Nojoto: Largest Storytelling Platform

New आठवणी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आठवणी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आठवणी.

    PopularLatestVideo

शब्दवेडा किशोर

आठवणी..

फार विचित्र असतात ना ??
आठवणींचं असं वेळीअवेळी येणे..
कधी सुखद अनुभूती देणे
तर कधी 
नकळत आसवे गाळणे..

कधी कधी वाटतं 
आठवणी उगाच येतात छळायला..
तर कधी कधी असंही वाटतं की
आठवणी हव्यात हळुवार पाळायला..

कोणत्याही पाहुणचाराची 
अभिलाषा न बाळगता
किंवा कोणत्याही अपमानाची 
तमा न बाळगता
आठवणी निरंतर येत राहतात
सुख दुःखाचे हिंदोळे 
नित्यनेमे त्या घेत राहतात..

आठवणी नकळत घेऊन जातात
वर्तमानातून भूतकाळात
तसेच भूतकाळातून भविष्यात..
क्षण येतात आणि क्षण जातात
आठवणी मात्र 
निरंतर सावलीसम सोबत असतात..

©शब्दवेडा किशोर #आठवणींच्यापुस्तकातुन 
#आठवणींच्या_साठवणी

Amol Gund

आठवणी आठवणींच्या #poem

read more
आठवणींच्या वाटेवरती जशी पावलं
चालू लागतात
आठवणींचे कोष सारे सभोवताली
जमू लागतात
क्षण एक एक त्यातील जागे होवू
लागतात
बदललेल्या सगळ्यांच्या वाटा
पुन्हा हळुहळु जुळू लागतात
आठवणी पुन्हा माझ्याशी तोच विषय
बोलू लागतात
झाल्याबद्दल आठवणींचा भाग
दिलगिरी व्यक्त करू लागतात आठवणी आठवणींच्या

Vinod Umratkar

कोपऱ्यात मनाच्या माझ्या
तुझी जागा ठेवलीय राखून।
आठवणी प्रेमाच्या तुझ्या
आहे सखे, सुरक्षित साठवून। #आठवणींचापसारा
 #आठवणींची_साठवणं 
#मराठीलेखणी 
#yqtaai 
#yqmarathi 
#mywordsmythoughts  #YourQuoteAndMine
Collaborating with Komal 😊

शब्दवेडा किशोर

अचानक वादळी पाऊस आल्यावर
काही थेंब आठवणींच्या
उंबऱ्यावर थांबले..
मग क्षणभर मी पाहतच राहिलो
अन्
आयुष्यात पहिल्यांदा मला
थेंब व्हावेसे
वाटले..

©शब्दवेडा किशोर #आठवणीतला_पाऊस

Dipak kolaskar

नको फक्त स्वप्नात, ये ना भेटण्यास कधी

काढून ठेवलीत चित्रे,ये ना पाहण्यास कधी

येताना वेळ काढून ये,बोलायचे खुप काही

कवितेत लिहिले तुला,ये ना वाचण्यास कधी.


होते जे दोघांमध्ये,उरले फक्त आठवणी पुरते

आठवणीपुरतेच का होईना,ये ना सांगण्यास कधी

घेऊन ठेवले खुप काही,द्यायचे होते तुला

गुलाब,चाफा अंगणात लावले,ये ना माळण्यास कधी.


बघता बघता कविताच करायला लागलो मी

एवढा असर विरहाचा, वाटलेच नव्हते कधी

खुप काळ गेला गं,पहिलेच नाही तुला

आन ना रे नशीबा,घडवून आमची भेट कधी.

                                                           दिपक कोळसकर

©Dipak kolaskar #आठवणीच्यापुस्तकातुन

शब्दवेडा किशोर

तुझी आठवण मला परत त्या शालेय जीवनात घेऊन जाते
अन् नव्यानं जुन्या प्रेमाची आठवण करून देते
तुझी आठवण मजला सखे जगण्याची नवी उर्मी देते
ते आपलं एकमेकांकडे चोरून बघणं
अन् अनाहुतपणे काही क्षण मग सारं काही
विसरून एक वेगळंच आयुष्य जगणं
आज ते आठवताना माझ्या डोळा अलगद् पाणी येते
अन् तुझी आठवण मजला सखे जगण्याची नवी उर्मी देते
कधी कधी वाटतं पूर्णपणे तुझ्यातंच सामावून जावं
अन् फक्त तुझ्यात रमुन जावं
सारी काही आठवलं की डोळ्यासमोर ते क्षण तीच
जुनी कहाणी नव्यानं उभी करून जाते
अन् तुझी आठवण मजला सखे जगण्याची नवी उर्मी देते
खरं प्रेम अन् खोटं आयुष्य यातील बॕलेंस मज कधी जमलाच नाही
असाच अचानक जाताना फक्त नावाला तुझ्यापासून दूर गेलो खरा
पण तद्नंतर माझं मन कशातंच रमले नाही 
आज मजला परत नव्याने प्रेमात पडायचं आहे फक्त
तुझ्यासाठी बेभान होऊनी पुन्हा जगायचं आहे
तुझ्या आठवणी कायमच हृदयात ठेवायच्या आहेत
तुझ्या हृदयीच्या गुजगोष्टी माझ्या हृदयी जपायच्या आहेत 
अन्
म्हणूनच तर सांगतो सखये एकदा मजसाठी जरा चार पावलं मागे ये
मनभरून तुजला डोळ्यात जपायचं भाग्य पुन्हा मज लाभु दे
तु नसताना तुझ्या आठवणींना घेऊन सोबती पुढं जायची हिंमत मज नियती देते
अन् खरं सांगतो ऐक पुन्हा
तुझी आठवण मजला सखे जगण्याची नवी उर्मी देते 
जगण्याची नवी उर्मी देते

©शब्दवेडा किशोर #आठवणींचा_पाऊस

Pravin P. Gaikwad

mute video

ChetaN Gangurde

तिच्या आठवणी जेव्हा दाटून येतात,
तेव्हा आसवांचा पूर ओसंडून वाहतो...

नजरेच्या किनाऱ्यामधून अलगद दोन थेंब ओझरतात,
आणि त्या पावसात मी चिंब भिजून जातो... #आठवणींचा_पाऊस

Dipak kolaskar

तिचा आलेला राग तिच्यावर कधी काढलाच नाही
तिच्यासाठी झुरणारं मन तिला कधीच कळलं नाही

बोलत होती,भांडत होती तस नातं आमचं जवळचंच
सारं काही कळायचं तिला,तिला फक्त मीच कळलो नाही.

नेहमी म्हणायची सांग तुझ्या मनात कोण आहे
ही आवडते,का ती आवडते तुझं प्रेम कोण आहे

मी सांगत नाही म्हणुन ती रुसायची माझ्यावर
आता कस सांगू तिला माझं तिच्यावरच प्रेम आहे.

आयुष्यात ती माझ्या खरचं वेगळी होती
प्रेमाचं जाऊद्या,तिची सोबती छान होती

एक मैत्रीण म्हणुन ती जपायची नात्याला
तिच्या मनातले सारे काही मला सांगत होती.

तिच्यावर असणार प्रेम तिला दाखवताचं आलं नाही
त्या वेडीवर मला साधं रुसताही आलं नाही

आली एक वेळ अशी आम्ही सारेच दुरावलो
आठवण येईल तुझी मला,तिला हेही म्हणलोच नाही.

                                                    दिपक कोळसकर

©Dipak kolaskar #आठवणीच्यापुस्तकातून

शब्दवेडा किशोर

पाऊलखुणा..

आठवणींच्या पाऊलखुणा
उजळून दिसतात जिथे  
खेळलो..बागडलो..रमलो
स्मरण होते जाताना तिथे..
स्मृतींच्या पाऊलखुणा
जात नाहीत विस्मृतीत 
सुवर्ण असतात त्या
तरळत येतात त्या कृतीत..
सर्वांनाच पडते भुरळ
त्या सोनेरी पाऊलखुणांची  
दिसता येता कमी जाणवते
हृदयातील त्या आठवणींची..
अशा असतात पाऊलखुणा
वळते पुन्हा तेथे नजर  
आठवण काढताच त्यांची
क्षणात होतात पुन्हा हजर..

©शब्दवेडा किशोर #आठवणींच्या_साठवणी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile