Find the Best वाट Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutac कितने वाट का होता है, फ्रिज कितने वाट का होता है, कूलर कितने वाट का होता है, भरियो वाट को, वाटली का,
Shankar Kamble
चोरपावली सांज दाटली रानभूल ही वाट हरवली थबकत आले भास अवेळी माखून काजळ रेघ ओली.. सताड उघडे दार नभाचे नक्षत्रांचे रम्य फुलोरे गळूनी गेले शिणले मोती भग्न हासती खिन्न मनोरे.. क्षितीजाच्या या गूढ पटली चितारलेली हळवी नक्षी तळहातावर गोंदून गेली रंग हळदी पिवळी पक्षी.. जलाशयाच्या संथ दर्पणी बिंब उमटले नवं तरुंचे मुखं न्याहळी अती कौतुके तरंग भरले डोह मनाचे.. सावल्यांचे खोल जाळे नाते विणती एक क्षणाचे धूसर झाल्या दृश्य प्रतिमा भाव कोंडले आर्त मनाचे.. ©Shankar Kamble #moonnight #आठवणी #सांजवेळ #सांजहीवेडलावी #संध्याकाळ #रात्री #तू #वाट #वाटतुझी
#moonnight #आठवणी #सांजवेळ #सांजहीवेडलावी #संध्याकाळ #रात्री #तू #वाट #वाटतुझी
read moreShankar Kamble
शोधून सापडेना ही वाट हरवली जेंव्हा परतुन पावलांचा कुणी माग काढतो तेंव्हा.. थबकून तळ्याच्या काठी का पूर आसवे ढाळी? गर्भार सावल्या पंक्ती लेणे मिरवती कपाळी.. पाचूने जडले होते मोहरले पान दवाचे दैवात अवेळी सुकणे बोचते शल्य कशाचे? सांधला बांध मनाचा स्पुंदतो श्रावण डोळा कुरतडले कोंब कधीचे तरतरला खोल उमाळा.. हळूवार घालते साद दूरदेशी रुसला रावा पंख यावे मजं भाबडी गंध रातराणी न्यावा.. निसटून चालले श्वास राहिले भास कोरडे वळीवाच्या चार सरींना रान आतुर का एवढे? ©Shankar Kamble #Alive #वाट #वाटते #भास #सखी #भाव #देह #लाज #प्रेम
Dileep Bhope
कालपासून अंगणातला वाराही बघ कसा बेफाम झालाय.. तुझ्या कोसळण्याची वाट पहायचा त्यालाही कंटाळा आलाय.. ©Dileep Bhope #वाट
Anuradha Shinde
सांजवेळी तुझ्या आठवणींचे नभ येते दाटून आठवते तुझ्याशी ते हळूच बोलणं चोरून किती धडपड मग भाबड्या जीवाने करायची तुझा आवाज ऐकला कि हळूच लाली गाली चढायची तुझ्या भेटीची ओढ मनाला कासाविस करायची वाट मग तुझ्या येण्याची खुळ्यागत बघायची Yedu...!! ©Sujata Chavan #वाट तुझी खुळ्यागत बघायची#
#वाट तुझी खुळ्यागत बघायची#
read moreShankar kamble
*गर्द दाटला अंधार सभोवती* *हरवून गेल्या वाटा* *वादळात भरकटे किनारा* *नेती दूर लाटा* *हाती गवसले होते काही* *क्षणांत निसटून गेले* *प्रकाशातले जगणे सरले* *घन अंधारून आले* *क्षणिक सुखाचे रंग फसवे* *मोहवी मन चार क्षणाला* *बहर सरता येई पानगळ* *एकाकी जग भास उद्याला* *नभांगणी तळपती अविरत* *अगणित तेजोराशी* *काळोखाचा श्राप भोगतो* *काजवा मी मंद प्रकाशी* *माझ्याच कोशी गुरफटलो* *विणले अभासी जाळे* *उतरता भोग समाधी* *निवळले गढूळ जळ निळे* ©Shankar kamble #अंधार #काळोख #वाट #वाटा #काळोख😢🖤Fearofdarkness😢काल #Moon
