Nojoto: Largest Storytelling Platform

Best अनामिक Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best अनामिक Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutअनामिका उंगली कौनसी है, अनामिका अम्बर की शायरी, अनामिका अंबर की कविता, अनामिका की कवितायेँ, अनामिका अम्बर कविता लिरिक्स,

  • 5 Followers
  • 5 Stories

Shankar Kamble

विवंचनेचे डंख हजारो
चाळण करती रोज मनाची
उपरती ना होई मनुजा
झडून गेल्या आर्त क्षणाची..

अथांग,अविरत लहरे सागर
थेंब एक तू पृथा अनामिक
अस्तित्वाचा किती बढाया
कल्पित, रंजीत अती भावनिक..

ओसरलेला गडद गहिरा
इंद्रधनुचा फिका पिसारा
शापीत भवती गंधर्वाचे
रुदन चालले कोण सहारा?

कसा टळेना पाठलाग हा?
सावज पारध कोण कळेना?
वाट निसरडी पाय रुतले
चुकलेली लय पुन्हा जुळेना..

पेरून फासे क्रूर नियतीने
जर्रजर्र केले पुरते आता
हरवलेली ऊब कुशीची
कोण आता कुरवाळील माथा?

©Shankar Kamble #SunSet #जीवन #जीवनअनुभव #जीवनदर्शन #जगणे #दुःख #सुख #मी #अनामिक #दर्पण

Rajendrakumar Jagannath Bhosale

Rashmi Hule

सुप्रभात सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे अनामिक हूरहूर... हा विषय Sumitra Deshpande यांचा आहे. चला तर मग मस्त मस्त लिहुया. #अनामिक #हूरहूर #Collab #yqtaai

read more
एक अनामिक हुरहुर अंतरी
तुझ्या प्रेमाची आस लागली... 
वाढली स्पंदने हृदयाची माझ्या 
तुझ्या उत्तराची वाट पाहिली... 
 सुप्रभात सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे 
अनामिक हूरहूर...
हा विषय Sumitra Deshpande यांचा आहे.
चला तर मग मस्त मस्त लिहुया.
#अनामिक
#हूरहूर
#collab #yqtaai

काव्यात्मक अंकुर

#नातं #अनामिक #अंकुर काव्यात्मकअंकुर🌱 #nojotomarathi Writer #charolya #unknown #Relationship #Fight

read more
नातं

खेचलं की तुटेल स्वभाविक
तुटलं की निसटेल अभाविक  
म्हणून जपावे आपणच थोडं 
होण्याआधीच अनामिक

©काव्यात्मक अंकुर #नातं #अनामिक #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #nojotomarathi #NojotoWriter #charolya #unknown #Relationship #Fight

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile