Find the Latest Status about अस्तित्वाची लढाई from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अस्तित्वाची लढाई.
yogesh atmaram ambawale
पुढे जाण्यास नेहमीच कुणाची तरी साथ लागते, त्या साथीच्या जोरावरच यश सोबत राहते. नाही म्हटलं तरी प्रत्येकाचेच अस्तित्व असते, पण आपल्याला स्वतः शिवाय इतर कुणाचेच अस्तित्व दिसत नसते. अस्तित्वाची लढाई प्रत्येक जण लढत असतो, माझे ही खूप महत्व आहे,दाखविण्याचा प्रयत्न असतो. अस्तित्व जाणावे स्वतःच्या कार्याचे इतरांच्या सहकार्याचे, मी म्हणजेच सर्वकाही असे न मानता इतरांचे ही अस्तित्व जाणावे. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे अस्तित्वाची लढाई... #अस्तित्वाचीलढाई हा विषय Amar Bhilare यांचा आहे. चला तर मग लिहूया.
सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे अस्तित्वाची लढाई... #अस्तित्वाचीलढाई हा विषय Amar Bhilare यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreAjay Dilip Ghanekar
एखाद्याचे विचार सर्वांनाच पटतील असं नाही, काहींना ते सहज अवगत होतात कळतात तर काहींना भरडून भरडून सांगावे लागतात. पचतात मात्र मोजक्यांनाच...! कवी मनाचा मी 🌿 ©अजय घाणेकर ✒️ विचारांची लढाई 🌿
विचारांची लढाई 🌿 #मराठीविचार
read morepournima sadavarte
लेक परकी नसते... लेक सुखाची परिभाषा असते....।। लेक मायेची साऊली असतें... लेक घराची शान असतें... लेक असते अपेक्षांची खाण..।। लेक समुद्रासारखी असते मन मोठे करूनच जगते....।। लेक कधीच आपल्या बापावर ओझे नसते.... लेक-आई बापाच्या कष्टाची जाण राखते...।। लेक फक्त पणती असली तरी, दोन घरातील अंधार दुर करते.....।। "लेक"-छोट्या छोट्या अपेक्षा का मारते? लेक ही अगोदर एक स्त्री पण असते.....। लेक अस्तित्वाची जाणीव राखते.... *"लेक"-कधीच परकी नसते....।। लेक परिवाराची जोड राखते... लेक आपुलकीची माया असते.... पण खरच ना -लेक ही मंदिराचा उंच कळस असते....।।" ©pournima sadavarte #लेक*(जाणीव अस्तित्वाची)* कविता
#लेक*(जाणीव अस्तित्वाची)* कविता
read moreSMITA DUMBRE
ती अशीच आयुष्यभर स्वप्नांच्या दुनियेत रमणारी..... तरीही वास्तवाशी दोन हात करणारी..... ©SMITA DUMBRE #ती आणि तिची लढाई..... #Smile
Kailas Gavali
आज #संत_तुकाराम_महाराज असते तर कदाचित याच शब्दांनी आपल्याला जागे केले असते.......असाच माझा छोटासा प्रयत्न..... जगी हाहाकार नको तो विकार। जाणावे ते सार निश्चय धरा।।१।। करुनि उपाय नको तो अपाय। वाया न जाय हित ते करा।।२।। रोगाचा प्रकोप रहा निकोप। होईल ते लोप निश्चय धरा।।३।। रोग होई नष्ट टळेल ते आरिष्ठ। आहे हे स्पष्ट बंधू माझ्या।।४।। आता तरी जाग शहाण्यापरी वाग । आपला तो सहभाग राष्ट्रहिता।।५।। प्रधानाची हाक मनात तो धाक। नम्रपणे वाक थोडातरी।।६।। जाणारे रीत राष्ट्राचे ते हित। कैलास धरी प्रीत सकळांशी।।७।। आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया जरूर कळवा. - कैलास गवळी. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 अभंगवाणी - कोरोना विरुद्ध लढाई #gokorona
अभंगवाणी - कोरोना विरुद्ध लढाई #gokorona #Life_experience #संत_तुकाराम_महाराज
read moreNeha Shejwal
खुद्के दिलसे लढना आसान है, जिसे दिल दिया है उस्से कैसे जीत पाओगे✍🍁 #दिल की लढाई✍🍁
#दिल की लढाई✍🍁
read moreShankar Kamble
आवेशाच्या ललकारीने काताळाला कंप सुटावा युगा–युगांच्या हुंदक्यातला विटाळ आता तरी फिटावा... साथ–सोबत नको कुणाची नकोच उसने बळ आता पिचलेल्या मनगटांत फिरुनी बंड पेरूया जाता जाता... क्षणा–क्षणाला उसळत राही तप्त लाव्हां छातीमधला पुन्हा चेतवू जुने निखारे रात्र काजळी तुम्हीच बदला... शिंग तुतारी नौबत झडली नाद टापे गगनी भरली लख्ख तळपत्या समशेरींना चेव, विरश्री अंगी स्फुरली... तृणापरी पायात चिरडू यश किर्तीची शिखरे घडवू मळभ सारुनी लाचारीचे स्वाभिमाने कोंदण जडवू... ©Shankar Kamble #Grayscale #लढा #युद्ध #अस्तित्व #लढाई #माणूस #संघर्ष #तलवार #टक्कर
#Grayscale #लढा #युद्ध #अस्तित्व #लढाई #माणूस #संघर्ष #तलवार #टक्कर #मराठीविचार
read more