Shankar kamble
गर्दीत माणसांच्या.... गर्दीत माणसांच्या चुकलो कधीच नाही चाललो एकटा पण थकलो कधीच नाही देवूनिया दिलासे समजावतो मनाला खोटे कुणा खुलासे केले कधीच नाही हातात भाग्यरेषा शोधतो पुन्हा नव्याने भाग्यातले कुणाचे नेले कधीच नाही फाटक्याच झोळीतले मोती उधळले सुखाचे भणंग असलो जरी मी चोरले कधीच नाही माझ्याच सावलीला पोरका असा अभागी ओरबाडूनी सुखाला छळले कधीच नाही बसूनी उगा किनारी लाटांची चिंता कशाला ढाल करुनी कधी कुणाची लढलो कधीच नाही क्षितीजावरी बहरल्या रंगछटा मावळतीच्या अत्तरापरी सुगंधी जगणे करून गेलो ©Shankar kamble #गर्दी #माणसे #वाट #सुख #जीवन #आयुष्य #जगणंकसंअसावं #जगणं
sandeep wagh
वाट पाहत पाहत.. रात्र ही पूर्ण झाली... तुझ्या स्पर्शाची फक्त, जाणीव तेवढी राहिली...! sandeep wagh #intejar #वाट #डोळे #पाहून #माझीलेखणी #Facebook #post #shadesoflife
#intejar #वाट #डोळे #पाहून #माझीलेखणी #Facebook #post #shadesoflife
read morehemlata mandle
कधिच कोणाच्या परत येण्याची वाट पाहु नका कारण ते हरवलेले नसतात तर ते बदललेले असतात #वाट
Pallavi Phadnis
*त्या आभाळाला निरोप* त्या आभाळाला द्या माझे निरोप त्याच्यावर आज खूप झालेयत आरोप किती वाट पाहायची त्याने भरून यायची वाट पाहायची घराच्या दारात , आत्ता येईल आणि गर्द ओल्या मिठीत घेईल मी आपले सावरुन बसायचे आणि ह्याने मात्र मयसभाच उभी करायची मग जरा बागेत जावून ,फुलांवर मोती साठलेत का पाहायचे ,आणि ह्याने मात्र आत्ता येतो सांगून गरगर फिरायचे ह्याला फक्त एक निमित्त असते,यायचे म्हणून गडगडाट करतो,आधी पाठवतो वाऱ्याला आणि त्याच्याशीच भांडतो ह्यात मात्र हे लबाड आभाळ हळूच घर सोडते आणि हळूच पुढे निघून जाते ह्याला कुठे माहितेय ,हे आभाळ दिसले की सगळ्या सृष्टीला येते भरून ,तो चातक बसतो शाखेवर,आणि मयूर फिरतो रानभर, छोट्या छोट्या पाखरांची घरट्यात परतण्याची घाई , पदर सावरुन बसलेलीअसते वनराई , सगळ्यांच्या डोळ्यांची होतात निरांजने, ह्याचे मात्र आगंतुक येणे ह्याच्या खेळात सगळेच सामवतात, आमच्यासारखे ही लेखणी घेऊन कल्पनेत रमतात, किती त्याचे लडिवाळ चालतात चाळे ,सगळीकडे सृष्टीच्या डोहाळपणाचे सोहळे आता ह्या आभाळाला आणखी एक प्रेमळ निरोप , येशील तेंव्हा सुख घेऊन ये नाहीतर तुझ्यावर होतील सावत्रपणाचे आरोप तुझे नी धरतीचे नाते अनोखे आम्ही का ठेवावे तुझे लेखेजोखे तू कधी हि ये पण येताना अनुरागी आनंद घेऊन ये ,तुझ्या भरल्या कृष्णशितल ,शाश्वत मिठीत मला अलगद गोजांरुन सामावून घे पल्लवी फडणीस,भोर✍