Find the Latest Status about एकटे in marathi from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, एकटे in marathi.
Supriya Yewale
कधी कधी काय होतं सांगू आपला जास्त चांगुलपणा ना आपल्याला खूप एकटे पाडतो खरंतर आपल्याला जास्त करून त्रास त्याच व्यक्तीचाा होतो ज्याच्यासाठी आपला जीव जळतो पण त्या व्यक्तीला हे नाही समजत पण जन्म समजतो तेव्हा खूप वेळ निघून गेलेलीतेव्हा खूप वेळ निघून गेलेली असते खरंतर नातं जास्त करून याच कारणामुळेे तुटून जाते ©Supriya Yewale #Tulips आपला चांगुल पणा आपल्याला एकटे पडतो.
kiran
White पाठीवरच्या ओझ्यापेक्षा मनावरचं ओझं नेहमीच जड असतं ते हलकं करायचं म्हटलं तर, झेलणारा तितकाच 'आपलासा' असावा लागतो. ... .. ©kiran #ramnavmi #treanding Marathi life experience #marathi #Life_experience
Amita
राधा -- मुरारी कुठे लोपला नाद वेणुचा कुठे हरपला वास हरीचा विरून गेली कुठे निळाई शोधून थकले ठाई ठाई गोकुळीचा श्रीरंग सखा हरवलास तू कुठे असा लपंडाव नको रे सारखा कासावीस झाली राधिका तेथूनी आली हाक अंतरी वास असे हरीचा चराचरी वृथा जाहली कळकळ सारी साक्षात उभा श्याम मुरारी.... अश्रु ओघळे गालावरती रास रंगला राधेसोबती विसरून मीपण भान हरपती मीपण नुरले गोकुळीच्या धरती.... अमिता🌸✍️ ©Amita #Kanha #marathi
kiran
White कौतुक आणि टिका या दोन्हीचाही स्विकार करा, कारण झाडाच्या वाढीसाठी ऊन आणि पाऊस या दोन्हीचीही गरज असते. . ©kiran #safar #marathi
Amita
Village Life लेखणीतूनी ...... वाटे मजला सारखे, पुन्हा पुन्हा जगावे प्रेम करावे शब्दांवर, अन् सुरात गीत गावे.... खळखळ जळात, पावले उसळून घ्यावी मंजुळ गाणी गळ्यात, प्रीतीची गावी.... व्योमात विहंगथवा, एकटक बघावा मोगरा कधीतरी, केसात सजवावा.... आयुष्य इतुके सुंदर, डोळ्यात साठवावे काव्यात मनीच्या, उत्स्फूर्त प्रकट व्हावे.... अमिता✍️ ©Amita #marathi #MarathiKavita
kiran
हसू आलं तर हसा खळखळून कुठे लागत आहेत पैसे. रडू आलं तर रडा मन भरून कुठे घ्यायचे आहेत कोणाकडून आसू उसने. सुखही आपलं दुःखही आपले, जगाचे असतात फक्त खोटे पहारे.. ... ... ©kiran #Aasmaan #marathi
kiran
अखंड यशाने आपल्या जीवनाची केवळ एकच बाजू कळते. दुसरी बाजू कळण्यासाठी अपयशाची पायरी जरुरी असते. . ©kiran #Holi #marathi #quoets
Amita
किनारा निरखुन अंतरंग तुझे, पुस प्रश्न स्वतःशी जरा.... शोध घेत आयुष्याचा, बघ सापडतो का किनारा? प्रवाहात तुज कैक भेटले, किती उमजले? किती न सुटले ? भुणभुण करी भयाण वारा, कोलाहल सारा... बघ सापडतो का किनारा?? मनात वादळे कुशीत माया, पयोद उभा हा डोळ्यांतून सारा.. डगमगणाऱ्या वाटेवरती अश्रूंचा पसारा बघ सापडतो का किनारा?? जाळ्यात कशी तू गुंतुनी जाशी, स्वप्नांना का ठेवूनी उशाशी अल्लड अवखळ मनात तुझिया, फुलवित जा पिसारा बघ सापडतो का किनारा?? उत्तुंग गगनाची भीती कशाला, गहनता सागराची मापू कशाला विश्वस्त होता तूच तुला, उजळे मन गाभारा, बघ सापडतो का किनारा?? नयन रोखुनी दिसे किनारा, स्वप्नांच्या वेशी दिव्य मनोरा.. भयावरी मग मात करुनी, निघे शिडाचा डोलारा.. बघ सापडला किनारा, बघ सापडला किनारा.... अमिता🌸✍️ ©Amita #Sea #marathi #MarathiKavita