Nojoto: Largest Storytelling Platform

New बळीराजा चारोळी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about बळीराजा चारोळी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बळीराजा चारोळी.

    LatestPopularVideo

viraj gosavi

बळीराजा #मराठीविचार

read more

....

बळीराजा #OpenPoetry

read more
#OpenPoetry *व्यथा बळीराजाची*

नाही आभाळात पाणी
करपले पिक उष्माघाताने 
उरले फक्त डोळ्यात पाणी 
तेही शोषले सरकारने.

शाळा हाय पोट्टयाची
कस धाळन त्याले
पैसे नाही हाताशी
कसा शिवण मनीला त्याले.

यंदा लगन हाय पोरीचं
कसं पाठवन पोरीले
घर ते कास्तकारच
पण दाना नाही जेवाले.

बाजूच्या सायबाच्या घरून
भाकरीचा वास येते सांगाले
पाह्य तुयाच पिकवली जवारी
उपाशी बी तूच सांग तुया देवाले.

आयुष्यभर झटूनही ना
रिटायरमेंट ना पेन्शन त्याले 
उद्या कुठून आणण भाकर
विचारानं डोया नाही डोयाले.

नाही समजणार त्याची 
हि व्यथा हो कोणाले
जिवंतपणीच जमिनीच्या 
भेगा पाहून मरण येते त्याले

✒समृद्धी सावरकर
     अमरावती बळीराजा

राजेंद्रभोसले

बळीराजा #nojotophoto

read more
 बळीराजा

कवी - के. गणेश

बळीराजा..

read more
बळीराजा तसे तुझे जिणे
खालच्या पायरीशी आहे..
पण तुझ्या आसवांचे नाते
आमच्या भाकरीशी आहे..
@kganesh बळीराजा..

Rahul Sontakke

शेतकरी परिश्रमाची भाकर (माझा बळीराजा )

read more
"जय किसान "
माझ्या महाराष्ट्राचा माझ्या देशाचा शेतकरी 
वर्गाचा प्रवास आटवडी बाजार, तेल मीट आणण्यासाटी 
वीस. तीस किलोचे धान्य घेऊन आपला संसार, प्रपंच चालवणारा 
माझा शेतकरी.. अंगात ठिगळ लावलेला सदरा फाटका शिवलेला धोतर, अथवा विजार, डोळ्या भोवती चन्द्र आकार सुरकुत्या पडलेलं विचाराने मग्न झालेला माझा शेतकरी त्याला ना सातवा आयोग, ना आटवडी सुटी, ना सण, पब्लिक हॉलिडे रोजचा दिवस सारखा संप करता येत नाही ना मोर्च्या, काम बंद करता येत नाही आंदोलन कोणाजवळ मांडायची माझ्या शेतकरीची  व्यथा 
रातीची लाईट आटो स्टार्ट मोटार लाहून उसाच्या सरीत एकादी डुलकी घेतो आणि जेव्हा पाणी पायाला लागतो लगेच जागी होहून रातभर दारं धरतो अंधार ना वारं, काटे भय, ऊन, पाऊस कशाचीच पर्वा न करता आपल्या मेहनतीने संकंटांना झुंझ देत असतो, कितीही सगे, सोयरे घरी आल्यावर गोड धोड खऊनच पाठवतो कधीच कर्जाला घाबरत नाही कोणी वापरलेला सदरा दिला तर तो घेणार नाही कारण त्याला एक दिवसाचा शोभनीय दिसायचा नाही त्याला तो सदरा टोचेल... रोजच्या सद्रीचीमातीची कष्टचि सुंगंध येणार नाही आणि शांत झोप लागणार नाही. माझा शेतकरी मनाने खूप श्रीमंत आहे तो जगतो आणि दुसऱ्याला जगवतो. असा माझा महान किसान आहे. 
आपला नोकर वर्गाला सुट्टी नाही की, D.A., नाही की, पेन्शन नाही की, पगार वाड नाही कि,,, अशा अनेक कारणांनी.. आंदोलने, संप मोर्चा चक्का जॅम, रेल रोको, दगड फेक संघटना सरकारी माल मतेची नुकसान सारा बोंबाबोम अशा विचित्र परिस्तितीत माझा शेतकरी कसा जगायचा, व्यापारी चा छळ, मजुराचा छळ नोकर वर्गाचा छळ शासनाचा छळ.... प्रत्येक शासकीय वर्गात लाच कोर कर्म चारी, अधीकारी.. आमच्या हातात पैसा कसा टिकायचं माझा शेतकरी गाव तालुका ज़िल्हा सोडुन कासमीर कन्याकुमारी, उटी मैसूर, सागर नदी, निसर्ग डोंगर पक्षी, तीर्थ.... कधी पाहायला मिळेल कधी दिवस बदलतील कब अच्या दिन आयेंगे... कब कृषी प्रधान, जय किसान देश बनेगा.... 
...........बदल काळाची गरज आहे....... प्रगतीची दिशा आहे.... 

........जय किसान 
.........जय महाराष्ट्र 
..........जय भारत 

                    ...  राहुल सोनटक्के शेतकरी परिश्रमाची  भाकर (माझा बळीराजा )

Chaitali Yengade

गुलाब अर्पितो बळीराजा तुमच्या चरणी
तुम्हीच खरे आदरणीय मालधणी
    साथ तुमची लाभली आम्हा जणू   
      निळ्याशार आकाशी सप्तरंगी इंद्रधनू....
   
      - Chaitali Yengade
         _hrudaysparsh_ #आधारस्तंभ#शेतकऱ्यांची शान#बळीराजा#

somnath gawade

बळीराजा, तु धीर सोडू नकोस!

read more
         बळीराजा तु धीर सोडू नकोस!
अंधारयात्रेचा प्रवासी तु,
चाचपडत का होईना चालत रहा.
दारिद्रयाचा काळोख मिटविण्या,
तेजोमय पहाट लवकरच उजाडेल;
या धीरोदात्त शब्दांनी स्वतः ला सावरत रहा.
          जगाचा पोशिंदा ही बिरुदावली
          मिरविणारा लढवय्या तु.
         असंख्य आस्मानी आणि अनैसर्गिक
         संकटांना विजयी मुद्रेने भिडणारा तु.
         कित्येक आत्म्यांची पोटाची खळगी भरणारा तु.
         असा आत्महत्येचा विचारच कसा करू शकतो?
मान्य, संघर्ष हा तुझ्या पाचवीलाच 
पुजलेला पाहुणा.
परंतु, तु हे ही विसरू नकोस 
तुझ्यात क्षमता आहे ती
संघर्षाला भिडण्याची, असंख्य वादळे पेलण्याची
अन नवोन्मेषीवृत्तीने पुन्हा सावरण्याची.
           तुझ्या जाण्याने एका घराचं
           छप्पर मात्र उडून जाईल.
           जेंच्यासाठी तु मायेची सावली होता;
           त्यांचे भावविश्व भर उन्हात करपून जाईल.
वाईट दिवसांचे हे सावट
आले तसे निघून जाईल.
तुझे दुःख पाहून ढग पुन्हा गहिवरून येतील.
आनंदाचे क्षण पुन्हा अंकुरतील.
फक्त बळीराजा तु धीर सोडू नकोस.
                          -सोमचंद्र बळीराजा, तु धीर सोडू नकोस!

Dileep Bhope

Dileep Bhope

सत्तेसमोर लाचार सत्य
गोष्ट ही नाही चांगली..
गर्दी रोज तिरंगा पेलणारी
कोण जाणे कशी पांगली?

©Dileep Bhope #चारोळी

Dileep Bhope

अनिर्बंध सत्तेला कधी आढावू कोंब
पिकांची मुळेच का खुरटून काढायची?
नवीन करण्याच्या नादात हे बहाद्दर!
आहे ती घरे सुरुंग लावून पाडायची?

©Dileep Bhope #चारोळी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile