Find the Latest Status about महिला दिन मराठी कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, महिला दिन मराठी कविता.
Siddhesh mestry
तू तिथे मी इथे दिवसातून खूप आठवण तुझी येत आहे....♥️ तुझ्या आठणीत रमताना खूप मस्त वाटत कारण तुझे आणि माझे आयुष्यभराचे नाते जुळले आहे .....♥️ - तुझाच सिद्धू मराठी कविता #मराठी #कविता #मराठीकविता #peace
Harsh
प्रचंड तुझी शक्ती, प्रचंड तुझी भक्ती. राहा एक पाऊल पुढे, नाही कुणाची सक्ती. प्रत्येकजण करेल तेव्हा नारी जन्माचा सन्मान, जगामध्ये नारी तुझा जन्म ठरेल महान. Harsh #महिला दिन
अमोल पाटील
मी माझ्याच मुलखात नांदतो ऐश्वर्याचा राजा , इथे फुलवल्या ऐश्वर्याच्या बागा इथले रानोमाळ सगणगंन पसरत हिरवी द्वाही आणि "मी" पण म्हणत कितीक बुडाले इथल्याच जमिनीत ही #मराठी कविता #मराठी साहित्य #वाचन #मराठी संस्कृती #मराठी कवी #मी मराठी #कविता #पल्लवी
Jayu
तृ लाजतेस तेंव्हा फसण्यास अर्थ येतो तृ बांधतेस राखी लढण्यास अर्थ येतो भांडण उगाच करतो दररोज मी सखीशी समजूत काढते ती रुसण्यास अर्थ येतो जेंव्हा मला हरवते मुलगी खुशाल हसते ती जिंकते म्हणून तर हरण्यास अर्थ येतो मरणास झुंज देउन जन्मास घालते ती आई मुळेच अपुल्या 'असण्यास' अर्थ येतो नारी तुझ्यामुळे हे अस्तित्व शून्य माझे आहेस तू म्हणून तर जगण्यास अर्थ येतो #अब्दुल लतीफ माझ्या बेरंग आयुष्याला सौंदर्याचे विविध रंग देणाय्रा प्रत्येक महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा #महिला #कविता
सौ.अलका माईणकर
आयुष्य कस असाव तर उगवत्या सुर्यासारख असाव.जस सुर्याला अभिवादन करण्यासाठी अंगणात रांगोळ्या घातलेल्या असतात.उषेच दार उघडलेल असत.गोठ्यामधे धेनू आपल्या पाडसाला भेटण्यासाठी हंबरत असते.सुगंधीत वारा हा सर्व वृक्षवेलींना स्पर्श करत जाग करत असतो.दवबिंदू हे वेलीवर मोत्याप्रमाणे सजलेले असतात. भाट बनून विहंग कुंजारव करतात.आयुष्याची सकाळ ही अशी नवचैतन्याने भरलेली असावी.ना राग ना लोभ.सगळ कस सुंदर,सात्विक, निष्पाप आणि मुख्य म्हणजे आपल आचरण,आपल मन हे शुध्द असाव..अगदी निरागस बालकासारख..... #मराठी कविता
अमोल राजेंद्र उबाळे
हौस आहे ना तुला मोकळं राहण्याची मला ही आनंद होईल तुला स्वतंत्र पाहण्याची पण जेव्हा ह्या आकाशात तू मनसोक्त उडण्यासाठी पंख पांघरशील तेव्हा लोक तुझ्या कडे वाईट नजरेने पाहतील ✍️ अमोल उबाळे मराठी कविता
अमोल राजेंद्र उबाळे
ओल्या कागदा सारख केलंस ग माझं आयुष्य धड काही लिहिता ही येईना आणि जाळता ही येईना ✍️ अमोल उबाळे मराठी कविता