Nojoto: Largest Storytelling Platform

Best लढा Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best लढा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about आतंगवादी की लढाई, लढाई शायरी, लढाई समानार्थी शब्द मराठी, लढा समानार्थी शब्द मराठी, लढाई समानार्थी शब्द,

  • 6 Followers
  • 12 Stories
    PopularLatestVideo

Shankar Kamble

मीच माझ्या वांझ मनाशी एक करार केला आहे
श्वासापुरते जगणे केवळ लयास माणूस गेला आहे...

नकोच उसन्या सुखदुःखाची रंगीत झालर चमचमणारी
श्रावण सरता वैशाखाची दाह,होरपळ धूसमुसणारी...

रोज पाहतो त्याच राऊळी तीच प्रभावळ तो वनमाळी
लोभ, वासना दंभपणाची भणंग घेऊन फिरतो झोळी...

कांगोऱ्यांनी सजले –नटले खुले अंगण निळ्या नभाचे
बिंब उमटता रक्त वर्णी ते कोश लोपले गर्द ढगाचे...

उगाच वाटे डोळ्यामधला पाझर आता आटून गेला
किती पेरले कोंब तरीही तळ मनाचा सुकून गेला...

एकच जीवन एकच जगणे एक धून पण कैक तराने
रंगमंच हा युगा युगांचा पडदा पडता येणे– जाणे...

©Shankar Kamble #माणूस #माणूसम्हणूनजगताना #जीवन #लढा #जगणं #अस्तित्व #प्रेम #चिंतन

Shankar Kamble

आवेशाच्या ललकारीने काताळाला कंप सुटावा
युगा–युगांच्या हुंदक्यातला विटाळ आता तरी फिटावा...

साथ–सोबत नको कुणाची नकोच उसने बळ आता
पिचलेल्या मनगटांत फिरुनी बंड पेरूया जाता जाता...

क्षणा–क्षणाला उसळत राही तप्त लाव्हां छातीमधला
पुन्हा चेतवू जुने निखारे रात्र काजळी तुम्हीच बदला...

शिंग तुतारी नौबत झडली नाद टापे गगनी भरली
लख्ख तळपत्या समशेरींना चेव, विरश्री अंगी स्फुरली...

तृणापरी पायात चिरडू यश किर्तीची शिखरे घडवू
मळभ सारुनी लाचारीचे स्वाभिमाने कोंदण जडवू...

©Shankar Kamble #Grayscale #लढा #युद्ध #अस्तित्व #लढाई #माणूस #संघर्ष #तलवार #टक्कर

Shankar Kamble

गझल...

जाणत्या नेणत्या पणाचे हिशोब सारे राहून गेले
बंद मुठीतून ओघळणारे क्षण अत्तरी वाहून गेले

गुदमरलेल्या श्वासांनाही उसने थोडे श्वास मिळाले
डोकावून मग झरोक्यातूनी उनं बोचरे पाहून गेले

जगण्यासाठी धडपड करते धडावेगळे शीर अजूनी
नाळ गुंतली पाझर ओला किती उन्हाळे नाहून गेले

गर्द हिरवी झुकलेली नाजूक डहाळी आंब्याची
नवलाईचा मोहर गळता रूपं दर्पणी दावून गेले

रुळलेली ती वाट आजही रोज चालतो निगुतीने
शोध नव्या वाटांचा घेता वाटं पुरती लावून गेले

शांतीचा मी पाईक आहे साक्ष देतो वधस्तंभ हा
खबरदार जर खरे बोलशील जल्लाद सारे धावून गेले

कशांस नुसती उठाठेव ही? सूर्य अस्तास कधीच गेला
एक खुळी पण आस पेरली गीत पहाटे गावून गेले

©Shankar Kamble #MerryChristmas #गझल #मराठीप्रेम #जीवन #सुख #झुंज #लढा #कोणी #सत्य

Shankar Kamble

जरासे....
क्षणभंगुर हे श्वास लाभले शाश्वत जगणे करू जरासे
आडोशाला पळभर थांबून निसटले ते स्मरू जरासे..

