Nojoto: Largest Storytelling Platform

New श्रीक्षेत्र पंढरपूर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about श्रीक्षेत्र पंढरपूर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, श्रीक्षेत्र पंढरपूर.

    PopularLatestVideo

vs Sawant

🌺🙏विठ्ठल माऊली दर्शन पंढरपूर 🙏🌺 #मराठीकविता

read more
mute video

Pankaj

#श्रीक्षेत्र #पुरी पथिक Ritu Tyagi शीतल चौधरी(मेरे शब्द संकलन ) Anshu Choudhary sonal Sharma #Mythology

read more
mute video

Dr.Rajendra Parijat

श्रीक्षेत्र पावस 18-13 #Quote

read more
mute video

अदनासा-

विडियो सौजन्य आणि हार्दिक आभार 💐🌹🙏😊🇮🇳🇮🇳https://www.instagram.com/reel/CewZ-0VteHw/?igsh=MXF4NmZoMGtqanVieA== #विठ्ठल #मराठी #भक्तिगीत लयभार #Instagram #Facebook #माऊली #महाराष्ट्र #पंढरपूर #अदनासा #लयभारी

read more
mute video

Ramdas Narwade

भंक्तांची आषाढी 

कोरोना मुळे बंद आहे पांडुरंगाची वारी 
टाळ मुर्दांगात दुमदुमत नाही ती पंढरी 
कमी असेल हर्षउल्हासित सहकीर्तनाची 
विठू नामस्मरणाची लाखो मधुर वाणी 
हरीभक्त पारायण वैष्णवांची गोड गाणी 

विठूनामाचा गजर करणारे वारकरी 
माय बाप विठ्ठल चित्ती ध्यानी मनी 
घरीच मनोभावे साजरी करे भक्तांची आषाढी 
भक्तीच्या जोरावर पंढरीनाथा साद घाली 
विटेवरचे पाऊल उचलून भक्त दर्शना येती माऊली  
दर्शन भक्ता देउनी धन्य करी महा एकादशी 

माय विठ्ठल...बाप विठ्ठल.. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏

®रामदास नरवाडे #आषाढी #एकादशी #विठ्ठल #पंढरपूर #वारी 
#corona #lockdown

Shankar Kamble

पंढरीच्या वाटे!भार वैष्णवांचा!
 सोहळा सुखाचा! अनुपम!* 

 माया मोह बंध! उतरले पार!* 
 तरला सागर !जड जीवा!* 

 देहाची ना शुद्ध! चित्त गुंतलेले!* 
 नामात दंगले !रामकृष्ण!* 

 *मुखी घेता नाम !शीण हा सरला!
 भरून उरला! देहांघटी!* 

 सवे चालवितो !भार तो वाहतो!* 
 नेत्रां दाववितो! पाप पुण्य!* 

 ओढ अंतरीची !अंतराला ठावी!* 
 गळाभेट व्हावी !मनीं आस!* 

 *पायी लोटांगण !आसवे प्रक्षाळी!
 चरणे सावळी !विठुराया!* 

 कंठ सद्गगदित !भाव ही खुंटले!* 
 विकार लोपले! दर्शनाते!*

©Shankar Kamble #वारी #विठ्ठल_रखुमाई #विठ्ठल_विठ्ठल #वारी #वारी_आयुष्याची #दिंडी #पंढरपूर #विठ्ठल

Shankar Kamble

*संत सज्जनांचा भार* 
 *वैष्णवांची मांदिआळी* 
 *वाळवंटी भीमा तीरी* 
 *नाद मृदंग चीपळी!!१!!* 

 *विरक्तीचा भाळी टिळा* 
 *करी वैराग्य पताका* 
 *षडरिपुंचा काकडा* 
 *होय तूच ज्ञाना, तुका!!२!!* 

 *मुखी यज्ञ नाम घोष* 
 *फिटे संसार पारणे* 
 *नेत्रं तृप्त सुखावती* 
 *रूप सावळे देखणे!!३!!* 

 *घेतां चरणांशी मिठी* 
 *बंध प्रारब्ध तुटले* 
 *गळागळी भेट झाली* 
 *माझे "मी"पण सुटले!!४!!* 

 *दीन पतीत दुबळा* 
 *आतां एकची मागणे* 
 *पुन्हा नको जन्म फेरा* 
 *विठू हेची रे सांगणे!!५!!*

©Shankar Kamble #वारी #विठ्ठल #विठ्ठल_रखुमाई #वारी_आयुष्याची #वारी_जांऊ #पंढरपूर #कृष्ण 

#NojotoRamleela

Shankar kamble

आसावला जीव।ओसंडला भाव।
अंतरीचा ठाव।सावळ्या तू।।१।।

कातर मनाला।आठवं क्षणाला।
काकडा ओवला।देहरूपी।।२।।

मनं ओढावते।दर्शनांते आस।
जीवां रात्रंदिस।ध्यास तूझा।।३।।

तोडीयले बंध।पाश मायारुपी।
अंतरी स्वरूपी।तूच सदा।।४।।

काय करू सांग।चित्त उसवले।
पाहतो वाटुले।पंढरीची।।५।।

अंतरी उमाळा।तोची घननीळा।
सांगू लडिवाळा।गूज मनीं।।६।।

नाद प्रसवला।परब्रह्म देहीं।
मनाचियां डोही।नाद रंगे।।७।।

देहादेही एक।भाव समरूप।
पापांचे कळप।सुटती बां।।८।।

मागणें न दुजें।आतां उरे काही।
मनीं वसे ठायी।पांडुरंगे।।९।।

श्री. शंकर नागनाथ कांबळे

©Shankar kamble #वारी 
#विठ्ठल 
#पंढरपूर 
#माऊली 
#वारी_जांऊ 
#पांडुरंग 
#विठ्ठल_रखुमाई 
#सावळा

Rajendrakumar Shelke

माझे गावं श्रीक्षेत्र ओझर गणपती, ता.जुन्नर, जिल्हा:-पुणे. #ganesha #poem

read more
*माझे गांव:-श्रीक्षेत्र ओझर*
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
जुन्नर तालुक्यात आहे
माझं श्रीक्षेत्र ओझर *गांव,*
अष्टविनायकात त्याचे गाजे
संपूर्ण जगात हे *नाव.*

गावात प्रवेश करताना
आहे भलेमोठे *प्रवेशद्वार,*
अष्टविनायक गणपती
आहे त्यावर *स्वार.*

म्हणूनच  माझ्या गावचा
मला वाटतो *अभिमान,*
जिथे पर्यटक आल्यावर
झुकवतात आपली *मान.*

गावच्या पश्चिमेला आहे
किल्ले शिवनेरी *महान,*
छत्रपतींचे जन्मस्थळ
साऱ्या जगाची *शान.*

पेशवेकालीन मंदिराची
रचनाच खुप *न्यारी,*
प्राचीन वास्तू पाहून
रमतात पर्यटक *सारी.*

विघ्नहाराची सुंदर छबी
सर्वांचे विघ्न दूर *करी,*
भाविकांच्या मनातले
श्रध्दास्थान जतन *करी.*

भाविकांच्या सोयीसाठी
देवस्थान ट्रस्ट सदा *झटे,*
कशाची कमतरता न पडो
हाच विश्वास मनी *उमटे.*

श्रीगणेशाची पूजा करूनी
विघ्न सारे दूर *होवो,*
प्रत्येकाच्या मनात सदैव
सुख, शांती, स्थैर्य *येवो.*
🌹💐🌹💐🌹💐🌹
*********************
*✍️ राजेंद्रकुमार शेळके.*
   -- श्रीक्षेत्र ओझर, पुणे.

©Rajendrakumar Shelke माझे गावं श्रीक्षेत्र ओझर गणपती, ता.जुन्नर, जिल्हा:-पुणे.

#ganesha

PRATIK BHALA (pratik writes)

👇 कृपया पूर्ण पढ़ना उपर दि हुई कविता श्री भगवान विठ्ठल (विष्णू )को समर्पित है.विठ्ठल रुख्मिणी का पवित्र धाम श्री क्षेत्र पंढरपूर (महाराष्ट् #Life #India #Love #Culture #Best #vitthal #Wari #PratikBhala #pratikwrites

read more
please read hindi meaning in caption 👇
कृपया पूर्ण पढ़ना 

उपर दि हुई कविता श्री भगवान विठ्ठल (विष्णू )को समर्पित है.विठ्ठल रुख्मिणी का पवित्र धाम श्री क्षेत्र पंढरपूर (महाराष्ट्
loader
Home
Explore
Events
Notification
Profile