Nojoto: Largest Storytelling Platform

Best marathikvita Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best marathikvita Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 7 Stories

Harshada wakchoure

बघताच तुला
तो संपला
तुझ्या डोळ्यातील स्वप्नात
तोच हरवला

नाही उरले 
भान कसले
मनात हे कसले
कल्लोळ उठले

चांदणं तुझ्या सौंदर्याच
त्याच्या मन नभात पसरलं
 स्वप्न त्याचं....
 त्यालाच गवसलं
 
 पौर्णिमेचा चंद्र  गं
 तुझ्यात दिसला
 बघताच तुला
 तो स्वतःला विसरला
 
  केलीस कसली जादू,
 तू मनरमणी...
 बघून तुजला
 तो त्याचाच नुरला
 
 ओठांवरच्या स्मितात तुझ्या
 मन अडकून गेले
 न उरले भान कसले
 मन वेडे होऊन गेले

मन गुंतणे
यालाच म्हणतात रे
मनाच्या नयनांनी
तुला पाहते रे #talk#lifeexperience#story#rap#quote#comedy#poem#nojoto#nojotoapp#marathikvita

Harshada wakchoure

जन्म जन्मांतरीचे नाते तुझेमाझें
अविश्वासाला नाही इथे जागा !!
आलीच कधी आणीबाणी तर
उसवण्याआधीच तू हो सुई मी धागा!! #Love#nojoto#nojotoapp#nojotomarathi#kvita#poem#quote#nojotonews#nojototelgu#marathikvita

Harshada wakchoure

नाही इथे कोणी कुणाचा
खेळ होई फक्त मनाचा
तोंडावरती गोड बोलुनी
चाले डाव हा नेहमीचा

सुखाचे होती सारे सोबती
दुःखात असता विसरून जाती
खऱ्या खोट्या सहाऱ्याची तेव्हा
लोक जाणीव करून देती

कठीण प्रसंग येता समोर
सगळेच दूर पळून जाती
फुकटचे सल्ले देण्यासाठी
तोंडाची पट्टी चालू ठेवती

निसटून जाता पैसा सारा
चेहरे खरे दिसू लागती
पंगतीत बसून जेवणारे ही
ताटात उष्ट वाढून जाती

नको कुणाची मदत आता
नको कुणाचे उपकार
जीवनाच्या कसोटीवर
चल मारू हिंमतीने षटकार #nojoto#nojotoapp#nojotonarathi#marathikvita#nojotohindi#nojotomarathi#poem

Harshada wakchoure

पडक्या भिंती

पडक्या भिंतींनाही आहे
अजुनी ओलावा मायेचा
पाहता काळीज तुटत जाते
आवाज येतो आईच्या हाकेचा

गावाकडची मातीच न्यारी
हृदयांना घट्ट सांधणारी
नसेल कुठले नाते तरीही
आपुलकीने मने बांधणारी

सय आजीच्या गोधडीची
हवासा खजिना गोष्टीचा
खाऊ देताना माझ्यासाठी
थरथरणारा हात मायेचा

आठवते हिवाळ्यातली आगटी
गप्पांचा फड उभारणारी
आणि उब आईच्या कुशीची
वत्सलतेने मज बिलगणारी

आधारवड माझ्या बाबांचा
घराचा डोलारा तोलणारा
क्षणोक्षणी आठवत रहातो
पाठीवर हात फिरणारा 

पाहता पडकी भिंत आजही
दृश्यपट तो उभा राहतो
एकेकाळच्या नंदनवनाची
आजही तो साक्ष देतो #nojoto#nojotoapp#nojotomarathi#marathikvita#nojotopoem#nojotohindi#nojotonews#nojotobestpoetry

Harshada wakchoure

कोरोना नाही.. 
वेडी तुझ्यावाचून 
करमेना असं झालंय.. #nojotomarathi#hindinojoto#talk#lifeexperience#story #rap#comedy#quote#marathikvita#nojototelgu

Harshada wakchoure

Renuka Dehankar

 #marathi #marathikvita #marathichodoli #renudehankar #renukadehankar


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile