Nojoto: Largest Storytelling Platform
anilsapkal8897
  • 12Stories
  • 37Followers
  • 1.3KLove
    1.5KViews

Anil Sapkal

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
276a16363e8b3c1f715b28fc8ffa8c16

Anil Sapkal

पिता का धड़कता दिल है बेटी
पिता के खुशियोंकी तस्वीर हैं बेटी।
कौन कहता है कि बोझ है बेटी 
सच कहूं तो पिता की तकदीर है बेटी।।




















                                                                    अनिल सपकाळ 
                                                                    ८८७९१३८६८६

©Anil Sapkal बेटी  #हिंदी कविता# प्रेरणादायी कविता हिंदी# प्यार पर कविता# कविता कोश# कविताएं#daughters

बेटी #हिंदी कविता# प्रेरणादायी कविता हिंदी# प्यार पर कविता# कविता कोश# कविताएंdaughters

276a16363e8b3c1f715b28fc8ffa8c16

Anil Sapkal

गांधी का मरत नाही..# मराठी कविता#gandhi #गांधी #History # मराठी कविता संग्रह

गांधी का मरत नाही..# मराठी कविताgandhi गांधी History # मराठी कविता संग्रह

276a16363e8b3c1f715b28fc8ffa8c16

Anil Sapkal

थका हारा जब जब तू दफ्तर से घर आता है
मुश्किलोमे, संकटोमें जब जब तू घिर जाता हैं ।
ऐसे में क्या करे तब कुछ समझ नहीं आता है 
आंख से आसू बहता हैं और पापा याद आता है।।


जिम्मेदारियों का बोझ जब जब सरपें आता हैं
कोशिशोंके बावजूद भी तू संभाल नहीं पाता है।
अकेलेपनका अहसास जब जब तुझे सताता है
आंख से आसू बहता है और पापा याद आता है।।










अनिल

©Anil Sapkal #foryoupapa पिता जीवन का संगीत है, पिता हैं तो जित है ll # कविता कोश# प्यार पर कविता# हिंदी कविता# कविताएं# प्रेरणादायी कविता हिंदी

#foryoupapa पिता जीवन का संगीत है, पिता हैं तो जित है ll # कविता कोश# प्यार पर कविता# हिंदी कविता# कविताएं# प्रेरणादायी कविता हिंदी

276a16363e8b3c1f715b28fc8ffa8c16

Anil Sapkal

White जीवनाच्या प्रवासात 
बरच काही जमवलय 
                                    
                                 सुख, चैन, उसंत असं 
                                 खूप काही गमवलय...






                                                                अनिल सपकाळ

©Anil Sapkal poem
276a16363e8b3c1f715b28fc8ffa8c16

Anil Sapkal

कुंचल्यांच्या रेशामधूनी चित्र चितारताना 

क्षितिजाच्या पलिकडे कल्पनेत रमताना

कातरवेळी जोजवत राहतो उनाड त्या दुखःना 

त्या आठवणींचा पान्हा झर झर झरताना....















अनिल

©Anil Sapkal आठवणींचा पान्हा...

आठवणींचा पान्हा... #मराठीकविता

276a16363e8b3c1f715b28fc8ffa8c16

Anil Sapkal

White प्रेम...


पाहतो चोरून तुजला, पाठमोरी झाल्यावर 
होत जाते वेडेपिषे मन तू निघून गेल्यावर

मग नयनांच्या चक्षुमध्ये कैद करतो पायवाटा
त्या वाटेवर तुझे मखमली पाय तू ठेवल्यावर.

©Anil Sapkal #sad_shayari
276a16363e8b3c1f715b28fc8ffa8c16

Anil Sapkal

खरं खरं सांगा आज
तिला सुट्टी असेल का ?
मुलं बाळ, काम सोडून
थोडं निवांत बसेल का ?

कुणीतरी तिच्यासाठी 
कपभर चहा आणेल का ?
तिला काय हवं नको 
न बोलताच जानेल का ?

देव्हाऱ्यातल्या लक्ष्मीसम
सन्मानाने बघेल का ?
भोगाची वस्तू नाही ती
बाई म्हणून जगेल का ?

ओघळणारे अश्रू तिचे
अलगद कुणी पुसेल का ??
बाईमध्ये आई, बहीण
मुलगी आम्हा दिसेल का ??

बाई म्हणजे जन्मदात्री
हे कधी कळेल का ???
तिच्यासाठी एक पणती 
रोज देवासमोर जळेल का ??

                                                                                अनिल सपकाळ
                                                                                ८८७९१३८६८६

©Anil Sapkal
  #womeninternational
276a16363e8b3c1f715b28fc8ffa8c16

Anil Sapkal

Red sands and spectacular sandstone rock formations देव..


का जायचे मी सांग मंदिरात आता

जर देव संकटात धावणार नाही 


उगा करु कशाला पूजा अर्चना ती

देव त्या पूजेने मज पावणार नाही 


झालेत घासून ते उंबरठे ही आता 

उगा जीव त्यांना मी लावणार नाही 


देईन घास मुटका भुकेल्या जीवाला

उगा मी तो भोग दावणार नाही 


म्हणे निराकार निर्गुण आहे देवही तो 

दगडात ही बघ तो मावणार नाही 


कुठे शोधतो कशाला मंदिरी, मशिदी

तिथे कुठे तुला तो घावणार नाही 


घे शोध तु स्वतःचा, घे डोळे मिटून थोडे

कुणाचे कधीही मग फावणार नाही ...


उगा करु कशाला पूजा अर्चना ती

देव त्या पूजेने मज पावणार नाही...


अनिल सपकाळ

८८७९१३८६८६

©Anil Sapkal #Sands
276a16363e8b3c1f715b28fc8ffa8c16

Anil Sapkal

राजं परतून पुन्हा या ....

विस्कटलीय राज्याची घडी
राजं परतून पुन्हा या 
येऱ्या गबाळ्याचे काम नव्हे 
सत्तेची कमान हाती घ्या 

पुन्हा नव्याने उगुदे सूर्य
फुटुदे स्वराज्याची पहाट
बटिक झालेल्या लोकशाहीला
बघुदे पुन्हा राजेशाही थाट 

जातीपातीत, धर्मा-धर्मात आज
विभागलय आमचं रक्त 
हिंदू, मुस्लिम , महार, मांग
राजं सारच तुमचं भक्त 

आया बहिणी कमनशिबी
रोजच होतोय घात
निघुदे तुमची समशेर राजं
छाटून टाका हात

जमवून पुन्हा सवंगडी
मांडू नव्याने डाव
जाती धर्माच्या वर्मावर
घालू पुन्हा घाव

स्थापन करून सुराज्य
एक "संभाजी" आम्हा द्या 
तोवर एकच मागणं आमचं
राजं परतून पुन्हा या ...
परतून पुन्हा या .......


अनिल सपकाळ
८८७९१३८६८६

©Anil Sapkal
  #ShivajiMaharajJayanti
276a16363e8b3c1f715b28fc8ffa8c16

Anil Sapkal

#storytelling
loader
Home
Explore
Events
Notification
Profile