Nojoto: Largest Storytelling Platform

Best स्वप्नं Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best स्वप्नं Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutस्वप्नं का पडतात, स्वप्नं अर्थ, स्वप्न meaning, स्वप्न, माझी स्वप्न,

  • 10 Followers
  • 11 Stories

शब्दवेडा किशोर

White #स्वप्नं पाहतोय तुझ्यासोबत.....
शब्दवेडा किशोर 
स्वप्नं पाहतोय तुझ्या डोळ्यात आपल्या निखळ प्रेमाचे
चोरपावलांनी अलगद तू माझ्या आयुष्यात यावं
अन् कारण बनावं माझ्या जगण्याचं
स्वप्नं पाहतोय तुझ्यासोबत त्या चांदण्या रात्रीचं जेव्हा
तुझा हात माझ्या हृदयाशी असेल अन् माझ्या कानी तुझ्या हृदयाचं धडकनं असेल
माझ्या अस्तित्वाचा मनमयूर तुझ्या मनाला साद घालत असेल 
ढगाआड लपून हा चांदोबाही मग माझ्यावरच जळत असेल
आकाशातले तारेही तुला पाहून आपसुकपणे डोळे मिचकावतात 
त्यांनाही तुझी ओढ असते म्हणून चांदण्याची साथ सोडुन तुझ्याकडेच ते धाव घेतात
स्वप्नं पाहतोय तुझ्यासोबत या आयुष्यरूपी त्या खडकाळ झऱ्यातून अणवाणी चलण्याचे 
तुझा हात असेल तेधवा मग माझ्या हातात मी सावरणं तुला हा विश्वास असेल तुझ्या मनात
मग तो झराही सुखावेल तुझ्या स्पर्शाने अन् पावलांच्या तुझ्या मनमधूर स्पर्शाने प्रेमाची पालवी फुटेल
त्या खडकाळ दगडांच्या मनात
स्वप्नं पाहतोय तुझ्यासोबत सांजवेळी समुद्राच्या वाळूत पाय रुतवून बसण्याचे तुझ्यासाठी
असलेल्या माझ्या काळजीचं जॅकेट तुझ्या खांद्यावर घालावं
 माझ्या खांद्यावर तुझं डोकं ठेवावं अन् बसावं जरासं आपण दोघे निःशब्द होऊन
क्षितीजापलीकडे नजर लावून उद्याची स्वप्नं पहात असू
त्या चमकणाऱ्या लाटांचे चेहऱ्यावर उडणाऱ्या त्यांच्या तुषारांचे
स्वप्नं पाहतोय तुझ्यासोबत एकाकी वाटेवर चालण्याचे एकमेकांना साथ देत स्वप्नांचे इमले रचण्याचे 
ती वाटही आच्छादून गेली आहे फुलांनी पालापाचोळ्यानी अन् त्यांच्या इच्छांनी
त्यांनाही त्यांच्या मनावर ठसे हवेत आहेत तुझ्या पावलांचे
स्वप्नं पाहतोय तुझ्यासोबत या बेभान पावसात भिजण्याचे 
मन बेभान होतं तुला पाहुन भिजलेल्या तुझ्या केसातून बटेवरून गालांवर
ओघळलेल्या पावसाच्या थेंबाने पण पावसालाही झिम्माड व्हायचं असतं
भिजलेल्या तुझ्या केसांच्या सुगंधाने    
बस्स....आता वाट पाहतोय फक्त मी त्या दिवसाची
जेव्हा तू माझ्यावर वेड्यासारखं प्रेम करणार
सांग ना सखे..माझ्या मनाचा उंबरठा ओलांडून माझ्या हृदयाचं 
दार कधी ठोठावणार ?

©शब्दवेडा किशोर #आयुष्याच्या_वाटेवर

kavi sagar chavan

#स्वप्नं "मराठी कविता #HeartfeltMessage

read more

Harsh

मला पडलेलं स्वप्नं... 

स्वप्नात आला माझ्या एक भयानक जिन,
    म्हणाला मला, तुला माहीत आहे चीन? 
मी विचारलं त्याला काय तुला म्हणु? 
  तो म्हणाला मला, मी एक विषाणू-मी एक विषाणू.. 

म्हणाला मला, येतॊ तुझ्या भारतात, 
   मी म्हणालो तुला खेचेन मी कोर्टात. 
म्हणाला बघ कसा येतॊ गर्दीतून, 
   सर्वांपर्यंत पोहचेल मी खोकला, सर्दीतून. 

मी म्हणालो त्याला गप्प आता बस !
    आमच्यकडे आहेत खूप साऱ्या लस. 
तो म्हणाला माझेपण मित्र आहेत खूप, 
   अल्फा, बीटा, ग्यामा दाखवून देतील रूप. 

म्हणाला सगळ्या जगावर माझेच असेल राज्य, 
    कोरोना एकूण आता राहतील सगळे सज्य. 
सगळीकडे फक्त माझेच असेल भय, 
    न्यूज आणि पेपरमध्ये माझाच असेल विषय. 

मी म्हणालो आमची, करू आम्ही रक्षा. 
  व्हॅक्सीन घेऊन करू, आता तुला शिक्षा. 
कोरोना म्हणाला येणार,नाही आता पुन्हा, 
   नियम फक्त पाळायला, सांग तू त्यांना-सांग तू त्यांना... 

                                         -हर्षल दत्तात्रय चौधरी

©Harsh #Dreams 
#स्वप्नं 
#corona 
#Mic

Swapnil Suresh Bhovad

#Barrier

read more
जपून राहिले सर्व ,

झोपून राहील गाव ,

ओरडत होते देठापासून ,

 बदनामीचा डाव,

बंद पडली रुग्णवाहिका , 

क्वार्टरस् लागले गळू ,

लाईट येते जाते ,

गप चूप आणि हळू ,

रस्ते आणि गटारे  ,

झाली गुडूप ,

गेले सर्व वाया ,

जनता चिडी चूप !



#स्वप्नं kavi
7028745643 #Barrier

Kumarchitra

दिवस जरी कचऱ्यात जात असला
तरी रात्रीची स्वप्नं चांगलीच पाहतो..
येणाऱ्या प्रत्येक दिवसागणिक मात्र
 तीच स्वप्नं 
पोटाच्या खाचेत विरून जातात..

©️कुमारचित्र #स्वप्नं #dreams

Manish Kanade

तुझ्या स्वप्नांमध्ये रमण
मी आता सोडून दिलय 
नवीन चित्र काढण्यासाठी 
देवाने तेच पान जणू खोडून दिलय 

        - मनिष ज्ञानदेव कानडे,पुणे #स्वप्नं

Neeraj Shelke

आपली स्वप्नं उंच जरूर असावी , पण ती साकार करण्यासाठी 
जी मेहनत करावी लागते त्याचीही मनात तयारी जरूर करावी.
फ़क्त स्वप्नं पाहून ती पुर्ण होत नसतात तर ती पुर्ण करण्यासाठी 
जों दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून मेहनत घेतो 
त्यांचीच़ स्वप्नं सत्यात उतरत असतात.

©नीरज शेळके 
इंस्टाग्राम । @kavi_manacha_neeraj #स्वप्नं #

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile