Find the Best जगणे Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutजगणे meaning in english, आपुले जगणे आपुली ओळख कविता, आपुले जगणे आपुली ओळख कविता रसग्रहण, जगणे कविता, जगणे सुंदर आहे,
Shankar Kamble
गझल... जाणत्या नेणत्या पणाचे हिशोब सारे राहून गेले बंद मुठीतून ओघळणारे क्षण अत्तरी वाहून गेले गुदमरलेल्या श्वासांनाही उसने थोडे श्वास मिळाले डोकावून मग झरोक्यातूनी उनं बोचरे पाहून गेले जगण्यासाठी धडपड करते धडावेगळे शीर अजूनी नाळ गुंतली पाझर ओला किती उन्हाळे नाहून गेले गर्द हिरवी झुकलेली नाजूक डहाळी आंब्याची नवलाईचा मोहर गळता रूपं दर्पणी दावून गेले रुळलेली ती वाट आजही रोज चालतो निगुतीने शोध नव्या वाटांचा घेता वाटं पुरती लावून गेले शांतीचा मी पाईक आहे साक्ष देतो वधस्तंभ हा खबरदार जर खरे बोलशील जल्लाद सारे धावून गेले कशांस नुसती उठाठेव ही? सूर्य अस्तास कधीच गेला एक खुळी पण आस पेरली गीत पहाटे गावून गेले ©Shankar Kamble #Childhood #गजल #मराठीप्रेम #मराठीकविता #सुख #जीवन #जगणे #दूर #दुरावा
#Childhood #गजल #मराठीप्रेम #मराठीकविता #सुख #जीवन #जगणे #दूर #दुरावा
read moreShankar Kamble
विवंचनेचे डंख हजारो चाळण करती रोज मनाची उपरती ना होई मनुजा झडून गेल्या आर्त क्षणाची.. अथांग,अविरत लहरे सागर थेंब एक तू पृथा अनामिक अस्तित्वाचा किती बढाया कल्पित, रंजीत अती भावनिक.. ओसरलेला गडद गहिरा इंद्रधनुचा फिका पिसारा शापीत भवती गंधर्वाचे रुदन चालले कोण सहारा? कसा टळेना पाठलाग हा? सावज पारध कोण कळेना? वाट निसरडी पाय रुतले चुकलेली लय पुन्हा जुळेना.. पेरून फासे क्रूर नियतीने जर्रजर्र केले पुरते आता हरवलेली ऊब कुशीची कोण आता कुरवाळील माथा? ©Shankar Kamble #SunSet #जीवन #जीवनअनुभव #जीवनदर्शन #जगणे #दुःख #सुख #मी #अनामिक #दर्पण
#SunSet #जीवन #जीवनअनुभव #जीवनदर्शन #जगणे #दुःख #सुख #मी #अनामिक #दर्पण
read moreSapankar Sir
#जगणे! दुनियेच्या या बाजारात सुखासीन झालो असतो जर मी थोडासा लाचार झालो असतो. विकून मी स्वाभिमानाला सुखाचे घोट प्यालो असतो माझ्याच नजरे मध्ये नक्कीच उतरलो असतो. घोळला असता गोंडा इमानदार ठरलो असतो अस्तित्व माझे मीच विसरून गेलो असतो. चाटले असते तळवे उच्च पदी बसलो असतो राजाच्या दरबारातील विदूषक दिसलो असतो. स्वाभिमानी पूर्वजांचा गुन्हेगार ठरलो असतो पाठीचा कणा मोडून जर मी जगलो असतो! ©Sapankar Sir जगणे...
जगणे...
read moreShankar Kamble
हुंदक्यात आयुष्याचे गाणे सजले होते सर नव्हती पावसाची आभाळ भिजले होते.. भणंग जिंदगीची वणवण कशास सोसू? खंजीर खुपसले पाठी कट मागे शिजले होते.. खोल गेले पोट त्यांचे, त्यांचा झालासे नगारा ते शांत साखर झोपी कुणी तसेच निजले होते.. फुंकतेस कशाला?चुल आहे पेटलेली नजरेत भूक जळते अंगार विझले होते.. शाप दे वा वर दे सोय तुझी तू पाहून तुजं कैद मंदिरी केले मी मनांत पुजले होते.. गाढलेला उकरून पुन्हां देह बाहेर काढला सापडेना माणूस कुठे माणूसपण कुजले होते.. डोके गहाण ठेवून विकतो मलाच आता बोली लावण्यास कैक दलाल जमले होते.. फोडून खापर माझ्यावर जो तो धन्य होतो मूढ मती मी उशीरा गमते काय चुकले होते.. ©Shankar Kamble #Light #जिंदगी #जीवन #जीवनअनुभव #जगणे #माणूस #लढा #माणूसम्हणूनजगताना #फासा #गूढ
#Light #जिंदगी #जीवन #जीवनअनुभव #जगणे #माणूस #लढा #माणूसम्हणूनजगताना #फासा #गूढ
read moreShankar Kamble
वेदनेचा बाजार मांडला दुःख विकण्या सांगतो मी भार दाटला पुन्हा ढगाला डोळ्यांत पाऊस मागतो मी पेटलेल्या उन्हांत आता झाड सोसते तप्त झळाला आठवून मग उंबऱ्याला जीव उगां का जाळतो मी? मतलबी दुनियेत होते पायपुसणी भाबड्याची कातडी जपतो स्वतःची पारखून जग वागतो मी टांगली कित्येक स्वप्ने का नव्याने न्याहाळतो? देवून चकवा पांगलेल्या पाखरांना भांडतो मी माखलेल्या गर्द हळदीचा गंध ना लाभला रंगल्या मेहंदीतल्या हातांस दूर पाहतो मी सळते जीवांला जाळतेही पुन्हा पुन्हा ती सांगते ही भंगलेल्या राऊळाच्या पायरीला थांबते मी उघड्यावरचा असा पसारा आज वाटतो आवरावा गाठोड्याचा भार शिरावर मूकपणाने चालतो मी ©Shankar Kamble #Past #गझल #वेदना #दुःख #जीवन #जगणे #जगणं #सांजवेळ
Rashmi Hule
थोडंसं रुसावं,थोडंसं रागवावं झालं गेलं तिथेच सोडून जिवलगा समवेत आयुष्य मनसोक्त जगावं... #हासणे#रुसणे#जगणे #yqtaai #yqbaba #yqdidi #yqtales #bestyqmarathiquotes
Shankar Kamble
कुणांस ठाऊक प्रवासात या मुक्कामाचे गाव कोणते? दोन घडीची सोबत संगत अळवावरचे पाणी सरते.. कठीण परीक्षा आयुष्याची सहज ,सोपे नसते काही पान वेगळे, धडा वेगळा वेळ नी उत्तर समान नाही.. वेदनेचे गीत बनवूनी कुणी मुसाफिर आळवत जातो रडतो ,कुढतो, उगाच चिडतो वाट फिरूनी तीच चालतो.. खपली उडता भकास भिंती एक औकळा घरास देई चुकता गणती सुखदुःखाची हाती शिल्लक उरते काही..? एक पायरी चढण्यासाठी उन्हास त्या सावली केले हात पोळले तरीही माझे फितूर काजवे मलाच झाले.. उगाच चिंता, चिकार गुंता किती उगाळू तोच कित्ता मावळत्या सूर्याच्या साक्षी बहर येईल पुन्हा आता.. ©Shankar Kamble #celebration #जीवन #जीवनगाणे #जीवनअनुभव #जग #प्रवास #प्रवासी #जगणे #माणूस
#celebration #जीवन #जीवनगाणे #जीवनअनुभव #जग #प्रवास #प्रवासी #जगणे #माणूस
read moreShankar kamble
*खळखळ होवून मुक्त झऱ्याची* *आयुष्याचे गाणे गावे* *रंग बेगडी खोडून सारे* *आत्मरंगी रंगून जावे* *पंख देवूनी मनःपाखरा* *स्वच्छंदी गगनात फिरावे* *गुरफटून कोशात स्वतःच्या* *भार प्रौढी उगा वहावे* *आव्हानांना भिडवीत डोळे* *तुफानांना तुडवीत जावे* *निधड्या छातीवरती झेलीत* *संकटावरी कोरीत नावे* *विखुरलेल्या स्वप्नांचे* *मोती-मोती वेचीत जावे* *सर गुंफूनी स्वयें तयांचे* *भार कंठी मिरवीत गावे* *कशास चिंता व्यर्थ उद्याची* *मृगजळी का उगा फसावे* *रीती ओंजळी क्षण निसटती* *शल्य शेवटी काय असावे?* *ताल-सूर जरी आज हरवले* *गीतं तरी ते मनीं ठसावे* *आळवून त्या रंम्य लकेरी* *कैक मैफीली सूर सजावे* ©Shankar kamble #आयुष्य #जगणे #जीवन #आयुष्य_जगताना #Thoughts
#आयुष्य #जगणे #जीवन #आयुष्य_जगताना Thoughts
read moreSachin Zanje
आपले जगणे. नाही मला काही येत नाही मी कुणास काही देत. अनुभव ह्या दुनियेने दिलेत सारे त्यालाच हे ज्ञान म्हणताहेत .. सुखात पाहीलेय मी सर्वजण आपलेच होते. दु:खामध्ये पाहता त्यांना माझे तिथे कुणीच नव्हते. मिळेल ह्या अपेक्षांनी स्वार्थी मन लोभी झालते. संघर्षाविना न मिळे इथे काही असे हे जीवन सांगते. हरवुन बसलो उगाच दुसऱ्यामध्ये क्षणीक हे सारे होते. मार्मिक आयुष्याचे तर हे खरे आपल्यामध्येच असते. कवी :- श्री सचिन सदाशिव झंजे. ©Sachin Zanje #आपले. #जगणे #आयुष्य . #droplets