Find the Best सरी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about सरी meaning in english, सरी meaning in marathi, सरी meaning, सेरेट, सरीसृप,
Shankar kamble
*दशाक्षरी काव्यरचना.* *मेघ दाटले....* *मेघ दाटले काजळ काळे* *मनी हर्षाचे झुले उमाळे* *मोर पिसाचे फुलले डोळे* *मातीचाही गंध दरवळे* *वाट पाहिली चातकापरी* *अलवार येती मृगसरी* *तनां-मनां या भिडल्या धारा* *सूर अवचित ओठावरी* *थेंब नाचे टपटपणारे* *खळखळ नादे जळभारे* *अवखळ चंचल हे वारे* *सृजनाला ये उधाण सारे* *बीज अंकुरे धरणी पोटी* *येती जुळूनी मीलन गाठी* *साज मखमली झऱ्या काठी* *इंद्रधनू मग येई भेटी* *पानोपानी छटा उमटल्या* *गर्द पोपटी हिरव्या ओल्या* *बहरून आल्या नभांगणी* *घन सावळ्या हरिणी न्हाल्या* ©Shankar kamble #पाऊस #पाऊसधारा #पाऊसाततुझीआठवण #पाऊस_पडून_गेल्यावर #पाऊसाला #थेंब #थेंबाचे #सरी
Asha...#anu
विसरून भान... होउन लहान... सरीच्यां सुरात छान... बेधुंद होऊन भिजा रे....!!! नको बंधन मनाला... विसरा या जगाला.... आनंद हा मोलाचा... बेधुंद होऊन ह्या रे...!!! निर्मल सरीत.. होईल निर्मल मन... नका गमवू हे अमूल्य क्षण... बेधुंद होऊन नाचा रे..!!! #पाऊस #सरी
Shilpa ek Shaayaraa
सरी प्राजक्ताच्या तीच्या दारी धकधक असे माझ्या ऊरी सुख साता जन्माचे रे लाभावे देवा माझ्या परी #Shilpa #Sari #TpWritting #Shilpa_ek_Shayaraaa #ShilpaSalve358 #सरी प्राजक्ताच्या तीच्या दारी धकधक असे माझ्या ऊरी सुख साता जन्माचे रे लाभावे देवा माझ्या परी #Shilpa
रोशन पाटील 7066644485
ये गं ये गं सरी ये गं ये गं सरी ऋतु पावसाळा मृगसरीं कोसळून बुडू दे माझी शाळा चार दिवस मिळून सुटी घरी ठेव मारकुट्या बाईंना गृहपाठ मी केला नाही भिजवून टाक गुरुजींना पीटीच्या सरांना असु दे उघडीप पावसापासून खेळू नाचू गाऊ आम्ही दे सुट्टी अभ्यासातून शाळेत येऊ दे रोज कला नि संगीत सर काढू चित्र करू गायन संगीताचे गावू सप्तस्वर © सौ.भारती सावंत सदर कविता माझी नसुन ती त्या कवियत्रीच्या सांगण्यावरून मी एडीट केलीय, कवितेबाबतचे सर्व हक्क कवीयत्री कडे राखीव. . . 🙏🙏😊
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto