Find the Best अंधार Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutअंधाराला का, अंधारातून प्रकाशाकडे कविता, अंधारात meaning english, अंधारात होते पाप, अंधार आहे,
Rushikesh bhadange
अंधार आणि एकांताचा जणू काहीतरी घनिष्ट सबंध असावा! या दोघांच्या सानिध्यातच माणूस अगदी शांत आणि अबोल होतो. दुनियेशी हितगुज करू पाहणारा दमलेला जीव या क्षणी स्वतःमध्येच इतका गुरफटून जातो की त्याला स्वतःचच भान राहत नाही. सुखाच्या तरंगांवर हेलकावे खात असलेली त्याची नाव बघता बघता कधी दुःखाच्या खोल दरीत कोसळते त्याचं त्यालाही समजत नाही. आणि तेव्हाच सुरू होते बुडू पाहणाऱ्या जीवाला काटावर पोहोचवण्याची केविलवाणी धडपड! पण नेमकं तिथेच तुमच्या प्रयत्नांना चपराक लगावून मिळणाऱ्या यशाला पराभूत करून तुमचाच पराजय तुमच्यावर हसू पाहतो आणि तेव्हाच मनुष्य दुःखाच्या दरीत असलेल्या वेदना आणि यातनांच्या सानिध्यात घटांगळ्या खात राहतो. अगदी निष्प्राण होईपर्यंत! ©Rushikesh bhadange #cycle माझ्या लेखणीतून #अंधार आणि एकांत!
Atul Waghade
जन्माच्या वाटा घेऊन गरीबीत जन्म घेऊन समोर फक्त पोटाचा प्रश्न भूक हि जिवनातील सत्य. अंधार हा मिळालेला जगणे सोबतीने शिकवण्याचा. -Atulwaghade नमस्कार माझ्या प्रिय लेखक आणि लेखिकानों😘 सुप्रभात. आज दिवसा आपण अंधाराच्या सोबतीला घेऊन काहीतरी लिहीणार आहोत समजल नाही? अहो आजचा विषय आहे हा आपला अंधार सोबतीला घेऊन... चला तर मग अप्रतिम रचना येऊ द्या. #अंधार #अंधारसोबतीला #collab #yqtaai
नमस्कार माझ्या प्रिय लेखक आणि लेखिकानों😘 सुप्रभात. आज दिवसा आपण अंधाराच्या सोबतीला घेऊन काहीतरी लिहीणार आहोत समजल नाही? अहो आजचा विषय आहे हा आपला अंधार सोबतीला घेऊन... चला तर मग अप्रतिम रचना येऊ द्या. #अंधार #अंधारसोबतीला #Collab #yqtaai
read moreShankar Kamble
*_एक कवडसा...*_ *_दाटला अंधार सभोवती*_ *सावलीचा मंद उसासा* *खिन्न गलबते सूना किनारा* *संथ चालतो एक कवडसा* *झाकोळले तेजाचे घरटे* *बंद कवाडे किती एकटे* *कुणी- कुणां द्यावा दिलासा* *शांत जोजवी एक कवडसा* *जायबंदी पंख छाटले* *डोळे धूसर मळभ दाटले* *लाख किल्मिषे भाव जरासा* *अंकुर फुलवी एक कवडसा* *किती प्रवासी येती जाती* *दोन घडीचा डाव मांडती* *क्षणभंगुर जग नसे भरवसा* *साथ सोबती एक कवडसा* *लोभ वासना बरबटलेले* *ग्रहण कधीचे ना सुटलेले* *मोक्ष आंधळा कुणां दिसावा* *अंजन घाली एक कवडसा* ©Shankar Kamble #कवडसा #सोबत #अंधार #एकाकी #जग #दुनिया #दुनियादारी #Lumi
Shankar kamble
*गर्द दाटला अंधार सभोवती* *हरवून गेल्या वाटा* *वादळात भरकटे किनारा* *नेती दूर लाटा* *हाती गवसले होते काही* *क्षणांत निसटून गेले* *प्रकाशातले जगणे सरले* *घन अंधारून आले* *क्षणिक सुखाचे रंग फसवे* *मोहवी मन चार क्षणाला* *बहर सरता येई पानगळ* *एकाकी जग भास उद्याला* *नभांगणी तळपती अविरत* *अगणित तेजोराशी* *काळोखाचा श्राप भोगतो* *काजवा मी मंद प्रकाशी* *माझ्याच कोशी गुरफटलो* *विणले अभासी जाळे* *उतरता भोग समाधी* *निवळले गढूळ जळ निळे* ©Shankar kamble #अंधार #काळोख #वाट #वाटा #काळोख😢🖤Fearofdarkness😢काल #Moon
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited