजवण्याचि ,
#सवय होती मला प्रत्येक वेळी तुला समजुन घेऊन
#तुला माफ करण्याची ;-(

रिया रूपेश पवार महाळुंगेकर

read more
जितकं वाटलं ,
तितकं सोपं नाही  ,,
तुला समजणं 
हळुहळू  मी ही शिकतेय
तुला वाचणं..

अश्लेष माडे (प्रीत कवी )

प्रीत

read more
किती दिवस नखरे तुझे झेलायचं 
किती तुझ्यासाठी अजून झुरायचं 
सांग ना तुझ्यासाठी अजून काय करायचं 
तुझ्यावर प्रेम करणं थांबवायचं? 
तुला विसरून तुझ्या मनासारखं करायचं? 
तुझ्या आयुष्यातून शेवटचं निघून जायचं? 
की, असंच तुझ्यावर प्रेम करून 
मी अजून तडपायचं? 
तू ठरवलीस ना मनातलं कधीच नाही बोलायचं.. 
तूच सांग ना मग मी अजून किती आशा करायचं? 
तुझ्यावर प्रेम करत राहायचं की, तुला विसरून दूर निघून जायचं? (प्रीत)
अश्लेष माडे 
व्हाट्सअप साठी -9552290409 प्रीत

राज श्री

नजर

read more
तू पाहताच मला
माझं लाजुन नजर झुकवणं
मी पाहताच तुला 
तुझं हळूच हसणं 
तुझी नजर चुकवून
तुला एकटक न्याहाळणं
माझी ही चीरी
तू नजरकैदेत पकडणं
मी नसताना 
तुझ्या भिरभिरत्या नजरेचं
मला शोधणं
मला हि आवडायचं
तुझं हे बघणं जीवघेणं
हवाहवासा वाटायचा
हा खेळ नजरेचा
तुझ्या माझ्या प्रितीचा
रंगच वेगळा नजर

Yogesh Hiwrale

"होय तर तुला, म्हणावंच लागेल
नाही म्हणून, कसं चालेल
रोजची 'ती' सकाळ आजही आठवते
पुढे तू ,पाठी मागे मी,असेच दिवस जात होते
त्यावेळेस का नाहीस, मला थांबवलं
गालात हसून, चार वर्षे सतत फसवलं 
इतक्या वेळा,प्रेमवेडाच कुणी  फसेल
म्हणून.. होय तर तुला म्हणावंच लागेल
नाही म्हणून कसं चालेल

आहे का काही उपाय सुचव तूच जरा
एखाद्या अनोळखी पेक्षा मीच नाही का बरा
तुझ्या ,पाषाण हृदयाला आता पाझर फुटू दे,
तुझ्या प्रेमाची गाडी, माझ्या दिशेने सुटू दे
या रस्त्यानं तुला  स्वर्गसुख लाभेल
त्यासाठी...होय तर तुला म्हणावंच लागेल
नाही म्हणून कसं चालेल

तुलाही कळते आहे प्रेम माझे
तुझ्याच प्रेमाचे आहे काळजावर ओझे
नाही म्हणून, अशी छळू नकोस
विरहाच्या अग्नीत, अशी पोळू नकोस
 एवढ प्रेम तुला कोण गं करेल
शेवटी.. होय तर तुला म्हणावंच लागेल
नाही म्हणून कसं चालेल... #nahi#kasa#chalel#

Pallavi Phadnis

read more
तू येतोस कधी दीड,पाच,सात 
दहा दिवस ,येतोस ते येतोस आणि किती
सगळ्यांचा आपलासा होवून जातोस
झोपडे असो किंवा महालाचे दार
तु येतोस मुषकावर बसून स्वार
तुला बसायला सजते मखर पण
तुला माहितेयका ह्यासाठी किती
मुरड घालतात माणसे ,कधी अक्खे  घर
तुला कमी नको म्हणून काहीजण काढतात ऋण,
 आणि साजरा करताततुझा सण, 
काही जण तर भक्ती कमी आणि 
लक्ष्मीचा देखावा करतात,आणि काहीजण कडेला बसून दुर्वा 
फुले विकून संसार करतात,भक्तगण मात्र त्यांचा भाव
सोन्याप्रमाणे तोलतात 
तुझ्या पुढ्यात लागतात ,धनधान्यच्या राशी,आणि 
थोडे शेजारी बघशील तर कितीजण बघत आशेने 
काहीजण असतात अधाशी
नवसाचा म्हणून तुला भेटायला रांगाच रांगा लागतात 
गरीब वस्तीतली मंडळे ओसाड दिसतात
तुला खरेच कारे हे सगळे लागते
तुला भेटल्यावर खरेच कारे सुख भेटते
मला माहितेय तू तर भक्तीचा भुकेला
असतोस ,म्हणूनच तर तू 
अतिभक्तीनेच बुडतोस,
कारण तू तर देव आहेस तू का
बुडशील ,पण भक्तांची इच्छा पूर्ण 
करण्यासाठी बुडून पुन्हा पुढच्यावर्षी येशील 
पुन्हा सगळे सोहळे होतील पण ,
एखादा बुडलेला,दारू पिवून मेलेला
अपघाती गेलेला असे भक्त त्या 
सोहळ्यात नसतील ,तू शोधशील त्यांना 
आपल्या बारीक डोळ्यांनी ,आणि पुन्हा 
एकदा काही लोकजातील आपल्या कर्मांनी,
मग तुझ्यावर आरोप होतील अहो धार्जिनच नाही
आम्हाला गणपती ,हीच तर माणसाची नीती 
जिथे देवावर ही करंटेपणाचे आरोप
होतात, त्याच देवावर करडो खर्च होतात
स्थापन करून हौसेने ,दिमाखाने बुडवतात

                 पल्लवी फडणीस,भोर✍

शुभम जाधव

chaitanya

read more
तुला वगळुन
पडायला लागलीयेत स्वप्नं
तुला वगळुन सुखीये
माझ जगणं
हे तुला वगळणं
बरळण्या इतक सोप
कधीच नव्हतं
त्यासाठी मी 
पुन्हा उगाळुन
कित्येकदा जाळून
काढलय हे आयुष्य...

- चैतन्य chaitanya
loader
Home
Explore
Events
Notification
Profile