Nojoto: Largest Storytelling Platform

New पंढरी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पंढरी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पंढरी.

Related Stories

    PopularLatestVideo

पूनम शशिकला देवीदासराव कुलकर्णी

#prayer #पंढरीचीवारी #मराठी #MarathiKavita #marathi #martahipoem मित्रांनो दरवर्षी लाखो वारकरी चालत पंढरीला जातात..महाराष्ट्राची संस्कृ

read more
ओढ तूला भेटण्याची आहे मनात खोलवर,
काय देऊ तूला विठू मी माझा फाटका पदर..

दिलंस मला तू सोन्यासारख ते रान,
रानात पिकते धन अन फुलते माझ्या कारभाऱ्याच मन...

तू पुरवशी आमच्या दोन लेकरासी घास,
मनात असते नेहमी तूला भेटण्याची आस..

दिस मोजत मोजत येईल सुखाची ती लाट,
तूझ्या भेटीसाठी माझं अख्ख कुटूंब चालत वारीची वाट..

©पूनम शशिकला देवीदासराव कुलकर्णी #prayer 
#पंढरीचीवारी 
#मराठी 
#marathikavita
#marathi 
#martahipoem 
मित्रांनो दरवर्षी लाखो वारकरी चालत पंढरीला जातात..महाराष्ट्राची संस्कृ

Devanand Jadhav

मेघ बरसत आषाढाचा 
नाद घुमतो टाळ मृदंग
मन होई वैष्णव वैष्णव 
अंतरीत वसे पांडुरंग 

सर सर बरसूनी येता 
चिंब चिंब होते अंतरंग 
भिजविले जरी जीव शिव 
तरी कोरडाच तो श्रीरंग 

•देवानंद जाधव• धामणी, पुणे. 
 jdevad@gmail.com 
 9892800137

©Devanand Jadhav #पंढरीची_वारी...

Rajendrakumar Shelke

पंढरीचा राजा #poem

read more
*पंढरीचा राजा*
    *षडाक्षरी काव्य*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
वैकुंठाचा वासी
पंढरीचा *राजा,*
राम कृष्ण हरी
अभंगाची *मजा.*

विठू माऊलीचा
गजर *हरीचा,*
विठुच्या भक्तीत
संसार *सुखाचा.*

स्नान करोनिया
चंद्रभागा *तीरी,*
भक्तिभाव वाहे
कर *कटेवरी.*

पंढरीत होई
वारकरी *दंग,*
सृजनांचा मेळा
पाहतो *श्रीरंग.*
----------------
*✍️राजेंद्रकुमार शेळके.*
-- नारायणगाव, पुणे.

©Rajendrakumar Shelke पंढरीचा राजा

vishnu thore

वारी पंढरीची.....

read more
 वारी पंढरीची.....

Gangadhar

राजा पंढरीचा शुभ सकाळ #मराठीप्रेरक

read more
mute video

Mr Samej Rautray

राजा पंढरीचा लकी ड्रॉ #Quotes

read more
mute video

VISHAL PANDIT

काव्यप्रकार हायकु: पंढरीचे दैवत....✍️✍️

read more
पांडुरंग तो
दैवत पंढरीचे
नाम तयाचे ||१||

दु:ख या ऊरी 
आठवावी पंढरी
विठोबा तारी ||२||

संताची भेट
समाधान अफाट
बा मजलागी ||३||

तारणहार
भक्तांचा साक्षात्कार
 धाव विठोबा ||४||
    
           - विशाल पंडित © काव्यप्रकार हायकु: पंढरीचे दैवत....✍️✍️

Shankar kamble

*पंढरीच्या वाटे।धावे मन वेडे।* 
 *संसाराचे कोडे।सोडवी तू।* 

 *डोळा वाहे नीर।सुटलासे धीर।* 
 *पाहण्या अधीर।सावळ्याला।* 

 *बहु तापलो मी।संसार या तापे।* 
 *जमविली पापे।नानाविध।* 

 *नेत्रांची काहिली।तूच करी शांत।* 
 *आता ना उसंत।क्षणभरी।* 

 *चरणाशी मिठी।देवू अलिंगन।* 
 *हृदयाची खूण।हृदयाला।* 

 *गण गोत्र तोची।भीमा तटी उभा।* 
 *चैतन्याचा गाभा।शोभतसे।* 

 *पामर पतित।कैसा येवू पुढे।* 
 *विषयां सवडे।निरवावे।* 

 *पुण्याची शिदोरी।आज फळा* *आली।* 
 *भेटाभेट झाली।पांडुरंगे।* 

 *मागणें न काही।आता उरे काय।* 
 *समरस साय।दुग्धासवे।*

©Shankar kamble #विठ्ठल #वारी #पंढरीचीवारी #विठू_माऊली #विठ्ठल_रखुमाई

Tejz0560

mute video

पूनम शशिकला देवीदासराव कुलकर्णी

mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile