Nojoto: Largest Storytelling Platform

मराठी कविता | 100+ Best Marathi Kavita 2022

Find the Best Marathi Kavita from top creators only on Nojoto App. Also find trending Shayari, Status, Quotes, Photos & Videos about marathi prem kavita, marathi charoli, marathi kavita on life

  • 148 Followers
  • 8090 Stories

Mr.Ravi Rajdev

श्री गणेशा💦💞🫶🙏 #Nojoto2liner #viral #reelsinstagram #short_video #story #likenojotoindia #trendingnow #ganpatibappamorya #ganpatifestival प्रेरणादायी कविता मराठी मराठी कविता संग्रह छोटी कविता मराठी 5 वी मराठी कविता मराठी कविता संग्रह #मराठीकविता

read more

गोरक्ष अशोक उंबरकर

Amruta

प्रेम आहेस तू... 

आयुष्याच्या वाचनालयात 
एक अनोखं पुस्तक आहेस तू 
वाचण्यात तूला 
जिवन घालवू शकते मी

अर्थाच्या या जगात 
एक निरर्थक स्वप्न आहेस तू 
बघण्यात तूला 
जिवन घालवू शकते मी

खोट्या प्रेमाच्या दुनियेत 
खऱ्या मनाचा राजा आहेस तू 
मनात ठेऊन तूला 
जिवन घालवू शकते मी

माझ्या निर्जीव प्रश्नांचं 
कोणालाच न कळणारं उत्तर आहेस तू
शोधत तूला
जिवन घालवू शकते मी

तहानलेल्या मला
प्रेमाचं दिसणारं मृगजळ आहेस तू
पिऊन तूला
जिवन घालवू शकते मी

पाणावलेल्या डोळ्यातून निघणार्‍या 
अश्रूंचं रहस्य आहेस तू 
उलगडत तूला
जिवन संपवू शकते मी...

                           -अमृता...

©Amruta

गोरक्ष अशोक उंबरकर

Shubham Kolse

स्वामी समर्थ भक्ती गीत # छोटी कविता मराठी मराठी कविता प्रेम #मराठीकविता

read more

Chaitanya Bhalerao

White आता सावरलं आहे मनाला

जपलं आहे माझ्या हृदयाला

आवरलं आहे भाबड्या स्वभावाला

कामात व्यस्त ठेवलं आहे स्वतः ला

जास्त ताण देत नाही मी मेंदूला

एकट्याने शिकलं आहे आता जगायला

खूप काही बाकी होते शिकायला

 समाजाने शिकवलेच नाही चांगले वागायला

रिकामा जन्माला येतो रिकामाच
वरती जातो तरी हवं इतकी कशाला

आपले या जगात काहीच नसते
हे कळतंच नाही माणसाला

©Chaitanya Bhalerao #sad_quotes

Vaibhav Thakre

Jaymala Bharkade

White काजवा 

एक कोर चंद्राची 
चमचमत्या या नभात 

हजारों नीं केली गर्दी 
एक चांदणी लुकलुकती 

या काळोखाच्या रात्रींतही 
काजवा उडे स्वयंप्रकाशी

©Jaymala Bharkade #काजवा

S Patil

prayag pawar

कृष्ण मनातला...

काय उपमा देऊ कृष्णा 
तुझ्या माझ्या नात्याला 
न झालो सखा अर्जुन 
न झालो सवंगडी सुदामा ||१||

न रमलो मीरे सारखा, तरीही 
जपले तुला मनाच्या कोन्यात
पाहतो कधी त्या मोरपिसात
ऐकतो तुला बासरीच्या सुरात||२||

वसलास मनात माझ्या तुच 
एक अलौकिक शक्ती बनून 
हरवलेल्या दिशेचा वाटाड्या 
कधी काटेरी वाटेवरचा सांगाती||३||

त्या अगाध तुझ्या बाललीला 
दिसती आजही बालमनांत
नाजुक- नाजुक पावलांनी 
बाल खेळ खेळती घराघरांत||४||

भेट तुझी व्हावी एकदातरी
भेटावा मला कृष्ण मनातला
हळव्या चंचल मनास माझ्या
अर्थ समजावा जीवनातला.||५||

-प्रयाग पवार 
वाघवाडी परळी सातारा

©prayag pawar #krishna
loader
Home
Explore
Events
Notification
Profile