अभेद्य आणि भरभक्कम कर तटबंदी तू पुन्हा मनाची
घात घालूनी टपले वादळ पिसाट होवून भरू जरासे..

कोळून प्यालो आज हलाहल घोट रिचवले तसेच ओठी
चिरडलेल्या तृण पात्याचे भाले करुनी मरू जरासे..

सैरावैरा धावत सुटले निमिष एक ना कुठे थांबले
अकलेच्या या व्यर्थ वल्गना घासून ठिणगी पुरू जरासे..

शिडावीना ही नाव भरकटे खेळ हवाली तुझ्याच लाटे
पोहीन म्हणतो पाठ प्रवाही बुडलो,तरलो उरु जरासे..

खूप मागणे खूप सांगणे टिचभर झोळी गगन झाकणे
एक आरोळी रान पेटवू निशाण रोवून ठरू जरासे..

©Shankar Kamble #titliyan #श्र्वास #जीवन #जीवनअनुभव #लढा #युद्ध#संग्राम #जीवनगाणे #लढायचं

kaya sharma

#थक #लढा #दंगा #Ka Adi_indian_boy: Rakesh Srivastava Ayaan dehlvi ( A D ) Dbravikumara Vishal Agrahari #लव

read more
mute video

Shankar Kamble

हुंदक्यात आयुष्याचे गाणे सजले होते
सर नव्हती पावसाची आभाळ भिजले होते..

भणंग जिंदगीची वणवण कशास सोसू?
खंजीर खुपसले पाठी कट मागे शिजले होते..

खोल गेले पोट त्यांचे, त्यांचा झालासे नगारा
ते शांत साखर झोपी कुणी तसेच निजले होते..

फुंकतेस कशाला?चुल आहे पेटलेली
नजरेत भूक जळते अंगार विझले होते..

शाप दे वा वर दे सोय तुझी तू पाहून
तुजं कैद मंदिरी केले मी मनांत पुजले होते..

गाढलेला उकरून पुन्हां देह बाहेर काढला
सापडेना माणूस कुठे माणूसपण कुजले होते..

डोके गहाण ठेवून विकतो मलाच आता
बोली लावण्यास कैक दलाल जमले होते..

फोडून खापर माझ्यावर जो तो धन्य होतो
मूढ मती मी उशीरा गमते काय चुकले होते..

©Shankar Kamble #Light #जिंदगी #जीवन #जीवनअनुभव #जगणे #माणूस #लढा #माणूसम्हणूनजगताना #फासा #गूढ

Shankar Kamble

खुशाल त्यांनी वार करावे
झेलाया मी आहे तत्पर
आभाळाची तमा कशाला
पंखच माझे देती उत्तर..

अस्तित्वाची तुझी लढाई
जुनाच कित्ता युगायुगांचा
काळ्या खडकांच्या छातीवर
विजय पताका अंकुराचा..

आव्हानांना कोळून प्यालो
फेकून अस्तर जुने पुराणे
कोश विणले लख्ख प्रकाशी
नको आळवू सांज तराणे..

धुळीत माखून गेल्या वाटा
जायबंदी पाय कधीचे
उरांत धडकी भरते तेंव्हा
काठ सोडते पाट नदीचे..

श्वास मोजूनी दिले आजवर
उसने होते हसणे– रडणे
दोर नाचवी जसा बाहुली
जगणे केवळ केविलवाणे..

वाटा माझ्या जरी रोखल्या
झेप कोण रोखणार आहे?
मला खुणावे क्षितिज मोकळे
डोह मनाचे भरून वाहे..

