Nojoto: Largest Storytelling Platform

New मैत्री मराठी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मैत्री मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मैत्री मराठी.

    LatestPopularVideo

Sharmila'S Diary

मैत्री आपली अशी की
मनातलं सांगितल्याशिवाय राहवत नाही
मैत्री आपली अशी की
कधी अल्लड मस्ती तर
कधी रुसवे-फुगवे 
मैत्री आपली अशी की
अश्रु पुसून लढण्याचं बळ देणारी
मैत्री आपली अशी की
अवगुणांकडे हक्काने बोट दाखवणारी
मैत्री आपली अशी की
आदराने आपल्या चुका कबूल करणारी
मैत्री आपली अशी की
निराशेत पण चेहऱ्यावर हसू फुलवणारी
मैत्री आपली अशी की
विश्वासाने विश्वास संपादन करुन
मैत्रीच्या नात्याला एकरुप करणारी
मैत्री आपली अशी की
जगण्याची वेगळी दिशा दाखवणारी
मैत्री आपली अशी की
आयुष्याच्या शेवटपर्यंत बांधून ठेवणारी

#uwots #Friendship #मैत्री #मराठीकविता #marathipoetry #friendshippoetry #uwots #sharmilasdiary #nojotomarathi #nojotopoetry

suresh pawar

गोरक्ष अशोक उंबरकर

मैत्री #मराठीकविता

read more

Dileep Bhope

vaishali

मैत्री #

read more
मैत्री म्हणजे , रक्ताच्या नात्यापेक्षा गोड  
मैत्री म्हणजे , आपुलकीची ओढ  !!
मैत्री म्हणजे , दोन जीव एक श्वास 
मैत्री म्हणजे , प्रेम आणि विश्वास  !!
मैत्री म्हणजे , चार तोंड एक घास 
मैत्री म्हणजे , मज्जा मस्तीचा तास !!
मैत्री म्हणजे , मायेची साठवण 
मैत्री म्हणजे , प्रेमळ आठवण   !! 
मैत्री म्हणजे , निर्मल आरसा 
मैत्री म्हणजे , आपल्या विचारांचा ठसा  !!
मैत्री म्हणजे , एक आस एक ध्यास 
मैत्री म्हणजे , सुखद सहवास   !! 
मैत्री म्हणजे , जगण्यातील खरा आनंद 
मैत्री म्हणजे , जगण्यातील खरा आनंद  !!

🌹 जागतिक मैत्री दिनाच्या सर्व 🌹
🌹 मित्र मैत्रिणींना हार्दिक शुभेच्छा 🌹 मैत्री #

somnath gawade

धर्म-जात-वर्णाची  भक्कम 
भिंत ओलांडून जाणारं जगातलं
पहिलं नातं म्हणजे 'मैत्री' #मैत्री

somnath gawade

 मैत्रीमध्ये रक्ताच्या नात्यांनाही मागे
सोडतील असे उदार ममत्व असते.
वेगवेगळ्या आईंच्या उदरातून
जन्म घेऊन सुद्धा निरपेक्ष बंधुत्व असते.
 #मैत्री

Rajendrakumar Shelke

मैत्री #Quotes

read more
मैत्री म्हणजे
प्रेमाचा धागा,
मनात असे
सुखाची जागा

मैत्री म्हणजे
एक विश्वास,
नात्या मधील
प्रेमळ श्वास.

मैत्री म्हणजे
एक आधार,
जिथे सांगतो
मनाचा भार.

मैत्रीत असे
निर्मळ भाव,
व्यक्त करतो
तो प्रेमभाव.

मैत्री दिनाच्या
देतो शुभेच्छा,
पूर्ण होवोत
साऱ्या आकांक्षा.
--------------
✍️ राजेंद्रकुमार शेळके.
 -- नारायणगाव, पुणे.

©Rajendrakumar Shelke मैत्री

Dr. BHAGYASHRI

मैत्री

read more
मैत्री..... मैत्री

आशिष गंगाधरजी चोले

मैत्री

read more
दु:ख अडवायेला ,उंबरासारखा!
मित्र ! वणव्यामधे  गारव्यासारखा!
वाट चुकणार नाही जीवनभर 
तुझी, 
एक तू मित्र कर, आरश्यासारखा !
आत्महत्याच करनार नाही कुणी
मित्र असला जवळ जर माणसासारखा!!
त्रासलो जिंदगी वाचताना पुन्हा!
बस धडा "मैतरी" वाचण्यासारखा!!
मैतरी चाटते गाय होवुन 
 जा बिलग तू त्याला वासरासारखा!!
नैराश्येत देईल मैतरी उब
जाऊन शीर घरट्यात पिल्यासारखा मैत्री
loader
Home
Explore
Events
Notification
Profile