Nojoto: Largest Storytelling Platform

New आयुष आयुष Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आयुष आयुष from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आयुष आयुष.

Stories related to आयुष आयुष

शब्दवेडा किशोर

White #आयुष्यात असे अमावस्या....
शब्दवेडा किशोर
लटका हा राग भाव हसु अन् सुख
सदा असे माझ्या तोंडावर सदा
मात्र अंतरी वसे सदा
निखारा अनंत वेदनेचा....
पुनवेचा शितल चंद्र जणू
आहे माइया हृदयात
परि माझ्या आयुष्यात
असे कायम अमावस्या

©शब्दवेडा किशोर #आयुष्य_जगताना

शब्दवेडा किशोर

White #मी कवी नाही....
शब्दवेडा किशोर 
मी छान लिहितो..असं जवळचे म्हणतात...मी भावना व्यक्त करतो पण त्या जो कवीमनाचं असतो किंवा ज्याला खरंच माणसातलं माणूसपण कळतं त्यालाच कविता समजतात पण मीच स्पष्ट करतो..मी कुणीही कवी नाही व हे जे काय लिहितोत्याचं श्रेयही माझं नाही.ती जीवनात येण्याआधीही मी लिहायचो पण मला असं वाटतं की माझ्या लेखणीला खरी धार ती आयुष्यात आल्यानंतर मिळाली.ती आयुष्यात आली अन् नकळत मी कधी अलगदपणे तिच्या सहवासात गुंतत गेलो,गुरफटत गेलो ते मला कळलं देखील नाही अन् स्वतःला शब्दात कसा हरवत गेलो तेही मज उमजलं नाही.
              आधी माझ्या कविता आणि लेख हे फक्त लिखाण होतं असं मला वाटतं पण आता ती जीवनात आली आणि बहुधा माझ्या लेखणीस नवी प्रेरणा मिळत गेली.हल्ली माझ्या कविता म्हणजे जास्त करून तिचा न माझा अदृश्य स्वरूपातला संवाद असतो.ती जवळ नसतानाही तिच्याच धुंदीत जगण्याचा तो एक बहाणा असतो.बहुतेक तीच माझ्या लेखणीतलं शब्दस्वरूप होऊन मला सतत भेटत असते अन् माझ्या मनीच्या भावना कागदावर उतरवत असते.हे शब्दच माझं आता बहुतेक जगण्याचं नवं स्वरूप झालं आहे अन् अजूनही या सगळ्यात मी काही खुप मोठा लेखक किंवा कवी नाही एवढंच तुम्हा सर्वांना सांगणं आहे.

©शब्दवेडा किशोर #आयुष्याच्या_वाटेवर

शब्दवेडा किशोर

Unsplash #हा खेळ नियतीचा 
शब्दवेडा किशोर
परिस्थितीशी घालून मेळ
नियतीचा आहे सदा चालू असतो अजब हा खेळ
संपेल कधी माहीत नाही प्रत्येक जीवाची वेळ
मनात तर कायमच झालेली असते
खूप विचारांची नुसती भेळ......
आलेला दिवस न्यायचा कसाबसा रेटून
एकमेकांशी चांगला सलोखा राखून
कुणास ठाऊक कोण आलं कुठून
भेटेल का कुणी असा जो असेल जगात जिवंत
जीवनातले गूढ मर्म ओळखून......
खेळ हा प्रत्येकाचा असे क्षणभरच्या त्या औट घटकेचा
तुमचा आमचा आपल्या सर्वांचा
नव्हे हा सूर त्या वडाच्या पारंब्याचा
हा खेळ असतो तर केवळ आपल्या नशीबाचा......
खेळात नाही हार अन् जीत
जोडूनिया जगायचे सर्वांशी प्रित
हिच तर आहे या खेळाची खरी रीत
हीच रीत जपूनिया सदा आपण मात्र हसत हसत
दुःखांना लपवत गुणगुणायचे हे जीवनगीत......

©शब्दवेडा किशोर #आयुष्याच्या_वाटेवर

शब्दवेडा किशोर

White #सौभाग्याचं लेणं....
शब्दवेडा किशोर
दोन बोटांच्या चिमटीत 
दोन जीवांचं जगणं
हिरव्या साडीच्या जोडीला असतं
लाल कुंकवाचं लेणं

©शब्दवेडा किशोर #आयुष्याच्या_वाटेवर

शब्दवेडा किशोर

White #देह असावा सरणावरती....
शब्दवेडा किशोर
अशाच एका वळणावरती
आयुष्याने परास्त व्हावे 
देह असावा सरणावरती मन
हिंदोळ्यावर स्वार व्हावे

©शब्दवेडा किशोर #आयुष्याच्या_वाटेवर

शब्दवेडा किशोर

White #हा प्रवास आयुष्याचा....
शब्दवेडा किशोर
उद्या कुठे मुक्काम नाही माहित आता थोडे बोलू काही 
रात्र अजुनी बाकी आहे आता थोडे बोलू काही 
जीवन कठीण गाणे सूर जुळले आहेत आता थोडे बोलू काही 
दूरवर चालायचे तर आता थोडे बोलू काही 
रिमझिम पाऊस येतो आहे म्हणून
आडोशाला जरा थांबून आता थोडे बोलू काही 
गारव्यात शेकोटी पेटली आहे आता थोडे बोलू काही
वळण अजून दूर आहे आता थोडे बोलू काही 
आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटते आता थोडे बोलू काही
वाटते सुख दुःखात आपला कुणी
साथीदार असावा आता थोडे बोलू काही 
जीवनात सांजवेळी असेन मी नसेन मी
म्हणून
आता थोडे बोलू काही..

©शब्दवेडा किशोर #आयुष्यातीलचारक्षण

शब्दवेडा किशोर

White #भावनांचे ओझे....
शब्दवेडा किशोर
मी किती वाहायचे सांग एकट्यानेच सदा तुझ्यासाठी
मी किती झुरायचे
तुजला मोल नव्हते अन् नाही काहीच माझ्या
या तुजवरच्या खुळ्या प्रितीचे 
आर्जवे करून सतत मीच तुला सांग ना कितीदा गं विचारायचे
तू तेव्हा जशी होतीस अन् आजही तशीच आहे 
उमजेल का गं मन माझं या आयुष्यात तुजला
की पुढच्या जन्मी पुन्हा नव्याने आपण भेटायचे ?
ऋणानुबंधनाच्या अनोख्या गाठींना त्या सांग मज तुच आता
किती काळ मी एकट्यानेच सदा सर्वकाळ जपायचे 
कधी वाटतं मज की सोडून द्यावे थोडंफार
हे भावनांचे ओझे मीच एकट्याने किती वाहायचे
की मागचे झाले गेले का विसरून जायचे
मन माझं नित्यनियमे एकट्यात सदा खुप रडतंय
सांग ना कधी तुजला ते कळायचे
सांग ना मज एकदा की हे भावनांचे ओझे संगतीस घेऊन मीच एकट्याने
अजून त्यासोबत वाहून येणाऱ्या आसवांसोबत असे किती जीवन कंठायचे
वाटे कुठेतरी मिळावा किनारा माझ्या या जीवनरूपी नौकेला
तेव्हा मिळालेले शाप आहे मज तोडायचे
की असंच मी एकट्याने एकट्यासाठी एकटं जगून
एकटेपणाच्या या शापातंच आहे का मरायचे

©शब्दवेडा किशोर #आयुष्याच्या_वाटेवर

शब्दवेडा किशोर

White #आयुष्य
शब्दवेडा किशोर
आयुष्य हा असे अलौकीक गोतावळा जणू कैवल्याचा मेळा
विविध नात्यांच्या नाना कळा
कधी समज कधी गैरसमजांचा असलेला हा हिंदोळा
असे कुणी इथं रागीट तर कुणी सांभ तो भोळा
इतरांच्या कुरबुरीवर करतो सदा कुणी कानाडोळा
जपूनी मनी जिव्हाळा जपायचा ध्यास तो लावी सर्वांस लळा
सांभाळूनी घेतो कुणी अनेक वादळा 
भासे जणू तो एक मोठा असा मधमाशीचा पोळा
तर कुणी बेफिकीरीचे जीणे जगून आयुष्यभर ठरतो
जीव असलेला निरर्थक गोळा
कधी सुमनाभोवती पाखरं होती गोळा
कधी नात्यांचा पाचोळा तर कधी बरसे तो बेभान घन निळा
कधी श्रृंगार दिसती सोळा कधी मधुर गितगायन असे गळा
कधी भिडे डोळ्याशी डोळा कधी कुणाच्या कंठी
असे कायम फक्त काळजीच्या माळा
घेई सर्वास सदा सांभाळूनी तो देव माझा पंढरीचा विठू सावळा

©शब्दवेडा किशोर #आयुष्याच्या_वाटेवर

शब्दवेडा किशोर

White माहित नाही मज..
शब्दवेडा किशोर 
माहित नाही मजला काहीच 
की काय माझं उद्याचं स्वरूप असेल 
जिवंत ठेवणारी सारी सुखं लाभतील मला की
माझ्या गळा तो चंदनटिळ्याचा मोतिहार असेल  ||१|| 
शापित या जोकराला नव्या जन्मात तरी सुख मिळेल की 
आहे जुना वारसा त्याच्या ललाटी लिहिलेला
त्याच जुन्या वाटेचा मी नव्याने वारकरी झालेला असेल   ||२||

©शब्दवेडा किशोर #आयुष्याच्या_वाटेवर

शब्दवेडा किशोर

White  सावरले घरटे मी....
शब्दवेडा किशोर 
सावरले घरटे एक एक काडीचे मी सदा अश्रू टिपत
मनीच्या हजारो वेदनेच्या आसवांना हळुवार पुसत
सतत जगलोय मी मनाची एकेक भिंत ढासळताना बघत
जिथं आलोय जन्माला त्यांनीच लाथाडले मजला
अन् मानले ज्यांना आपले जेव्हा ते आपलेच मजला सोडून गेले
रक्ताच्याच नात्याची लोकं सदा घरट्यातून अलगद मजला 
मजपासुनच दूर तकर राहिले
सदा तुटलेले पंख लावुन माझ्या भाळी 
मीच ते विरलेले बंध नात्याचे जोडून होते ठेवले 
मीच नाती जपून ढासळलेल्या घराची 
एक एक वीट रचून सावरले जेव्हा सारे 
तेव्हाच मजला बेसावध असताना मृत्यूने कवटाळले
मग सोडून जग सारे माझे इथेच राहिले
मोहातलेचं होते का दुरावे क्षणभंगूर आयुष्य
क्षणात संपणारे सारे सत्य नात्याचे मजला नाही कधी उमजले....

©शब्दवेडा किशोर #आयुष्याच्या_वाटेवर
loader
Home
Explore
Events
Notification
Profile