Find the Latest Status about लपविलास तू हिरवा चाफा लिरिक्स from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लपविलास तू हिरवा चाफा लिरिक्स.
Vishal Chavan
शुभ्र सतेज सुंदर, पंच पाकळी चाफा.. देह जणू स्वर्गीचा, वलयवेष्टीत चाफा... निर्मोही तो मोठा, सुबक आकार चाफा.. सम समान सार्या, निर्विकार तो चाफा... अलगद देठा पासून, पुढ्यात ठिबकतो चाफा.. तिला पुढे पाहुनी, जरा थबकतो चाफा... वेणीत तीच्या जाऊनी, ऐटीत थाटतो चाफा.. कर्तव्य कार्य करण्याला, सदा सज्ज वाटतो चाफा... Vishaal/Aadinaath 10-02-2022 ©Vishal Chavan #चाफा
Durga Deshmukh
तुझ्या जवळ बसणे ते एकटक पहाणे नजरेला नजर भिडता मान झुकुन खाली जाणे मनाची हिरवळ फुललेली ह्दयाला थंडावा देणारी हातात हात धरुन प्रेमाने जवळ घेणारी मनाची प्रसन्नताच हिरवळ विरहात तर सगळे उदास नजरेवर असतो अंधार पोर्णिमेच्या चांदण्याची आस तुझा तो प्रेमळ स्पर्श भावना जपण्याची कला शब्दाने मन जिंकुन आपलस केलस मला दुर्गा देशमुख ©Durga Deshmukh ऋतु हिरवा
Shankar Kamble
तू गेल्यावर राहिले चाफ्याचे बहरणे मालवून गंध जाईचा काजव्यांचे चमकणे..! गोठले दृष्टीत अजूनी शुभ्र पुंजके तारकांचे माळले कुंतलात तेंव्हा स्पर्श ओले मोगऱ्याचे..! थबकलेले क्षण बिलोरी शिंपल्यात सांडले गुंतला श्वासात मारवा रोमरोमी कोंडले..! अवचित अधरी आल्या जुन्याच ओळी पुन्हा? पाठलाग करतो अजूनी जशी सावली उन्हा..! सोबतीला पायखुणा या मजसवे चालती अर्थ सांगू मी कसा?शब्दांवीन जे बोलती..! परतूनी येशी केधवा?आस वेडी जागते सुकली लता केतकी बहर मातीचा मागते..! ©Shankar Kamble #roseday #तू #मी #गेली #चाफा #मोगरा #गंध #मातीचासुगंध #काजवा #गेलीस