Find the Best विठ्ठल Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutतो हा विठ्ठल बरवा, येई हो विठ्ठले आरती lyrics, धावून ये विठ्ठला सत्वरी lyrics, धावून ये रे विठ्ठला, धावून ये विठ्ठला सत्वरी रिंगटोन,
Sachin Zanje
विठ्ठूराया माझा , चंदनाचा कंद विठ्ठूराया माझा , चंदनाचा कंद. कपाळी ही गंध, चंदनाचा...||धृ || चंदनाचा ऐसा पितपिंताबर चंदनाचे कर , कटावर ||१|| चंदनाची उटी ,शोभे सर्व अंगी घननिळरंगी , रंगोनिया...||२|| चंदनाचे बन ऐसा तो सुगंध.. येई मंद मंद , परिमळ..||३|| म्हणे कैकाडीबुवा, करागा चंदन.. झिजविण्या तन , तुम्हालागी..||४|| गायक :-गुरूवर्य पं.अजित कडकडे जी. रचना :-संतश्रेष्ठी कैकाडीबुवा ©Sachin Zanje #अभंगवाणी #विठ्ठल #विठ्ठूरायामाझा #सचिनझंजे.
#अभंगवाणी #विठ्ठल #विठ्ठूरायामाझा #सचिनझंजे.
read moreGANESH EDITZ
✨🙇🏻🌍 #viral #Trending #Attitude #single #videoediting #nojotoattitude #nojoto2023 #NojotoFilms #विठ्ठल
read moreRashmi Hule
विठ्ठल विठ्ठल नाम घेता घेता चालती पाउले जराही न थकता वारी ती पोहोचली पंढरीस आता आतुर दर्शनास, दिसे तो विठू भक्ता दिसली ती 'माऊली' फिटे पारणे डोळ्यांचे वारी करुन पंढरीची सार्थक उभ्या जन्माचे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल आषाढी एकादशी च्या माझ्या मित्र आणि मैत्रिणीनां हार्दिक शुभेच्छा... कस काय मित्रानों मग आज विठ्ठलांच्या नामाचा गजर करत असाल ना? माहीतीय मला म्हणुनचं आजचा विषय आहे विठ्ठल विठ्ठल... #विठ्ठल #विठ्ठलविठ्ठल #collab #yqtaai
आषाढी एकादशी च्या माझ्या मित्र आणि मैत्रिणीनां हार्दिक शुभेच्छा... कस काय मित्रानों मग आज विठ्ठलांच्या नामाचा गजर करत असाल ना? माहीतीय मला म्हणुनचं आजचा विषय आहे विठ्ठल विठ्ठल... #विठ्ठल #विठ्ठलविठ्ठल #Collab #yqtaai
read moreShankar Kamble
*संत सज्जनांचा भार* *वैष्णवांची मांदिआळी* *वाळवंटी भीमा तीरी* *नाद मृदंग चीपळी!!१!!* *विरक्तीचा भाळी टिळा* *करी वैराग्य पताका* *षडरिपुंचा काकडा* *होय तूच ज्ञाना, तुका!!२!!* *मुखी यज्ञ नाम घोष* *फिटे संसार पारणे* *नेत्रं तृप्त सुखावती* *रूप सावळे देखणे!!३!!* *घेतां चरणांशी मिठी* *बंध प्रारब्ध तुटले* *गळागळी भेट झाली* *माझे "मी"पण सुटले!!४!!* *दीन पतीत दुबळा* *आतां एकची मागणे* *पुन्हा नको जन्म फेरा* *विठू हेची रे सांगणे!!५!!* ©Shankar Kamble #वारी #विठ्ठल #विठ्ठल_रखुमाई #वारी_आयुष्याची #वारी_जांऊ #पंढरपूर #कृष्ण #NojotoRamleela
#वारी #विठ्ठल #विठ्ठल_रखुमाई #वारी_आयुष्याची #वारी_जांऊ #पंढरपूर #कृष्ण Ramleela
read moreShankar Kamble
पंढरीच्या वाटे!भार वैष्णवांचा! सोहळा सुखाचा! अनुपम!* माया मोह बंध! उतरले पार!* तरला सागर !जड जीवा!* देहाची ना शुद्ध! चित्त गुंतलेले!* नामात दंगले !रामकृष्ण!* *मुखी घेता नाम !शीण हा सरला! भरून उरला! देहांघटी!* सवे चालवितो !भार तो वाहतो!* नेत्रां दाववितो! पाप पुण्य!* ओढ अंतरीची !अंतराला ठावी!* गळाभेट व्हावी !मनीं आस!* *पायी लोटांगण !आसवे प्रक्षाळी! चरणे सावळी !विठुराया!* कंठ सद्गगदित !भाव ही खुंटले!* विकार लोपले! दर्शनाते!* ©Shankar Kamble #वारी #विठ्ठल_रखुमाई #विठ्ठल_विठ्ठल #वारी #वारी_आयुष्याची #दिंडी #पंढरपूर #विठ्ठल
Shankar kamble
*पंढरीच्या वाटे।धावे मन वेडे।* *संसाराचे कोडे।सोडवी तू।* *डोळा वाहे नीर।सुटलासे धीर।* *पाहण्या अधीर।सावळ्याला।* *बहु तापलो मी।संसार या तापे।* *जमविली पापे।नानाविध।* *नेत्रांची काहिली।तूच करी शांत।* *आता ना उसंत।क्षणभरी।* *चरणाशी मिठी।देवू अलिंगन।* *हृदयाची खूण।हृदयाला।* *गण गोत्र तोची।भीमा तटी उभा।* *चैतन्याचा गाभा।शोभतसे।* *पामर पतित।कैसा येवू पुढे।* *विषयां सवडे।निरवावे।* *पुण्याची शिदोरी।आज फळा* *आली।* *भेटाभेट झाली।पांडुरंगे।* *मागणें न काही।आता उरे काय।* *समरस साय।दुग्धासवे।* ©Shankar kamble #विठ्ठल #वारी #पंढरीचीवारी #विठू_माऊली #विठ्ठल_रखुमाई
#विठ्ठल #वारी #पंढरीचीवारी #विठू_माऊली #विठ्ठल_रखुमाई
read moreShankar kamble
आसावला जीव।ओसंडला भाव। अंतरीचा ठाव।सावळ्या तू।।१।। कातर मनाला।आठवं क्षणाला। काकडा ओवला।देहरूपी।।२।। मनं ओढावते।दर्शनांते आस। जीवां रात्रंदिस।ध्यास तूझा।।३।। तोडीयले बंध।पाश मायारुपी। अंतरी स्वरूपी।तूच सदा।।४।। काय करू सांग।चित्त उसवले। पाहतो वाटुले।पंढरीची।।५।। अंतरी उमाळा।तोची घननीळा। सांगू लडिवाळा।गूज मनीं।।६।। नाद प्रसवला।परब्रह्म देहीं। मनाचियां डोही।नाद रंगे।।७।। देहादेही एक।भाव समरूप। पापांचे कळप।सुटती बां।।८।। मागणें न दुजें।आतां उरे काही। मनीं वसे ठायी।पांडुरंगे।।९।। श्री. शंकर नागनाथ कांबळे ©Shankar kamble #वारी #विठ्ठल #पंढरपूर #माऊली #वारी_जांऊ #पांडुरंग #विठ्ठल_रखुमाई #सावळा