©Shankar Kamble #cloud  #पंख #आभाळ #भरारी #संघर्ष #संघर्षाची_तयारी_करा #लढा #टक्कर

Shankar kamble

*आवेशाची ललकारी* 
 *विरून गेली सांग कुठे?* 
 *अंगाराची धग ही निवली* 
 *मशाल विझली सांग कुठे?* 

 *अन्यायाच्या दारी याचक* 
 *न्याय बिचारा तिष्ठतसें* 
 *बटीक होवून करी चाकरी* 
 *दाद मागू सांग कुठे?* 

 *न्याय, धर्म अन नीतीचे* 
 *वस्त्रहरण हे इथे रोजचे* 
 *लाज झाकण्या धर्माची* 
 *कृष्ण राहिला सांग कुठे?* 

 *सैल झाली वज्रमूठ अन* 
 *बोथट झाला म्यान भाला* 
 *स्वाभिमाना कलम गर्दनी* 
 *धार लोपली सांग कुठे?* 

 *जाती-पाती मधे अडकला* 
 *रंगा-झेंड्यामध्ये विखुरला* 
 *जात मानव एक विसरला* 
 *कोण चुकला?सांग कुठे?* 

 *सळसळणारा धमन्यांमधला* 
 *तप्त शीलारस गोठून गेला* 
 *बधीर त्या जाणीवा, वेदना* 
 *मूक झाल्या सांग कुठे?*

©Shankar kamble #न्याय #अन्याय #लढा #झुंज #विद्रोही #लढायचं 

#Dark

Shankar kamble

शोषितांचा, उपेक्षितांचा हुंकार दबल्या वेदनांचा
लेखणीने घडविली क्रांती सम्राट शोभे साहित्याचा

घाव घातला अन्यायांवर थाप देवूनी अशी डफावर
रान पेटले असे चेतले अंगार पेरले मनां-मनांवर

उभारिला लढा चळवळीचा हक्क मागण्या श्रमिकांचा
दुवा संयुक्त महाराष्ट्राचा मोडीला कणा प्रस्थापितांचा

साहित्यातील चमकता हिरा तुम्ही प्रसवला तो फकिरा
इतिहासाच्या पानोपानी अजरामर झाला वीर खरा

बा भीमाच्या वारसदारा  जग बदलण्या सज्ज हो
क्रांतीची हाती मशाल घे शांती, समतेचा पाईक  हो

©Shankar kamble #विद्रोह 
#लढा 
#जयंती 
#अण्णाभाऊ साठे


#AWritersStory

Gopichand Santoshkumar Sarwade

लढा.. 
आम्ही शांती सुखाने जगतो, 
तुम्ही का आम्हावर जळता? 
तुम्ही मागुन वार करुन पळता रे 
मागुन वार करुन पळता..!

                      आम्ही पेशवाई संपवुन विजयी, 
                          तेव्हापासुन आताही तुम्ही हारता..
                       कोरेगावात मागुन वार करता रे 
              तुम्ही मागुन वार करता..!

आम्हा एकट्यावर तुमचा झुंड, 
ना व्रुत्तपत्रात अन्यायी वारता..
तुम्ही नामर्द स्त्रियांना मारता रे 
आम्हाला लपुन दगड मारता..! 
    
                          विराज -अरविंद प्रकरणा नंतर,
                       राजग्रूहाची विटंबना करता..
                          तुमची लपुन मारायची परंपरा 
                         तुम्ही समोर यायला डरता..!

तुम्ही नाव घेता भलत्याच 
  सोयी  भिमाच नाव उदगरता..
               भिमानं दिलेल्या तुकड्यावर जगता रे.. 
         तुम्ही स्वत:चं नाव सांगाय घाबरता.. 

                  या आमच्याकडे लढा शिकायला.. 
                   भिडण्याचा Course लावण्यात येईल..
              अजुनही वेळ आहे सुधरा नाहीतर.. 
             तुम्हाला HORSE लावण्यात येईल...!
  
                                     -गोपीचंद संतोषकुमार सरवदे #RAJGRUH
#jaybhim #लढा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile